Dinvishesh 10 October | दिनविशेष 10 ऑक्टोबर

Dinvishesh 10 October | जागतिक मानसिक आरोग्य दिन | जागतिक लापशी दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
290

Dinvishesh 10 October | दिनविशेष 10 ऑक्टोबर | जागतिक मानसिक आरोग्य दिन | जागतिक लापशी दिन

Dinvishesh 10 October: जन्म

१७३१: हायड्रोजन आणि आॅरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञहेन्री कॅव्हेंडिश यांचा जन्म.

१८३०: स्पेनची राणी इसाबेला (दुसरी) यांचा जन्म.

१८४४: रा. काँग्रेसचे ३रे अध्यक्ष बद्रुद्दिन तैय्यबजी यांचा जन्म.

१८७१: निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचा जन्म.

१८७७: मॉरिस मोटर्सचे संस्थापक विल्यम मॉरिस यांचा जन्म.

१८९९: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म.

१९०२: कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट निर्माते के. शिवराम कारंथ यांचा जन्म.

१९०६: इंग्रजी भाषेतून लेखन करणारे भारतीय लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचा जन्म.

१९०९: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचा जन्म.

१९१०: हिंदी-चिनी मैत्रीचे प्रतीक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म.

१९१२: भारतीय कवी आणि समीक्षक राम विलास शर्मा यांचा जन्म.

१९१६: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला मूळगावकर यांचा जन्म.

१९५४: चित्रपट अभिनेत्री रेखा यांचा जन्म.

Dinvishesh 10 October : मृत्यू

१८९८: अष्टपैलू लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचे निधन.

१९११: जॅक डॅनियल चे संस्थापक जॅक डॅनियल यांचे निधन.

१९६४: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते गुरू दत्त यांचे निधन.

१९८३: मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री रुबी मायर्स ऊर्फ सुलोचना यांचे निधन.

२०००: श्रीलंकेच्या ६व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचे निधन. त्यांनीच सिलोन हे नाव बदलून श्रीलंका केले.

२००५: युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटे यांचे निधन.

२००६: शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचे निधन.

२००८: कथ्थक नर्तिकारोहिणी भाटे यांचे निधन

२०११: गझल गायक जगजित सिंग यांचे निधन.

Dinvishesh 10 October: महत्वाच्या घटना

१८४६: इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला.

१९११: चीनमध्ये किंग वंशाचा शेवट.

१९१३: पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.

१९४२: सोव्हिएत युनियनचे ऑस्ट्रेलिया बरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९४४: दुसरे महायुद्ध – ८०० जिप्सी बालकांना छळ छावणीत ठार केले.

१९५४: श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले.

१९६०: विद्याधर गोखले यांच्या ’सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९६४: जपानमधील टोकियो येथे १८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९७०: फिजीला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.

१९७५: पापुआ न्यू गिनी चा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश केला.


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम