दिनविशेष : १३ मार्च | Dinvishesh March 13
Dinvishesh March 13
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
दिनविशेष : १३ मार्च | Dinvishesh March 13
१३ मार्च : जन्म
Dinvishesh March 13
१७३३: इंग्लिश रसायनशास्रज्ञ जोसेफ प्रिस्टले यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १८०४)
१८९६: प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १९८५)
१९२६: ललित लेखक रवींद्र पिंगे यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर २००८)
१९३८: ४९वे योकोझुना जपानी सुमो तोचीनौमी तेरुयोशी यांचा जन्म.
१३ मार्च : मृत्यू
Dinvishesh March 13
१८००: पेशवे दरबारातील एक मंत्री नानासाहेब फडणवीस यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १७४२ – सातारा)
१८९९: दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त यांचे निधन. (जन्म: २७ जून १८७५)
१९०१: अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन हॅरिसन यांचे निधन. (जन्म: २० ऑगस्ट १८३३)
१९५५: नेपाळचे राजे वीर विक्रम शाह त्रिभुवन यांचे निधन. (जन्म: २३ जून १९०६)
१९६७: वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू सर फँक वॉरेल यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९२४)
१९६९: गणितशास्रज्ञ रँग्लर मोहिनीराज लक्ष्मण चंद्रात्रेय यांचे निधन.
१९९४: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व सिटू या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते श्रीपाद यशवंत कोल्हटकर यांचे निधन.
१९९६: अभिनेते आणि नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९४५)
१९९७: राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू शीला इराणी यांचे निधन.
२००४: सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९२८)
२००६: चिकन नुग्गेत चे निर्माते रॉबर्ट सी बेकर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९२१)
१३ मार्च : महत्वाच्या घटना
Dinvishesh March 13
१७८१: विल्यम हर्षेल यांनी युरेनसचा शोध लावला.
१८९७: सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना झाली.
१९१०: पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.
१९३०: क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग यांनी प्लुटो ग्रह शोधल्याचे हार्वर्ड विद्यापीठातील वेधशाळेला कळवले.
१९४०: अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.
१९९७: मदर तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली.
१९९९: कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले.
२००३: मुंबई शहरातील लोकल रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले.
२००७: वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्घाटन झाले.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Dinvishesh March 13
Table of Contents