दिनविशेष : ५ एप्रिल | Dinvishesh April 5

Dinvishesh April 5

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
195

Dinvishesh April 5

५ एप्रिल  : जन्म

१८२७: निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९१२)
१८५६: अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९१५)
१९०८: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १९८६)
१९०९: जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर. ब्रोकोली यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून १९९६)
१९१६: हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून २००३)
१९२०: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य डॉ. रफिक झकारिया यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै २००५)
१९२०: इंग्लिश कादंबरीकार आर्थर हॅले यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००४)
१९६६: भारतीय-अमेरिकन अभिनेते आणि निर्माते आसिफ मांडवी यांचा जन्म.

५ एप्रिल  : मृत्यू

१९१७: स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम यांचे निधन.
१९२२: आर्य महिला समाजच्या संस्थापिका पंडिता रमाबाई यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८५८)
१९४०: इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७१)
१९६४: नकलाकार गोपाळ विनायक भोंडे यांचे निधन.
१९९३: हिंदी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १९७४)
१९९६: बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन यांचे निधन.
१९९८: चित्रपट व नाट्य अभिनेत्री रुही बेर्डे यांचे निधन.
२००२: दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया यांचे निधन.

५ एप्रिल : महत्वाच्या घटना

१६६३: दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्‍नात त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत जिवावरचे बोटावर निभावले हा शब्दप्रयोग रुढ झाला.
१६७९: राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले.
१९५७: कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.
२०००: अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. – १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
२०००: जळगाव नगरपालिकेच्या १७ माजली इमारतीचे उद्घाटन.


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Dinvishesh April 5

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम