दिनविशेष : १७ ऑक्टोबर

आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
256

आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन

१७ ऑक्टोबर : जन्म

१८१७: भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचा जन्म.

१८६९: भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांचा जन्म.

१८९२: कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचा जन्म.

१९१७: वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोर यांचा जन्म.

१९३०: अटकिन्स आहार चे निर्माते रॉबर्ट अटकिन्स यांचा जन्म.

१९४७: चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका सिम्मी गरेवाल यांचा जन्म.

१९५५: अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म.

१९६५: श्रीलंकेचे क्रिकेटपटू अरविंद डिसिल्व्हा यांचा जन्म.

१९७०: भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांचा जन्म.

१७ ऑक्टोबर : मृत्यू

१७७२: अफगणिस्तानचे राज्यकर्ता अहमदशाह दुर्रानी (दुराणी) यांचे निधन.

१८८२: इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे निधन.

१८८७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव्ह किरचॉफ यांचे निधन

१९०६: जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली.

१९८१: भारतीय लेखक, कवी आणि गीतकार कन्नादासन यांचे निधन.

१९९३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचे निधन.

२००८: ललित लेखक रविन्द्र पिंगे यांचे निधन.

२००८: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस चे सहसंस्थापक बेन व्हिडर यांचे निधन.

१७ ऑक्टोबर : महत्वाच्या घटना

१८३१: मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.

१८८८: थॉमस एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफ (प्रथम चित्रपट) साठी पेटंट दाखल केले.

१९१७: पहिले महायुद्ध – इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्बहल्ला केला.

१९३१: माफिया डॉन अल कपोन यांना आयकर बुडवल्याबद्दल शिक्षा झाली.

१९३३: अल्बर्ट आइनस्टाइ हे नाझी जर्मनीतुन पळून अमेरिकेत आले.

१९३४: प्रभात चा अमृतमंथन हा चित्रपट पुण्याच्या प्रभात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९४३: बर्मा रेल्वे – रंगून ते बँकॉक हा रेल्वेमार्ग पूर्ण झाला.

१९५६: पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र अधिकृतपणे ईंग्लंडमध्ये सुरु झाले.

१९६६: बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम