डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बद्दल संपूर्ण माहिती

( जन्म : १८९१- मृत्यू :१९५६)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
478

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बद्दल संपूर्ण माहिती

जन्म : १४ एप्रिल १८९१

जन्मठिकाण : मह, इंदुर जिल्हा मध्यप्रदेश

मुळनाव : भीमराव रामजी सपकाळ उर्फ आंबवडे

जन्माच्या वेळी नाव : भीवा (भीमराव आई वडिलांचे १४ वे आपत्ये)

टोपन नाव : बाबासाहेब, बोधिसत्व, भीमा, भिवा, भीम

कुटुंब : त्या काळी अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या महार जातीचे.

मुळचे : रत्नागिरी (महाराष्ट्रातील जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असलेल्या आंबडवे गावचे (कोणतील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी जोडण्याचा प्रघात, त्यामुळे सपकाळ असताना आंबवडेकर नाव नोंदविले.) ७ नोव्हेंबर १९००

वडील : रामजी मालोजी सपकाळ

आई : भीमाबाई रामजी सपकाळ

पत्नी : रमाबाई आंबेडकर, डॉ. सविता आंबेडकर

आपत्य : यशवंत आंबेडकर

  • १८९६ – ५ वर्षांचे असताना भीमाबाईचे निधन (मस्तकशुळ आजाराने) (संगोपण आत्या मीराबाईंनी केले.)
  • नोव्हेंबर १८९६ – सातारा येथील कॅम्प स्कुल मध्ये भीमरावांचे नाव दाखल.
  • १८९६ – कुटूंबाने दापोली सोडली व सातारा येथे स्थायिक झाले.
  • १८९८ – पिता रामजीनी दुसरे लग्न केले व कुटूंब मुंबईला स्थायिक
  • १९०६ – दापोलीच्या ९ वर्षीय रमाबाई यांच्याबरोबर लग्न,
  • १९०७ – मुंबईच्या एल्फिस्टन्स हायस्कुलमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण.
  • १९१२-१३ – एल्फिस्टन कॉलेजमधून पार्शियन व इंग्रजी घेऊन बी. ए. झाले. (बडोदा संस्थानात नोकरीसाठी झाले.) याच वर्षी यशवंत हा मुलगा झाला.
  • २ फेब्रुवारी १९१३ – वडील रामजी बाबांचे मुंबईमध्ये निधन झाले.
  • जून १९१३ – बडोदा नरेश सयाजीराव गायकवाडांकडून प्रति महिने २५ रूपये शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेला कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयाण केले. (मुंबई विद्यापीठाची बी. ए. ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होण्याचा मान आंबेडकरांना मिळाला. बडोदा संस्थानाने परदेशात अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती)
  • २० जुलै १९१३ – अमेरिकेतील न्यूयार्क येथे बोटीने प्रवास करून पोहोचले.
  • १९१३-१६ अर्थशास्त्र शाखेत प्रवेश प्रमुख विषय अर्थशास्त्र व इतर समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान इ. विषय निवडले)
  • १५ मे १९१५ अँडमिशन अॅन्ड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर केला.
  • २ जून १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना एम. ए. पदवी मिळाली. (याच काळात लाला लजपतराय यांच्याशी ओळख)
  • १९१३-१७ भारताचा राष्ट्रीय साभांश इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन हा पी. एच. डी. साठीचा प्रबंध लिहिला व पी. एच. डी. संपादन केली. (प्रा. सेलिग्मन आंबेडकारणी पी. एच. डी. साठीचे मार्गदर्शक )
  • जून १९१७ – बडोदे महाराजांच्या शिष्यवृत्तीची मुदत संपली म्हणुन हिंदुस्थानास परत, त्यापूर्वी लंडन विद्यापीठात एम. एस. सी. परीक्षेसाठी एक वर्ष अभ्यास.
  • १९१७ – मुंबईत वर्स कॉलेज या खाजगी व्यापारी शिक्षण संस्थेत काही काळ अर्थशास्त्र, बँकिंग व कायदा या विषयांचे अध्यापन.
  • जुलै १९१७ – बडोदे येथे सयाजीराव महाराज यांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नेमणूक, परंतु थोड्याच दिवसात या नोकरीचा राजीनामा.
  • नोव्हें. १९१८ – मुंबई येथील सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे प्राध्यापक म्हणून नेमणुक झाली. साऊथबेरो कमिटीसमोर साक्ष अस्पृश्यांना प्रांतातील कौन्सिलमध्ये स्वतंत्र प्रतिनिधीत्व असावे असा विचार सर्वप्रथम मांडला.
  • ३१ जाने १९२०- मुकनायक हे पाक्षिक वृत्तपत्र सुरु केले. शाहू महाराजांनी त्यांना २००० रूपयेची आर्थिक मदत केली.
  • ५ जुलै १९२०- लंडन येथील अपुरा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सिडनेहॅम कॉलेजमधील प्राध्यापकाच्या पदाचा राजीनामा.
  • ३० सप्टेंबर १९२० – लंदन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत मास्टर ऑफ सायन्ससाठी प्रवेश मिळविला.
  • १९२० – हुबळी (कर्नाटक) येथे झालेल्या ब्राम्हणेत्तर परिषदेचे अध्यक्ष.
  • सप्टें. १९२० लंडन विद्यापीठामध्ये नाव दाखल केले, कोल्हापूर संस्थानातील माणगांव येथे यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यांची मोठी परिषद भरली यावेळी छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. नागपूर छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय अस्पृश्य परिषद कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी असलेले वैचारीक मतभेद स्पष्ट झाले.
  • २० जून १९२१ – मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली.
  • विषय – Provincial decentralisation of Imperial finance in British India.
  • २८ जून १९२२ ग्रेज इन संस्थेने त्यांना बॅरिस्टर अॅट लॉ ही वकिलीची पदवी दिली.
  • ऑक्टो. १९२२ लंडन विद्यापीठाने त्यांनी सादर केलेला प्रबंध स्वीकारल्याने संडन विद्यापीठाची डी. एससी. पदवी मिळविणारे पहिले भारतीय बनले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बद्दल संपूर्ण माहिती

  • विषय – The problem of the rupee Its origin and its solutions. हाच प्रबंध १९४७ साली History at Indian currency and Banking म्हणून प्रसिद्ध झाला.
  • एप्रिल १९२३ मायदेशाला परत जून मुंबई येथे हायकोर्टामध्ये वकिलीस सुरवात.
  • नोव्हेंबर १९२३ लंडन विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली.
  • २० जुलै १९२४ मुंबई येथे बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना दिवाक्य शिका, संघटित व्हा, संघर्ष करा
  • १९२४ भारतातील जाती (ग्रंथ)
  • या सभेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सचिव – सीताराम शिवतरकर
  • उद्देश- अस्पृश्यात नवजागृती करणे व त्यांची शैक्षणिक प्रगती साधणे.
  • बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्यांसाठी वाचनालये, प्रौढ रारशाळा सुरू करण्यात आल्या.
  • १९२६ मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती (१९२६-१९३६)
  • ऑक्टोबर १९२६ – ब्राह्मनांविरोधी च्या खटल्यात केशवराव जेथे, दिनकरराव जवळकर यांच्या बाजूने लढून विजय (फिर्यादीच्या बाजुने पुण्यातील वकिल एल. बी. भोपटकर होते.)
  • १९ व २० मार्च १९२७ महाड येथे कुलाबा परिषद भरविली अध्यक्ष – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • २० मार्च १९२७ रत्नागिरी जिल्ह्यातील महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह. (नंतर महाडच्या महानगर पालिकेने अस्पृश्यांना चवदार तळे खुले केल्याचा ठरावही रद्द केला.)
  • एप्रिल १९२७ बहिष्कृत भारत पाक्षिक सुरू.
  • २६ जून १९२७ अंबादेवी मंदीर सत्याग्रह डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बद्दल संपूर्ण माहिती

  • २५ डिसेंबर १९२७ मनस्मृतीचे दहन (या घटनेची तुलना मार्टिन ल्युथरने केलेल्या पोपच्या (ख्रिश्चन धर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आशेच्या दहनाशी केली आहे. २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन म्हणुन तेव्हापासून मानला जातो.)
  • मे १९२८ इंडियन स्टॅट्युटरी कमिशन (सायमन कमिशन) समोर साक्ष.
  • १४ जून १९२८ – दलित शिक्षण संस्थेची स्थापना.
  • जून १९२८ मुंबई येथील सरकारी लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक, मुंबई प्रांत कमिटीचे सभासद.
  • १९२८ महारांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी मुंबई कायदेमंडळात महार वतन बिल मांडले.
  • १९२८ बॉम्बे प्रेसिडेन्सी कमिटीवर आंबेडकारांची नेमणुक त्यांनी सायमन कमिशन बरोबर काम केले.(नदीच्या खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली ही योजना दामोदर खोरे परियोजना म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने १९९६ मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोल्यांची विभागणी केली.)
  • १९२८-१९३४ चरी (रायगड) गावात शेतकन्यांचा पहिला संप हा संप ७ वर्षे सुरू होता त्यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी संघर्ष केला.
  • ४ जानेवारी १९२८ – च्या टाईम्स ऑफ इंडियात इंदुर संस्थानात अनुसुचीत जातीना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दल वृत्तांत आला होता, त्याची तुलना डॉ. बाबासाहेब यांना १८ व्या शतकातील पेशवाईतील स्थितीशी केली.
  • ९ जून १९२८ समता हे वृत्तपत्र (समाज समता संघाचे मुखपत्र होते.)
  • १४ एप्रिल १९२९ – रत्नागिरी येथील चिपळून येथे जिल्हा शेतकरी परिषद आयोजित . या परिषदेत कोकणातील खोदिदारी विरुद्ध शेतकर्याचे आंदोलन सुरु केले.
  • १३ ऑक्टोम्बर १९२९ – पार्वती मंदिर सत्याग्रह
  • २४ फेब्रु. १९३० – जनता वृत्तपत्र
  • २ मार्च १९३० नाशिक या ठिकाणी ८००० महार सत्याग्रहीनी काव्यराम मंदिर सत्याग्रह यशस्वी केला.
  • ८ ऑगस्ट १९३० मागासवर्गीयांच्या सभेमध्ये डॉ. आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टीकोन जगासमोर ठेवला मागासवर्गीयांनी काँग्रेस व ब्रिटीश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत सुचविले व मिठाच्या व सत्याग्रहाचा समाचार घेतला.
  • ७ सप्टेंबर १९३० – दुसऱ्या गोलमेज परिषदेत हजर राहून अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळाव्य यासाठी प्रयत्न.
  • १९३०-३२ गोलमेज परिषदेत मागासवर्गीयांचे प्रतिनिधी म्हणून हजर
  • २६ सप्टेंबर १९३२ – पुणे करारावर सही. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाऐजवी संयुक्त मतदार संघ मिळाले.
  • जून १९३५ – सरकारी लॉ कॉलेजमध्ये प्राचार्य, कायदेशास्त्राचे पेरी प्राध्यापक होते.
  • सप्टें १९३५ – येवला येथे हिंदूधर्म सोडण्याचा निर्णय जाहीर केला. या वेळी त्यांनी मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. असे जाहीर केले.
  • जानेवारी १९३६ – मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिक असेब्लीवर सभासद म्हणून निवडून आले.
  • १३ व १४ एप्रिल १९३६ – अमृतसर येथे शिख मिशनरी परिषद भरली होती.
  • १५ ऑगस्ट १९३६ – स्वतंत्र्य मजूर पक्षाची स्थापना या पक्षाने १९३७ च्या प्रांतिक निवडणुकीत १३ जागा जिंकल्या.
  • १८ सप्टेंबर १९३६ – शिख धर्माच्या अभ्यास करण्यासाठी अमृतसरला गेले.
  • १९३७-३८ अनिहिलेशन ऑफ कास्ट (ग्रंथ )
  • १७ फेब्रु १९३७ – मुंबई विधिमंडळाच्या निवडणुकीत त्यांच्या अथक प्रयत्नामुळे या पक्षाचे १५ उमेदवार निवडून आले.
  • १७ सप्टेंबर १९३७ खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक मुंबई विधीमंडळात मांडले.
  • १९४० पाकिस्तानविषयी विचार (पॉट्स ऑन पाकिस्तान) ग्रंथ
  • १० जानेवारी १९३८ – २५००० शेतकऱ्यांचा मोर्चा विधीमंडळावर गेला (आंबेडकरा समवेत) (सप्टेंबर १९१८ शेतजमिनीच्या समस्येवर शोधनिबंध एका प्रकाशित मासिकेत प्रकाशित केला तसेच आंबेडकरांनी पीक विमा पद्धत सुचविली.)
  • २० डिसेंबर १९४१ १९४१ पासून सर्वप्रथम स्वतः बाबासाहेब जय भिम लिहू लागले. आधुनिक भारतातील प्रथम समतावादी पुरुष हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय.
  • १९४२ पासून बौद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी अशी मागणी.
  • जुलै १९४२ – ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना
  • जुलै १९४२- गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सील वर मजुरमंत्री म्हणून नेमणुक
  • १९४३ – रानडे, गांधी आणि जीना (थ)
  • १९४४ – आम्ही शासनकर्ती जमात बनणार जनता वृत्तपत्रात लेख लिहीला,
  • १९४५ – काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्य वर्गास कसे वागविले ? ()
  • १९४५ – धर्मांतरापूर्वी मुंबईत सिद्धार्थ कॉलेज स्थापन केले.
  • जुलै १९४५- पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई – स्थापना
  • १९४६- शुद्र पूर्वी कोण होते? (हु बेअर द शुद्राज) (ग्रंथ)
  • १९४७ – कायदे मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक लोकसभेत मांडले.
  • १९४८ द अनटचेबल (ग्रंथ )
  • १९४८ : १५ एप्रिल – नवी दिल्ली : डॉ. शारदा कबीर सोबत विवाह (दुसरा) (विवाहानंतर शारदा कबीरांनी सविता आंबेडकर हे नाव स्वीकारले. १९३५ पहिली पत्नी रमाबाई यांचे दोर्प आजाराने निधन)
  • १९४२-१९४६ मजुर मंत्री, व्हाईसरॉय, एक्सोकेटिव्ह कॉसित
  • १५ ऑगस्ट १९४७-१९५० – भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री
  • २९ ऑगस्ट १९४७ – भारतीय संविधानातील मसुदा समितीचे अध्यक्ष
  • २६ नोव्हें. १९४९ – २ वर्षे ११ महिने १८ दिवसात संविधान लिहून समेत सुपूर्द केले.
  • २ मे १९५० – दिल्ली येथे पहिली सार्वजनिक बौद्ध जयंती साजरी केली.
  • जून १९५०- औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यायलयाची स्थापना व परिसराला नागसेनवन असे नाव दिले.
  • जुलै १९५१- भारतीय बौद्धजन संघ स्थापना
  • २७ सप्टें १९५१ – हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने मंत्रीपद सोडले.
  • १९५३- महाराष्ट्रामध्ये बौद्ध जयंतीस सुरुवात
  • २७ मे १९५३ – रोजी केंद्रसरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहिर केली.
  • १९५५ – काठमांडू – नेपाळ येथे जागतिक बौद्ध परिषदेत बौद्ध भिक्ती त्यांना बोधिसत्व ही उपाधी प्रदान केली. (दलाई लामा यांनाही आंबेडकरांना बोधिसत्व संबोधले होते.)
  • मे १९५५ – भारतीय बौद्ध महासभा स्थापन
  • १९५५ पॉट ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स (ग्रंथ)
  • १४ ऑक्टो. १९५६ बौद्ध धर्म स्वीकारला (सम्राट अशोकाने याच दिवशी स्वीकारला होता.)
  • १९५६ – आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली.
  • मे १९५६ – सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ मुंबई स्थापना. १४ ऑक्टोबर नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार
  • २० नोव्हेंबर १९५६ नेपाल फिलोशीप ऑफ बुद्धीस च्या या चौथ्या परिषदेत हजर राहिले व  बुद्ध की कार्ल मार्क्स या विषयावर भाषण केले.
  • ४ फेब्रुवारी १९५६ प्रबुद्ध भारत (वृत्तपत्र)
  • ६ डिसेंबर १९५६ – दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वान झाले. तेव्हा त्यांचे वय ६४ वर्षे होते.
  • १९५७ – त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची स्थापना केली.
  • १९८७ – गंगाधर पानतावने यांनी भारतात पहिल्यांदा बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर पी. एच. डी. साठी शोध प्रबंध लिहिला.
  • १४ एप्रिल १९९० मरणोत्तर भारतरत्न हा सर्वाच्च नागरी पुरस्कार दिला.
  • २९ मे २००३ माईसाहेब / माई / शारदा कबीर यांचे दिल्लीतील मेहरौली येथे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले.
  • गांधी व अस्पृश्यजनांचे बंधविमोचन (ग्रंथ)
  • बुद्ध व त्यांचा धम्म (बुद्ध अॅन्ड हिज धम्म) (ग्रंथ)
  • १९१९ चा कायदा बनविण्याआधी १९६८ च्या साऊथ बरो कमिशनसमोर डॉ. आ. नी. निवेदन देऊन साक्ष दिली होती. त्यात ज्या मागण्या प्रामुख्याने बाबासाहेबांनी केल्या होत्या त्या १९१९ Montague Chemsford सुधारणा कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या होत्या.
  • बाबासाहेब पश्चिम बंगाल प्रांतातून संविधान सभेवर निवडून आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बद्दल संपूर्ण माहिती

  • डॉ. बी. आर. आंबेडकर भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते. (के. आर. नारायण भारताचे तत्कालिन राष्ट्रपती)
  • आंबेडकर भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते.
  • संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
  • भारतीय रिझर्व बँक ही आंबेडकरांनी हिलटन यंग कमिशनला सादर केलेल्या विचारांवर आधारित होती.
  • बॅरिस्टर मोहम्मद अली जीना यांनी जयकरांमार्फत बाबासाहेबांनी इस्लाम धर्म स्वीकारावा, पाकिस्तानला यावे व पाकिस्तानचे गव्हर्नर कावे अशी ऑफर दिली.
  • ख्रिश्चन, मुस्लीम, शिख, जैन, बौद्ध, यहुदी इ. धर्माच्या धर्मगुरुंनी त्यांना आपल्या धर्मात यावे यासाठी अमिषे दाखविली.
  • मुंबई मधील त्यांच्या निवासस्थानाला राजगृह असे नाव दिले.
  • त्यांचे गुरु गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले.
  • १९९०-१९९१ हे आंबेडकरांचे जन्म शताब्दी वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून पाळले गेले.
  • डॉ. बाबासाहेबांचे मुंबई येथील समाधी स्वळ चैत्यभूमी (दादर)

डॉ. बाबासाहेबांचे प्रसिद्ध वचने / विचार / त्यांच्याबद्दल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बद्दल संपूर्ण माहिती

  1. राजकिय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे.
  2. भाकरी पेक्षा इज्जत प्यारी.
  3. देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा देव असेपर्यंत लढले पाहिजे.
  4. भिक्षेने गुलामी मिळते. स्वातंत्र्य नाही.
  5. आम्हाला सामाजिक व राजकीय गुलामगिरीतून मुक्त करा म्हणजे आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावुन राजकीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करतो.
  6. राजकीय सत्तेच्या मोक्याच्या आणि महत्वाच्या जागा काबीज करा. आणि शासनकर्ती जमात बना (दलित बांधवांना आवाहन)
  7. जर माझ्या मनात द्वेश व सुदबुद्धी असती तर पाच वर्षाच्या आत मी या देशाचे वाटोळे केले असते.
  8. तिरस्करणीय गुलामगिरी व अन्यायाच्या अमानुष गर्तेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्मास आलो, त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यात मी अपयशी ठरलो तर स्वतःलाच गोळी घालीन
  9. Relegion is meant for man, but man is not meant for Relegion.
  10. वाचन मनाला अन्न पुरविते, या अत्राचे चर्वन केले तरच ते पचते, अत्र पचते तरच बुद्धी प्रगत होते.
  11. ३० मार्च १९२७ महिलांना उद्देशुन तुमचा नवरा व मुले दारू प्यायली तर त्यांना जेवन देऊ नका.
  12. बौद्ध धर्माचे प्रज्ञा करूणा व समता ही तीन तत्त्वे स्वीकारली.
  13. दलित वर्णाला प्रोटेस्टंट हिंदू किंवा नॉन कॉनफॉर्मिस्ट म्हणा – अशी मागणी.
  14. दलितांचा मुक्तीदाता या शब्दात सयाजीराव गायकवाड यांनी त्यांचा गौरव केला.
  15. आंबेडकरांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून उडणारे बार आहे. असे डॉ. बेव्हरले निफोल्स यांनी त्यांचे वर्णन केले.
  16. आंबेडकरांमध्ये तुम्हाला तुमचा उद्धारकर्ता लाभलेला आहे ते तुमच्या बेड्या तोडून टाकतील याची मला खात्री आहे. असे उद्गार छत्रपती शाहू महाराजांनी माणगाव परिषदेमध्ये काढले.
  17. अस्पृश्यता एक लोकांची लहर आहे.
  18. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
  19. मुकनायक व बहिष्कृत भारत या वृत्तपत्रांच्या शीर्षभागी अनुक्रमे संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांची वचने होती.
  20. आंबेडकरांना आधुनिक मनु म्हणतात.
  21. आंबेडकरांचा काश्मीरला असलेल्या ३७० या कलमास विरोध होता.
  22. दुसर्‍या महायुद्धात भारताने ब्रिटिशांना सहकार्य करावे असा मनोदय डॉ. आंबेडकरांनी व्यक्त केला.
  23. भाषावार प्रांतरचनेबाबत डॉ. आंबेडकर फारसे उत्सुक नव्हते. त्यांच्या मते भाषावार प्रांतरचनेमुळे ऐक्य भावना वाढीस लागण्याऐवजी हिंदुस्थानचे अधिक तुकडे पडतील. मात्र प्रांतरचना केल्यास मुंबईचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश करावा, असे निवेदन त्यांनी दार कमीशनला सादर केले.
  24. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्तर मध्य मुंबई या राखीव मतदार संघातून पराभूत झाले होते. बाबासाहेबांचे एकेकाळचे सहकारी काँग्रेस नेते नारायण सादोषा काजरोळकर यांनी त्यांना पराभूत केले होते.
  25. त्यांच्या कुटूंबाचा जाती परंपरेचा धिक्कार करणान्या कबीरच्या शिकवणुकीवर विश्वास होता.
  26. त्यांचे वडील सैन्यात होते आणि ते सुभेदार मेजर म्हणुन सेवानिवृत्ती झाले होते.
  27. त्यांच्या शाळेतील शिपाई बाईंना त्यांचे दप्तरही अस्पृश्य वाटे.
  28. ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकु शकले नाही.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम