Dinvishesh 18 September | दिनविशेष : 18 सप्टेंबर

Dinvishesh 18 September

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
153

Dinvishesh 18 September | दिनविशेष : 18 सप्टेंबर 

Dinvishesh 18 September : जन्म

५३: रोमन सम्राट ट्राजान यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट ११७)

१७०९: ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, व विचारवंत सॅम्युअल जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १७८४)

१९००: मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९८५)

१९०५: हॉलीवूड अभिनेत्री ग्रेटा गार्बो यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल १९९०)

१९०६: हिन्दी हास्यकवी प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९५ – हाथरस, उत्तर प्रदेश)

१९१२: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक राजा नेने यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७५)

१९४५: मॅक्फि चे संस्थापक जॉन मॅक्फि यांचा जन्म.

१९५०: भारतीय अभिनेते विष्णुवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर २००९)

१९६८: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि राजकारणी उपेंद्र राव यांचा जन्म.

१९७१: अमेरिकन सायक्लिस्ट लान्स आर्मस्ट्राँग यांचा जन्म.

 

Dinvishesh 18 September : मृत्यू

१७८३: स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १७०७)

१९९२: भारताचे सहावे उपराष्ट्रपती मुहम्मद हिदायतुल्लाह यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९०५ – लखनौ, उत्तर प्रदेश)

१९९३: विनोदी अभिनेते व दिग्दर्शक असित सेन यांचे निधन.

१९९५: हिन्दी हास्यकवी, पद्मश्री प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९०६)

१९९९: मराठी चित्रपट दिग्दर्शक अरुण वासुदेव कर्नाटकी यांचे निधन.

२००२: साहित्यिक शिवाजी सावंत यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९४०)

२००४: दलित साहित्याचे समीक्षक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचे निधन.

२०१३: भारतीय राजकारणी वेलियाम भरगवण यांचे निधन.

 

Dinvishesh 18 September : महत्वाच्या घटना

१५०२: शेवटच्या सफरीत ख्रिस्तोफर कोलंबस होंडुरास येथे पोचले.

१८१०: चिली देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.

१८८२: पॅसिफिक स्टॉक एक्सचेंजची सुरूवात झाली.

१८८५: कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या.

१९१९: नेदरलंड देशामध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्‍क मिळाला.

१९२४: गांधीजींचे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू.

१९२७: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना.

१९४७: अमेरिकन गुप्तचर संघटना सी. आय. ए. (CIA) ची स्थापना.

१९४८: निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ऑपरेशन पोलो स्थगित करण्यात आले.

१९६०: फिडेल कॅस्ट्रो क्यूबाच्या शिष्टमंडळचे प्रमुख म्हणून संयुक्त राष्ट्रात आले.

१९६२: बुरुंडी, जमैका, र्‌वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९९७: महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना.

१९९९: साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.

२००२: दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

२००९: रेडिओवर सलग १५ वर्षे आणि टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे सुरू असलेल्या द गायडिंग लाइट या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.

२०१६: सरकारविरोधी दहशतवाद्यांनी कश्मीरमध्ये १७ भारतीय लष्कराचे जवान ठार मारले.

 

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Dinvishesh 18 September | दिनविशेष : 18 सप्टेंबर

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम