Dinvishesh 1 September | दिनविशेष : १ सप्टेंबर

जागतिक पत्रलेखन दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
278

Dinvishesh 1 September | दिनविशेष : १ सप्टेंबर

जागतिक पत्रलेखन दिन

जागतिक पत्रलेखन दिन, दरवर्षी 1 सप्टेंबरला साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये पत्रलेखनाची परंपरा जपणे आणि त्या अनुषंगाने व्यक्तिमत्व विकासास प्रोत्साहन देणे. इंटरनेट, ई-मेल्स, आणि सोशल मीडियाच्या युगात पत्रलेखनाची परंपरा कमी झाली आहे. पत्रं हा एक वैयक्तिक आणि संवेदनशील संवादाचा मार्ग असतो. हे केवळ शब्दांचं नव्हे, तर त्या शब्दांमागील भावना, विचार आणि मनाचा आविष्कार असतो.

पत्रलेखनाद्वारे आपण आपल्या भावना, विचार, अनुभव आणि स्वप्नं व्यक्त करू शकतो. पत्रं लिहिताना शब्दांमध्ये अधिक काळजी, नेमकं विचार आणि आत्मसंयम आवश्यक असतो. पत्रं हे कायमस्वरूपी स्वरूपाचं असतात, ज्यांना आपण पुन्हा पुन्हा वाचू शकतो, जपून ठेवू शकतो.

या दिवसाच्या निमित्ताने लोकांना पत्रं लिहिण्याचं महत्त्व पटवून दिलं जातं आणि त्या जुन्या सुंदर परंपरेला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला जातो. वर्ल्ड लेटर राइटिंग डे आपल्याला आपल्या प्रियजनांशी संपर्क साधण्याची, त्यांच्या मनाचा ठाव घेण्याची एक अनोखी संधी देतो. पत्रं लिहिण्याची परंपरा जपून ठेवणं हे आपल्यासाठी सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे.

Dinvishesh 1 September: जन्म

१७९५: न्यूयॉर्क हेरॉल्ड चे संस्थापक जेम्स गॉर्डन बेनेट सीनियर यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १८७२)

१८१८: कोस्टा रिका देशाचे पहिले राष्ट्रपती जोस मारिया कॅस्ट्रो माद्रीझ यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १८९२)

१८९५: मानव-सक्षम विमानांचे निर्मिते एंगलबर्ट जशचा यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून १९५५)

१८९६: हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७७)

१९०८: हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक के. एन. सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २०००)

१९१५: ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक राजिंदरसिंग बेदी यांचा जन्म.

१९२१: यष्टीरक्षक व फलंदाज माधव मंत्री यांचा जन्म.

१९३०: भारतीय आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून २०१५)

१९३१: भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०१२)

१९४६: दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष रोह मू-ह्युन यांचा जन्म.

१९४९: लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री पी. ए. संगमा यांचा जन्म.

१९७०: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आणि लेखक पद्मा लक्ष्मी यांचा जन्म.

 

 

Dinvishesh 1 September : मृत्यू

१५८१: शिखांचे चौथे गुरू गुरू राम दास यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १५३४)

१७१५: फ्रान्सचा राजा  लुई (१४वा) यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १६३८)

१८९३: प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८५०)

२००८: बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे. बाटा यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९१४)

२०१४: स्पॅनडेक्स चे   निर्माते योसेफ शेव्हर्स यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेबर १९३०)

 

 

Dinvishesh 1 September : महत्वाच्या घटना

१९०६: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अॅटॉर्नीची स्थापना झाली.

१९११: पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.

१९१४: रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.

१९२३: टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.

१९३९: जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्‍या महायुद्धाची सुरुवात झाली.

१९५१: अर्नेस्ट हेमिंग्वेयांची द ओल्ड मॅन अॅन्ड द सी ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाले.

१९५६: भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना.

१९६९: लिबीयात उठाव- हुकूमशहा मुअम्मर गडाफी सत्तेवर आला.

१९७२: अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.

१९७९: पायोनियर- ११ अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले.

१९८५: संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले.

१९९१: उझबेकिस्तान सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Dinvishesh 1 September

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम