दादोबा पांडुरंग तर्खडकर (1814-1882) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८१४ - मृत्यू : १८८२)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
3,135
अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक. ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्‍न करणाऱ्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे प्रार्थना समाजाचे अर्धयु होते त्यांच्या प्रयत्नातूनच प्रार्थना समाजाची स्थापना झाली

दादोबा पांडुरंग तर्खडकर (1814-1882) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

दादोबा पांडुरंग तर्खडकर
दादोबा पांडुरंग तर्खडकर

जन्म: ९ मे १८१४ (मुंबई)

मुळ गाव : तर्खड (वसई जि. ठाणे)

प्राथमिक शिक्षण : बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी शाळेत.

  • १८३५ जावरा संस्थानच्या नवाबाचे शिक्षक.
  • १८३६ मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक म्हणून  – पाणिनी
  • एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट टीचर.
  • १८४४ मिठाच्या कराविरुद्ध मोर्चा
  • १८४४ सुरतमध्ये दुर्गाराम मंचाराम, दीनमणी शंकर दलपतराय यांच्या सहकार्याने मानवधर्म सभा स्थापन,
  • १८४६ बाळशास्त्री जांभेकरांच्या मृत्यनंतर त्यांच्या जागी टेनिंग कॉलेजचे संचालक म्हणून नियक्ती.
  • १८४८ ज्ञानप्रसारक सभेची स्थापना.
  • १८४९ परमहंस सभेच्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा.
  • १८५२ बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत मोलाचे कार्य.
  • १८५२ अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्ती.
  • १८५७ नगर येथील भिल्लांचे बंड मोडून काढल्याबद्दल सरकारकडून रावबहादूर हा किताब.
  • १८६२ नोकरीतून निवृत्त.

मराठी व्याकरण

१८३३ मध्ये शाळेत असताना आपणही मराठीचे व्याकरण लिहावे अशी दादोबांना इच्छा झाली. त्यांनी तसे एक व्याकरण प्रश्नोत्तर-स्वरूपात लिहूनही काढले. परंतु त्यांना स्वतःलाच ते न आवडल्याने लिंडली मर्फी ह्याच्या इंग्लिश व्याकरणाच्या धर्तीवर त्यांनी आपले व्याकरण नव्याने लिहून काढले. ह्या व्याकरणाची पहिली आवृत्ती १८३६ साली गणपत कृष्णाजीच्या छापखान्यात छापून महाराष्ट्र भाषेचे व्याकरण ह्या नावाने स्वतः दादोबांनीच प्रकाशित केली.

१८५० साली शिक्षणविभागाकरता ह्या व्याकरणाची दुसरी आवृत्ती दादोबांनी तयार केली. ही आवृत्ती शाळाखात्याकरता असल्याने मेजर थॉमस कॅन्डी, कृष्णशास्त्री चिपळूणकर ह्यांसारख्या शिक्षणविभागातील समकालीन विद्वानांकडून त्या आवृत्तीचे कसून परीक्षण करण्यात आले. ही आवृत्ती अमेरिकन मिशन प्रेसच्या छापखान्यात छापून प्रकाशित करण्यात आली.

१८६५ साली दादोबांनी आपल्या व्याकरणाची संक्षिप्त आवृत्ती मराठी लघु व्याकरण ह्या नावाने प्रकाशित केली. हे पुस्तक पुढे बराच काळ शालेय शिक्षणात प्रचलित होते. १८८२पर्यंत ह्या लघु व्याकरणाच्या १२ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १९४४ पर्यंत ह्या ग्रंथांच्या सुमारे १ लाख प्रती विकल्या गेल्या.

दादोबांच्या मृत्यूपर्यंत महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाच्या़ ७ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १८७९च्या सातव्या आवृत्तीपर्यंत दादोबा आपल्या व्याकरणात सुधारणा करत राहिले. १८८१ साली दादोबांनी मोठ्या महाराष्ट्र व्याकरणाची पूरणिका हा ग्रंथ प्रकाशित केला. ह्या ग्रंथात आपल्या मोठ्या व्याकरणात समाविष्ट करता न आलेली मराठी भाषेविषयीची निरीक्षणे त्यांनी संकलित केली आहेत.

दादोजींचे मराठी व्याकरणविषयक अग्रेसर कार्य महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.

आत्मचरित्र

तर्खडकरांचे इ.स. १८४६सालापर्यंतचे आत्मचरित्र हे मराठी आत्मचरित्रात्मक वाङ्मयात महत्त्वाचे आत्मचरित्र मानण्यात येते. हे आत्मचरित्र १९४७मध्ये अ.का. प्रियोळकर यांनी संपादित करून पुन:प्रकाशित केले. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच, शिवाय त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अश्या काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत.

या आत्मचरित्राचे ’दादोबा पांडुरंग यांचे आत्मवृत्त’ नावाचे मराठी रूपांतर झाले आहे.

ग्रंथसंपदा:

१) मराठी भाषेचे व्याकरण- १८३६                                                          २) मराठी व गुजराती नकाशांचे पुस्तक – १८३६

३) मराठी लघु व्याकरण – १८६५                                                           ४) धर्मविवेचन १८६८

५) विधवा श्रुमार्जन – संस्कृत लेख                                                           ६) परमहांसिक ब्राहम धर्म १८८०

७) मराठी भाषेच्या व्याकरणाची पुराणिका (१८६०)                          ८) शिशुबोध १८८४ (मरणोत्तर प्रकाशित)

 

दादोबा पांडुरंग तर्खडकर (1814-1882) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
दादोबा पांडुरंग तर्खडकर (1814-1882) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण (१८३६) त्यांनी सिद्ध केले. ह्या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या. १८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही (१८६५) त्यांनी लिहीले. त्याच्याही अनेक आवृत्या निघाल्या. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदापांडुरंगी  (१८६५) ही गद्य टीका त्यांनी लिहिली. तीतून दादोबांची सहृदयता प्रत्ययास येते.

ग्रंथलेखनाप्रमाणेच समाजसुधारणेचे कार्यही दादोबांनी केले. सरकारी नोकरी करीत असतानाच लोकहिताच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. दुर्गाराम मनसाराम मेहेता यांनी सुरतला स्थापन केलेली मानवधर्मसभा (१८४४) आणि राम बाळकृष्ण जयकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली परमहंस सभा (सु. १८४८) या धर्मसुधारक संस्थांमागे दादोबांची प्रेरणा होती. यांशिवाय मराठी ज्ञानप्रसारक सभा, मुंबई विद्यापीठ, पुनर्विवाहोत्तेजक सभा, बॉम्बे असोसिएशन इ. संस्थांच्या कार्यातही त्यांचा सहभाग असे.

भिल्लांचा बंडखोर पुढारी पटाजी नाईक याचे बंड त्यांनी १८५७ साली मोडून काढले व सरकारने रावबहादुर ही पदवी त्यांना बहाल केली. मुंबई येथे ते निधन पावले.

 

मृत्यू – १७ ऑक्टोबर १८८२

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम