दिनविशेष १५ सप्टेंबर राष्ट्रीय अभियंता दिन , आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन

182

Dinvishesh 15 September | दिनविशेष १५ सप्टेंबर राष्ट्रीय अभियंता दिन| आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन

Dinvishesh 15 September : जन्म

१२५४: इटालियन फिरस्ता व दर्यावर्दी मार्को पोलो यांचा जन्म. (मृत्यू: ८ किंवा ९ जानेवारी १३२४)

१८६१: भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)

१८७६: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९३८)

१८८१: इटालियन ऑटोमोबाइल अभियंते एत्तोरे बुगाटी यांचा जन्म.

१८९०: इंग्लिश रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९७६)

१९०५: नाटककार, समीक्षक व हिंदी कवी राजकुमार वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९०)

१९०९: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९६९)

१९०९: स्वा. सैनिक, सहकारी चळवळीतील नेते रत्नाप्पा कुंभार यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९९८)

१९२१: रंगभूमी अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर २००६)

१९२६: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचा आग्रा येथे जन्म.

१९३५: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक दगडू मारुती तथा दया पवार यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९९६)

१९३९: अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांचा जन्म.

१९४६: दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि पंच माईक प्रॉक्टर यांचा जन्म.

१९८९: न्यूझीलंडचा संगीतकार चेतन रामलू यांचा जन्म.

Dinvishesh 15 September : मृत्यू

१९९८: गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक विश्वनाथ लवंदे यांचे निधन.

२००८: साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचे निधन. (जन्म: २५ ऑगस्ट १९२३)

२०१२: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचे निधन. (जन्म: १८ जून १९३१)

 

Dinvishesh 15 September : महत्वाच्या घटना

१८१२: नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन थडकले.

१८२१: कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडुरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हाडोर या देशांचा स्वातंत्र्यदिन.

१८३५: चार्ल्स डार्विन जहाजातून गॅलापागोस द्वीपात पोहोचले.

१९१६: पहिल्या महायुद्ध – पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर.

१९३५: भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डून स्कूल सुरू झाले.

१९३५: जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.

१९४८: भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले.

१९४८: एफ-८६ सेबरजेट प्रकारच्या विमानाने ताशी १,०८० किमीची गती गाठून उच्चांक नोंदवला.

१९५३: श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.

१९५९: प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.

१९५९: निकिता क्रुस्चेव्ह हे अमेरिकेला भेट देणारे पहिले रशियन नेते.

१९६८: सोव्हिएत संघाच्या झाँड ५ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.

१९७८: तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे मुहम्मद अली हे पहिले बॉक्सर बनले.

२०००: ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २७व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू.

२००८: लेहमन ब्रदर्सया वित्तीय संस्थेची अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी दिवाळखोरी.

२०१३: निना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली.

 

 

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम