दिनविशेष : २६ ऑगस्ट- महिला समानता दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
233

Dinvishesh 26 August | दिनविशेष : २६ ऑगस्ट

महिला समानता दिन : २६ ऑगस्ट

  1. . महिला समानता दिन साजरा करण्याची औपचारिक सुरुवात १८७१ पासून झाली.
  2. न्यूझीलंड १८८३ मध्ये प्रथमच महिला समानता लागू करणारा पहिला देश बनला.
  3. अमेरिकेत २६ ऑगस्ट १९२० रोजी १९ व्या घटनादुरुस्तीद्वारे महिलांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला. पूर्वी तेथे महिलांना द्वितीय श्रेणी नागरिकांचा दर्जा होता.
  4. महिलांना समान दर्जा मिळावा यासाठी सतत लढा देत असलेली एक महिला वकील बेला अबजुग यांच्या प्रयत्नातून १९७१ पासून २६ ऑगस्ट हा ‘महिला समानता दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे.
  5. भारतात स्वातंत्र्यापासून महिलांना मतदानाचा अधिकार होता, परंतु पंचायत आणि नगरपालिका संस्थांमध्ये निवडणूक लढवण्याचा कायदेशीर अधिकार ७३ व्या घटनादुरुस्तीद्वारे मिळाला.
  6. याचा परिणाम म्हणून, आज भारतातील पंचायतीमध्ये महिलांचा ५० टक्क्यांहून अधिक सहभाग आहे.

Dinvishesh 26 August : जन्म

१७४०: हॉट एअर बलून चे शोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १८१०)

१७४३: आधुनिक रसायनशास्त्राचा जनक अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझियर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १७९४)

१९१०: भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९७)

१९२२: समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ग. प्र. प्रधान यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे २०१०)

१९२७: प्रख्यात वास्तुविशारद बी. व्ही. दोशी यांचा जन्म.

१९२८: हिरो साइकिलचे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०१५)

१९४४: लेखक सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्म.

Dinvishesh 26 August : मृत्यू

१७२३: डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लीवेनहॉक यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १६३२)

१९४८: नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी खाडिलकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८७२)

१९५५: मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव यांचे निधन.

१९५५: मल्याळी चित्रपट अभिनेते बालन के. नायर यांचे निधन.

१९७४: पॅरिस ते न्यूयॉर्क ही ५,८०० कि.मी. विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धा साडे ३३ तासात जिंकणारा वैमानिक चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १९०२)

१९९९: डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू नरेन्द्रनाथ यांचे निधन.

२०१२: चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचेनिधन.  (जन्म: १ फेब्रुवारी १९१७)

Dinvishesh 26 August : महत्वाच्या घटना

१३०३: अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.

१४९८: मायकेल अँजेलो याने पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.

१७६८: कॅप्टन जेम्स कूक पहिल्या सफरीवर निघाले.

१७९१: जॉन फिच यांना स्टीमबोट साठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले.

१८८३: सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३६ गावे उध्वस्त ३६,००० लोकांचा बळी.

१९४४: दुसरे महायुद्ध – चार्ल्स गॉलने पॅरिसमधे प्रवेश केला.

१९७२: जर्मनीतील म्युनिच येथे २०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

१९९४: लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर.

१९९६: दक्षिण कोरियात १९७९ मध्ये झालेल्या लष्करी कटाबद्दल माजी अध्यक्ष चुन दू वान यांना मृत्यूदंडाची तर त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताय वू यांना साडेबावीस वर्षे कारावासाची शिक्षा.

26 August dinvishesh in Marathi,

26 August dinvishesh in English,

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम