Dinvishesh 27 August | दिनविशेष : २७ ऑगस्ट

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
327

Dinvishesh 27 August | दिनविशेष २७ ऑगस्ट

Dinvishesh 27 August : जन्म

१८५४: प्रख्यात कायदेपंडित, विद्वान राजकीय नेते दादासाहेब खापर्डे यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९३८)

१८५९: उद्योगपती व लोकहितबुद्धी सर दोराबजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९३२)

१८७७: रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक चार्ल्स रॉल्स यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १९१०)

१९०८: अमेरिकेचे ३६वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७३)

१९०८: ऑस्ट्रेलियन विक्रमवीर फलंदाज क्रमवीर सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी २००१)

१९१०: इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते सेतू माधवराव पगडी यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९४)

१९१६: रेंज रोव्हर चे सहरचनाकार गॉर्डन बाशफोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १९९१)

१९१९: संतसाहित्याचे अभ्यासक वि. रा. करंदीकर यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल २०१३)

१९२५: रहस्यकथाकार नारायण धारप यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट २००८)

१९२५: भारतीय कवीजसवंत सिंग नेकी यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर २०१५)

१९३१: भारतीय अध्यात्मिक गुरु चिन्मोय कुमार घोस उर्फ श्री चिन्मोय यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर २००७)

१९७२: मल्ल दिलीपसिंग राणा ऊर्फ ग्रेट खली यांचा जन्म.

१९८०: भारतीय अभिनेत्री नेहा धुपिया यांचा जन्म.

Dinvishesh 27 August : मृत्यू

१८७५: बॅंक ऑफ कॅलिफोर्निया चे संस्थापक विलियम चॅपमन राल्स्टन यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८२६)

१९५५: संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट १८७९)

१९७६: हिंदी चित्रपटातील पार्श्वगायक मुकेश चंद माथूर तथा मुकेश यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९२३)

१९९५: भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते मधू मेहता यांचे निधन.

२०००:  रंगभूमी, चित्रपट मालिकांतील अभिनेत्री मनोरमा वागळे यांचे निधन.

२००६: चित्रपट दिग्दर्शक हृषीकेश मुकर्जी यांचे निधन. (जन्म: ३० सप्टेंबर १९२२)

Dinvishesh 27 August : महत्वाच्या घटना

१९३९: सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन निर्मित Heinkel He 178 या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.

१९५७: मलेशियाची राज्यघटना अमलात आली.

१९६६: वसंत कानेटकर लिखित पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग.

१९९१: युरोपियन महासंघाने इस्टोनिया, लाटव्हिया लिथुआनिया या देशांच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.

१९९१: मोल्डोव्हाने सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम