दिनविशेष : २९ ऑक्टोबर [ जागतिक स्ट्रोक दिन ]

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
227

२९ ऑक्टोबर : जन्म

१८९७: जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते जोसेफ गोबेल्स यांचा जन्म.

१९३१: साहित्यिक व पटकथालेखक प्रभाकर तामणे यांचा जन्म.

१९७१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांचा जन्म.

१९८५: इंग्लिश मोटरसायकल रेसर कॅल क्रचलो यांचा जन्म.

१९८५: भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्म.

२९ ऑक्टोबर  : मृत्यू

१९११: हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांचे निधन.

१९३३: फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ पॉल पेनलीव्ह यांचे निधन.

१९७८: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचे निधन.

१९८१: अभिनेते दादा साळवी यांचे निधन.

१९८८: मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे निधन.

 २९ ऑक्टोबर: महत्वाच्या घटना

१८९४: महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना.

१९२२: बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान बनले.

१९५८: महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्‍न पुरस्कार प्रदान.

१९६१: संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.

१९६४: टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.

१९९४: विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.

१९९६: स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्‍कम येथे कार्यान्वित करण्यात आली.

१९९६: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड.

१९९७: माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकर‍त्‍न पुरस्कार‘ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर.

१९९७: अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.

१९९९: चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान.

२००५: दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार.

२००८: डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.

२०१५: चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.

 


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम