Dinvishesh 04 November | दिनविशेष : ४ नोव्हेंबर

Dinvishesh 04 November

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
304

Dinvishesh 04 November | दिनविशेष : ४ नोव्हेंबर

Dinvishesh 04 November : जन्म

१६१८: मुघल सम्राट औरंगजेब याचा जन्म. (मृत्यु ३ मार्च, इ.स. १७०७)

१८४५: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांचा शिरढोण जि. कुलाबा, रायगड येथे जन्म.

१८७१: मानववंशशास्त्रज्ञ शरदचंद्र रॉय यांचा जन्म.

१८८४: प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचा जन्म.

१८९४: कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म.

१८९७: भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्माल यांचा जन्म.

१९१६: बार्बी बाहुलीच्या निर्मात्या रुथ हँडलर यांचा जन्म.

१९२५: चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक ऋत्विक घटक यांचा जन्म.

१९२९: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचा जन्म.

१९२९: गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतलादेवी यांचा जन्म.

१९३०: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रंजीत रॉय चौधरी यांचा जन्म.

१९३४: दिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्म.

१९३९: चालते बोलते गणिती यंत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतलादेवी यांचा जन्म.

१९५०: व्हर्जिन ग्रुपचे सहसंस्थापक निग पॉवेल यांचा जन्म.

१९५५: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अल्हाज मौलाना घोसी शाह यांचा जन्म.

१९७१: अभिनेत्री तब्बू यांचा जन्म.

Dinvishesh 04 November : मृत्यू

१९७०: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक पं. शंभू महाराज यांचे निधन.

१९९१: प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट यांचे निधन.

१९९२: मोटर-व्हीलचेअरचे निर्माते जॉर्ज क्लाईन यांचे निधन.

१९९५: इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते यित्झॅक राबिन यांचे निधन.

१९९८: हिंदी कवी नागार्जुन यांचे निधन.

१९९९: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू माल्कम मार्शल यांचे निधन.

२००५: इतिहासकार, वृत्तपत्रकार,कोशकार स. मा. गर्गे यांचे पुणे येथे निधन झाले.

२०११: नाटककार व साहित्यिक दिलीप परदेशी यांचे निधन.

Dinvishesh 04 November : महत्वाच्या घटना

१८९६: पुण्यात डेक्कन सभेची स्थापना.

१९१८: पहिले महायुद्ध – ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली.

१९२१: जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या.

१९२२: तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश.

१९४८: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.

१९९६: कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा नाट्यगौरव पुरस्कार डॉ. श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर

२०००: हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार जाहीर.

२००१: हॅरी पॉटर अण्ड फिलॉसॉफर्स स्टोन या चित्रपटाचा लंडन येथे प्रिमियर.

२००८: बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम