दादाभाई नौरोजी (1825-1917) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
जन्म: ४ सप्टेंबर १८२५ मृत्यू: ३० जून १९१७
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
दादाभाई नौरोजी Dadabhai Naoroji यांना भारताचा ‘ग्रँड ओल्ड मॅन’ Grand Old Man म्हटले जाते. स्वातंत्र्यलढ्याचा पाया रचणाऱ्या आर्किटेक्ट म्हणून पाहिले जाणारे दादाभाई एक महान स्वातंत्र्यसेनानी होते.
दादाभाई नौरोजी (1825-1917) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
नाव: दादाभाई नौरोजी
वडील: नौरोजी पलंजी दोर्दी
आई: मानेकाबाई
पत्नी: गुलाबाई
जन्म स्थान: मुंबई भारत
जन्म: ४ सप्टेंबर १८२५
मृत्यू: ३० जून १९१७
- मुंबईच्या नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या शाळेत शिक्षण पूर्ण.
- यानंतर, दादाभाईंनी मुंबईच्या ‘एल्फिन्स्टन संस्थेमधून’ साहित्याचा अभ्यास केला, जिथे त्यांनी जगातील साहित्य वाचले.
- दादाभाई गणित व इंग्रजीत चांगले होते.
- वयाच्या 15 व्या वर्षी दादाभाईंना क्लेअरने शिष्यवृत्ती दिली.
- शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्या कॉलेजमधले पहिले भारतीय प्राध्यापक.
- दादाभाई पारशी पुरोहित कुटुंबातील होते, त्यांनी 1 ऑगस्ट 1851 रोजी ‘राह्नूमाई मजदसानी सभा’ स्थापन केली होती.
- पारशी धर्मतील लोकांना एकत्रित करण्याचा त्यांचा हेतू होता.
- हि सोसायटी अजूनही मुंबईत चालू आहे.
- १८४८ दादोबा पांडुरंग, भाऊदाजी लाड यांच्या मदतीने ज्ञान प्रसारक सभा ही संस्था स्थापन केली. मुंबईत या सभेने पहिली मुलींची शाळा सुरु केली.
- १८५१ रास्त गोफ्तार हे साप्ताहिक लोकांमध्ये सामाजिक व राजकीय जागृती घडून आणण्यासाठी सुरु केले.
- १८५२ नाना शंकर शेठ व भाऊ दाजी लाड यांच्या सहकार्याने बॉम्बे असोसिएशनच्या राजकीय संघटनेची स्थापना.
- १८५२ मुंबई बॉम्बे असोसिएशनची स्थापना.
- १८५५ इंग्लडमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मार्फत भारतीय जनतेचे प्रश्न ब्रिटीश सरकारकडून निदर्शनास आणुन देण्याचे कार्य केले.
- १८६५ लंडन येथे लंडन इंडिया सोसायटीची स्थापना.
- १८६६ भारतीय जनतेचे प्रश्न इंग्लडच्या पार्लमेंट मध्ये मांडता यावे यासाठी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना.
- १८६६ इंग्लडमध्ये ईस्ट इंडिया सोसायटीची स्थापना.
- १८६७ भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावण्याचा पहिला प्रयत्न केला.
- १८७३ ब्रिटीश पार्लमेंटच्या समिती समोर भारताच्या आर्थिक स्थितीबद्दल साक्ष दिली. त्याच वेळी लुटीचा सिद्धांत निःसारण सिद्धांत (Drain theory) मांडला.
- १८७५-१८८३ मुंबई महानगरपालिकेचे सदस्य.
- १८८३ लाहोर व १९०६ कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष.
- १८८५ मुंबई प्रांतिक कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती.
- १८८५-१९०५ मवाळ मनवादी कालखंडातील काँग्रेसचे नेतृत्व केले.
- १८८५, १८९३, १९०६ या ३ वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष.
- १८८६ कलकत्त्यातील काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे ते पहिले पारशी अध्यक्ष.
- १८९२ इंग्लडच्या हुजुर पक्ष्यामार्फत फिन्सबरी मतदार संघातून निवडून आले. हाऊस ऑफ कॉमन्स वर निवडून जाणारे पहिले भारतीय.
- १८९७ वेल्बी कमिशनपुढे साक्ष
- १९०२ हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्य इंग्लडच्या फिन्सबरी मतदार संघातून निवड. ब्रिटिश संसदेचे ते पहिले हिंदी सदस्य बनले. रॉयल कमिशनचे पहिले भारतीय सदस्यही तेच.
- १९०६ कलकत्ता येथील अधिवेशनाच्या अध्यक्षीय पदावरून बोलतांना त्यांनी स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे. हे जाहिर केले. स्वदेशी स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार चतुःसुत्रीचा ठराव पास केला.
- पॉवर्टी अँड अन ब्रिटीश रूल इन इंडिया या त्यांच्या ग्रंथार त्यांनी सिद्ध केले की, भारतीय जनतेच्या दारिद्र्यास ब्रिटीश शासनच जबाबदार आहे. याच पुस्तकात मांडलेल्या सिद्धांतापैकी लुटिचा सिद्धांत महत्त्वाचा माणला जातो.
- राजकीय व सामाजिक कार्यातील संस्था ज्ञान प्रसारक सभा बॉम्बे असोसिएशन स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, पार्शी जिम खाणा कावसनी इन्स्टीट्यूट अल्बट म्युझिअम इ. संस्थामध्ये प्रमुख सहभाग.
- न्या. रानडे यांनी भारतीय राजकारणातील अद्विदल व्यक्ती त्यांचे अशा शब्दात वर्णन केले.
- दादाभाई नौरोजी हे उदार मतवादाचे पुरस्कर्ते होते.
- भारताचे ‘पितामह’ म्हणून नौरोजी यांना ओळखले जाते.
- भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents