दिनविशेष : ३ एप्रिल | Dinvishesh April 3

Dinvishesh April 3

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
232

Dinvishesh April 3

३ एप्रिल  : जन्म

Dinvishesh April 3

१७८१: भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८३०)
१८८२: सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार नाथमाधव यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९२८)
१८९८: टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक हेन्री लुस यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६७)
१९०३: मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९८८)
१९०४: इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९१)
१९१४: फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून २००८)
१९३०: जर्मन चॅन्सेलर हेल्मुट कोल्ह यांचा जन्म.
१९३४: इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ जेन गुडॉल यांचा जन्म.
१९५५: सुप्रसिद्ध गायक हरिहरन यांचा जन्म.
१९६२: चित्रपट अभिनेत्री आणि संसद सदस्य जयाप्रदा यांचा जन्म.
१९६५: पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसन यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०००)
१९७३: भारतीय क्रिकेट खेळाडू निलेश कुलकर्णी यांचा जन्म.

३ एप्रिल  : मृत्यू

Dinvishesh April 3

१६८०: छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १६३०)
१८९१: फ्रेन्च गणिती एडवर्ड लूकास यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १८४२)
१९८१: पॅन अमेरिकन वर्ल्ड एरलाईन्स चे स्थापक जुआन त्रिप्प यांचे निधन.(जन्म: २७ जून १८९९)
१९८५: महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचे निधन. (जन्म: १३ मार्च १८९३)
१९९८: इंग्लिश गणितज्ञ मेरी कार्टराइट यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९००)
१९९८: प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार हरकिसन मेहता यांचे निधन.
२०१२: भारतीय राजकारणी गोविंद नारायण यांचे निधन. (जन्म: ५ मे १९१६)

 ३ एप्रिल : महत्वाच्या घटना

Dinvishesh April 3

१९४८: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१९७३: मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाइल कॉल केला.
१९७५: बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्हविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव्ह हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.
२०००: आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.
२०१०: ऍपल कंपनी ने आयपॅड या टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती जाहीर केली.
२०१६: पनामा पेपर्स हे कायदेशीर दस्तऐवज प्रसिद्ध होऊन सुमारे २,१४,४८८ कंपन्याची गोपनीय माहिती उगढ झाली.

 

Dinvishesh April 3


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Dinvishesh April 3

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम