Dinvishesh 02 October | दिनविशेष २ ऑक्टोबर

Dinvishesh 02 October - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन, स्वच्छता दिन, बालसुरक्षा दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
296

Dinvishesh 02 October | दिनविशेष २ ऑक्टोबर |

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन, स्वच्छता दिन, बालसुरक्षा दिन

Dinvishesh 02 October : जन्म

१८६९: मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म.

१९०४: भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९६६)

९७१: गझनीचा महमूद यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १०३०)

१८४७: जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिन्डेनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९३४)

१८९१: पद्मश्री विजेते शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून १९६७)

१९०८: विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार गंगाधर बाळकृष्ण सरदार तथा गं. बा. सरदार यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९८८)

१९२७: शास्त्रीय गायक पं. दिनकर कैकिणी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी २०१०)

१९३९: भारतीय क्रिकेटपटू बुद्धी कुंदर यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून २००६)

१९४२: चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म.

१९४८: अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९९८)

१९६८: झेक लॉन टेनिस खेळाडू याना नोव्होत्‍ना यांचा जन्म.

१९७१: संगीतकार व गायक कौशल इनामदार यांचा जन्म.

 

 

२ ऑक्टोबर मृत्यू.

१९०६: चित्रकार राजा रविवर्मा याचं निधन. (जन्म: २९ एप्रिल १८४८)

१९२७: स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ स्वांते अर्‍हेनिअस याचं निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १८५९)

१९७५: स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री के. कामराज याचं निधन. (जन्म: १५ जुलै १९०३)

१९८५: अमेरिकन अभिनेते रॉक हडसन याचं निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १९२५)

 

२ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१९०९: रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.

१९२५: जॉन लोगी बेअर्ड यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.

१९५५: पेरांबूर येथे इन्टिग्रल कोच फॅक्टरी सुरू झाली.

१९५८: गिनी देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९६७: थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले.

१९६९: महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, ५, १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.

२००६: निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन,स्वच्छता दिन,बालसुरक्षा दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम