Dinvishesh 29 November | दिनविशेष : 29 नोव्हेंबर

Dinvishesh 29 November

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
267

Dinvishesh 29 November | दिनविशेष : 29 नोव्हेंबर 

Dinvishesh 29 November : जन्म

१८०३: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ क्रिस्चीयन डॉपलर यांचा जन्म.

१८४९: ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ सर जॉन अँब्रोझ फ्लेमिंग यांचा जन्म.

१८६९: समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९५१)

१८७४: नोबेल पारितोषिक विजेते सेरेब्रल एँजिओग्राफी तंत्राचे निर्माते अंतोनियो मोनिझ यांचा जन्म.

१९०७: प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून २०००)

१९०८: तमिळ चित्रपट अभिनेता एन. एस. क्रिश्नन यांचा जन्म.

१९१९: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक जोई वीडर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१३)

१९२०: स्पॅनडेक्सचे निर्माते जोसेफ शेव्हर्स यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर २०१४)

१९२६: लेखक, पत्रकार प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९६)

१९३२: फ्रान्सचे ३२ वे राष्ट्रपती जाक्स शिराक यांचा जन्म.

१९६३: भारतीय उद्योगपती ललित मोदी यांचा जन्म.

१९७७: पाकिस्तानी क्रिकेटपटू युनिस खान यांचा जन्म.

Dinvishesh 29 November : मृत्यू

१९२६: ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, केरळ कोकिळ या मासिकाचे संस्थापक व संपादक कृष्णाजी नारायण आठल्ये यांचे निधन.

१९३९: मराठी भाषेतील कवी आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव ज्युलियन यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८९४)

१९५०: महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी बाया कर्वे यांचे निधन.

१९५९: मराठी इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचे निधन. (जन्म: १७ मे १८६५)

१९९३: जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. (जन्म: २९ जुलै १९०४)

२००१: बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १९४३)

२०११: आसामी साहित्यिक व कवियत्री इंदिरा गोस्वामी यांचे निधन.

Dinvishesh 29 November : महत्वाच्या घटना

१८७७: थॉमस एडिसन यांनी पहिल्यांदा फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले.

१९४५: युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.

१९६३: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरन समिती नेमली.

१९७२: अटारी यांनी पोंग हा गेम प्रकाशित केला.

१९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर.

२०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्‍कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर.

२०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

 

 

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Dinvishesh 29 November

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम