Dinvishesh 09 October | दिनविशेष 9 ऑक्टोबर
Dinvishesh 09 October | जागतिक पोस्ट दिन
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Dinvishesh 09 October | दिनविशेष 9 ऑक्टोबर | जागतिक पोस्ट दिन
Dinvishesh 09 October : जन्म
१७५७: फ्रान्सचा राजा चार्ल्स (दहावा) यांचा जन्म.
१८५२: रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ एमिल फिशर यांचा जन्म. (मृत्यू १५ जुलै १९१९)
१८७६: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म.
१८७७: ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पण्डित गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचा जन्म.
१८९७: मद्रास राज्यचे ६वे मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांचा जन्म.
१९०६: सेनेगल देशाचे पहिले राष्ट्रपती लेओपोल्ड सेडर सेघोर यांचा जन्म.
१९२४: भारतीय सैनिक इमानुवेल देवेन्द्रर यांचा जन्म.
१९६६: इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांचा जन्म.
१९६६: प्लाझा मॅगझीनचे संस्थापक क्रिस्टोफर ओस्टलंड यांचा जन्म.
Dinvishesh 09 October : मृत्यू
१८९२: पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख यांचे निधन.
१९१४: बालवाङ्मयकार विनायक कोंडदेव ओक यांचे निधन.
१९५५: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचे निधन.
१९८७: कथकली नर्तक गुरू गोपीनाथ यांचे निधन.
१९९८: छायालेखक (Cinematographer) जयवंत पाठारे यांचे निधन.
१९९९: नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर यांचे निधन.
२०००: व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त इंडियन-स्कॉटिश कर्नल पॅट्रिक अँथनी पोर्टिअस यांचे निधन.
२००६: भारतीय वकील आणि राजकारणी कांशी राम यांचे निधन.
२०१५: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक रवींद्र जैन यांचे निधन.
Dinvishesh 09 October : महत्वाच्या घटना
१४१०: प्राग खगोलशास्त्रीय घडामोडींचा प्रथम उल्लेख करण्यात आला.
१४४६: हंगुल वर्णमाला कोरिया मध्ये प्रकाशित झाली.
१८०६: पर्शिया ने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.
१९६०: विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९६२: युगांडा देशाला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९८१: फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents