Dinvishesh 16 September | दिनविशेष 16 सप्टेंबर

Dinvishesh 16 September -

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
99

Dinvishesh 16 September | दिनविशेष 16 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन

१९९५ सालापासून दरवर्षी १६ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UN) पर्यावरण कार्यक्रम विभागातर्फे “आंतरराष्ट्रीय ओझोन दिन” साजरा केला जातो. ओझोन थराच्या संरक्षणासाठी १९८७ साली ह्या दिवशी कॅनडातील मॉन्ट्रिएल शहरात जगभरातील प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या. हा करार होता ओझोनच्या थरास हानीकारक ठरणार्‍या पदार्थांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा. पृथ्वीला आणि पर्यायाने पृथ्वीवासीयांना घातक गोष्टींपासून वाचवणार्‍या ओझोन थराचे संरक्षण करण्याबाबत सजगता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना प्रयत्नशील असते. पृथ्वीच्या पर्यावरणाला हानी पोहोचवण्यामध्ये मानवी घटक सहभागी असल्याची जाणीवही हा दिवस आपल्याला करून देतो.

Dinvishesh 16 September : जन्म

१३८०: फ्रान्सचा राजा चार्ल्स (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १४२२)

१३८६: इंग्लंडचा राजा हेन्‍री (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १४२२)

१८५३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन डॉक्टर आल्ब्रेख्त कॉसेल यांचा जन्म.

१८८८: बेंटले मोटर्स लिमिटेड चे डब्ल्यू ओ. बेंटले यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९७१)

१९०७: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९९१)

१९१३: रुचिरा या पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई ओगले यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९९९)

१९१६: विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)

१९२३: सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यी यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१५)

१९२५: आयर्लंडचे पंतप्रधान चार्ल्स हॉगे यांचा जन्म.

१९४२: निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी ना. धों महानोर यांचा जन्म.

१९५४: सतारवादक संजय बंदोपाध्याय यांचा जन्म.

१९५६: अमेरिकन जादूगार डेव्हिड कॉपरफिल्ड यांचा जन्म.

Dinvishesh 16 September : मृत्यू

१७३६: जर्मन शास्त्रज्ञ डॅनियल फॅरनहाइट यांचे निधन. (जन्म: २४ मे १६८६)

१८२४: फ्रान्सचा राजा लुई (अठरावा) यांचे निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १७५५)

१९८४: बिकीनि चे निर्माते लुई रायर्ड यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९८४)

१९३२: हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॉस यांचे निधन. (जन्म: १३ मे १८५७ – आल्मोडा, उत्तराखंड)

१९६५: अमेरिकन अॅनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेड क्विम्बी यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८८६)

१९७३: पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचे निधन.

१९७७: हिंदूस्तानी शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचे निधन. (जन्म: १३ जुलै १८९२)

१९९४: साहित्यिक, नाटककार व पत्रकार जयवंत दळवी यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १९२५)

२००५: लेसर चे शोधक गॉर्डन गूल्ड यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९२०)

२०१२: आयमॅक्स चे सहसंस्थापक रोमन कोरियटर यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९२६)

Dinvishesh 16 September : महत्वाच्या घटना

१६२०: मेफ्लॉवर जहाजाने साउदॅम्पटन बंदरातुन उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले.

१९०८: जनरल मोटर्स कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना झाली.

१९३५: इंडियन कंपनीज अॅक्ट अन्वये बँक ऑफ महाराष्ट्रची नोंदणी.

१९४५: दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याची शरणागती.

१९६३: मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.

१९६३: झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.

१९७५: पापुआ न्यूगिनी ऑस्ट्रेलियापासुन स्वतंत्र झाला.

१९८७: ओझोनच्या थराच्या कमीत कमी संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे.

१९९७: आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राजीव बालकृष्णनचा १०० मीटर धावण्याचा १०.५० सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम.

१९९७: निवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बास अली बिराजदार यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित हा पुरस्कार जाहीर.

 

 

आंतरराष्ट्रीय ओझोन दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम