दिनविशेष :१५ ऑक्टोबर २०२१ जागतिक विद्यार्थी दिन

जागतिक हातधुणे दिन / जागतिक विद्यार्थी दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
320

जागतिक विद्यार्थी दिन

जागतिक हातधुणे दिन

१५ ऑक्टोबर : जन्म

१५४२: तिसरा मुघल सम्राट बादशाह अकबर यांचा जन्म.

१६०८: इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचे (barometer) संशोधक इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचा जन्म.

१८४१: जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचा जन्म.

१८८१: इंग्लिश लेखक पी. जी. वूडहाऊस यांचा जन्म.

१८९६: स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती सेठ गोविंद दास यांचा जन्म.

१९०८: कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जे. के. गालब्रेथ यांचा जन्म.

१९२०: अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचा जन्म.

१९२६: कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्म.

१९३१: वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म.

१९३४: कर्नाटिक शैलीचे बासरीवादक एन. रामाणी यांचा जन्म.

१९४६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक व्हिक्टर बॅनर्जी यांचा जन्म.

१९४९: पत्रकार, एन. डी. टी. व्ही. चे संस्थापक प्रणोय रॉय यांचा जन्म.

१९५५: भारतीय फील्ड हॉकी खेळाडू कुलबुर भौर यांचा जन्म.

१९५७: भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका मीरा नायर यांचा जन्म.

१९६९: मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर यांचा जन्म.

१५ ऑक्टोबर : मृत्यू

१७८९: उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध न्यायाधीश रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे यांचे निधन.

१७९३: फ्रेंच राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांची विधवा पत्नी मेरी अँटोनिएत हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला.

१९१७: पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर माता हारी यांचे निधन.

१९१८: भारतीय गुरू आणि संत शिर्डीचे साई बाबा यांचे निधन.

१९३०: डाऊ केमिकल कंपनी चे संस्थापक हर्बर्ट डाऊ यांचे निधन.

१९४४: ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचे निधन.

१९४६: जर्मन नाझी हर्मन गोअरिंग यांचे निधन.

१९६१: हिन्दी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचे निधन.

१९८१: इस्रायली सेना प्रमुख व परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री मोशे दायान यांचे निधन.

१९९७: मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक दत्ता गोर्ले यांचे निधन.

२००२: प्रसिद्ध एेतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार यांचे निधन.

२००२: लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचे निधन.

२०१२: कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान नॉरदॉम सिहानोक यांचे निधन.

 १५ ऑक्टोबर: महत्वाच्या घटना

१८४६: अमेरिकन डॉक्टर डॉ. जॉन वॉरेन यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.

१८७८: एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनीचे काम सुरू झाले.

१८८८: गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.

१९१७: पहिले महायुद्ध – जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.

१९३२: टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्त्वात आली.

१९६८: हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक प्रदान.

१९७३: हेन्री किसिंजर आणि ली डक यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.

१९७५: बांगलादेशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा शेवटचा रुग्ण ठरली.

१९८४: आर्च बिशप डेसमंड टुटू यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.

१९९३: अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर.

१९९७: भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा बुकर पुरस्कार मिळाला.

१९९९: जागतिक फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठी यांना प्रदान.

 


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम