दिनकर जवळकर (1900-1934) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : 1900 - मृत्यू : 1932 )

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
2,889

महात्मा ज्योतिराव फुले यांची सत्यशोधक चळवळ व मुंबई व चेन्नई प्रांतात सुरू झालेली ब्राम्हणेतर चळवळ (१९१७ ते १९३७)पुढे नेण्याचे मोठे काम दिनकरराव जवळकर यांनी केले.

दिनकर जवळकर (1900-1934) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

दिनकर जवळकर
दिनकर जवळकर

गाव :  म्हातोबाची आळंदी (हवेली तालुका)

चळवळ : सत्यशोधक, ब्राह्मणोत्तर चळवळ (सहकारी – केशवराव जेधे )

लेखन : कैवारी, तेज (साप्ताहिक)

धर्म : सत्यधर्म

प्रभाव : छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महात्मा फुले, शाहु महाराज

पत्नी : इंदुलाई जवळकर

अपत्ये : तीन

  • १९१७-१९३७ मुंबई व चेन्नईत सत्यशोधक चळवळीला पुढे नेण्याचे काम त्यांनी केले.
  • छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना कैवारी वृत्तपत्र काढून दिले, ते त्याचे संपादकही होते.
  • ब्राह्मणेत्तर चळवळीत ते महाराष्ट्रातील धडाडीचे नेते होते.
  • टिळक व कृष्णाशास्त्री चिपळूनकर हे देशाचे दुश्मन आहेत असे त म्हणत. (टिळक तेल्या तंबोळ्याचे नाही सनातनी ब्राह्मणांचे पुढारी)
  • बहुजन समाजाची भटांनी पिळवणुक केली.
  • त्यांच्या लेखणीला तलवारीची धार होती. हे त्यांचे साहित्य वाचल्यावर कळून येते की अवघे ३४ जीवनमान लाभलेल्या या महापुरूषाचा पराक्रम संभाजी महाराजांसारखा धारदार होता.
  • दिनकरांचे शत्रु असलेले ब्राह्मण म्हणायचे हा माणुस जणू विषात बुडवून लेखणिने लिहीतो आहे.
  • त्यांची जयंती त्यांच्या गावच्या चावडीत चाळीस-पत्रास लोकांच्यात साजरी करून दिनकरांचे महत्त्व लोकांनी सांगितले.
  • सत्यशोधक दिनकरराव जवळकर पत्रकारिता पुरस्कार दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या खानवडी येथे होणाऱ्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनात दिला जातो.
  • साहित्य :
दिनकर जवळकर
दिनकर जवळकर
  1. देशाचे दुश्मन १९२५
  2. शेतक-यांची कैफियत
  3. शेतकऱ्यांचे हिंदूस्थान
  4. क्रांतीचे रणशिंग
  5. शिवस्मारक पुराण
  • देशाचे दुश्मन या बद्दल ल. ब. भोपटकर यांनी जिल्हाधिकान्याकडे फिर्याद केली.
  • प्रकाशन – केशवराव जेधे व प्रस्तावना – लेखक बागडे वकील या तिघांना ताबडतोब पकड़ – वॉरंटने कैद करून त्यांची येरवाडा जेलमध्ये झटपट रवानगीही झाली.
  • तिघाही आरोपीना शिक्षा झाल्या. त्यावर अपील झाले, अपील चालवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धाव घेतली.
  • यांनी आरोपींची बाजू लढवली आणि तिघांजणांची निदोष सुटका केली.
  •  3 मे 1932 रोजी जवळकरांचे निधन झाले.

लेखणीला तलवारीची धार

  • दिनकरराव जवळकर यांच्या लेखणीला तलवारीची धार होती, हे त्यांचे साहित्य वाचल्यावर कळून येते.
  • अवघे ३४ वर्षाचे जीवनमान लाभलेल्या या महापुरुषांचा पराक्रम छत्रपती संभाजी महाराजासारखाच धारदार होता.
  • दिनकररावांचे शत्रू असलेले ब्राम्हण म्हणायचेच.
  • हा माणूस जणू विषात बुडवून लेखणीने लिहितो आहे.
  • एवढी जहरी लेखणी चालवणारे दिनकरराव जवळकर यांच्या म्हातोबाची आळंदी या गावी त्यांची जयंती व पुण्यतिथी परिवतर्न चळवळीचे पुरस्कर्ते साहित्यिक लेखक पत्रकार दशरथ यादव यांनी २००४ साली सुरू केली.

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम