चालू घडामोडी सराव पेपर – 24 सप्टेंबर 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर - 24 सप्टेंबर 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर - 24 सप्टेंबर 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6) टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 points2024 साली चंद्रावर पहिली महिला उतरविण्यासाठी NASA संस्थेनी आखलेल्या मोहिमेचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन (NASA) या अंतरराळ संशोधन संस्थेनी 1971 सालाच्या अपोलो मोहिमेनंतर, आता आर्टेमिस मोहिमेच्या अंतर्गत 2024 साली पुन्हा एकदा चंद्रावर माणूस उतरविणार आहे. तीन टप्प्यात ही मोहीम पूर्ण होणार आहे. त्यात 2 अंतराळवीर सामील असणार आहे आणि त्यात एक महिला असणार. ओरियन नावाच्या अंतराळ यानातून ते चंद्रावर जाणार आहेत.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी अभ्यास नामक हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (HEAT) वाहन तयार केले?
Correct
Incorrect
22 सप्टेंबर 2020 रोजी अभ्यास नामक हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (HEAT) म्हणजेच एका ड्रोनची उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. अभ्यास ची रचना आणि विकास संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (DRDO) एरोनॉटिकल डेव्हलपमेंट ईस्टॅब्लिशमेंट (ADE) या केंद्राने केले.
विविध क्षेपणास्त्र यंत्रणेचे मूल्यांकन करण्यासाठी लक्ष्य म्हणून अभ्यास चा उपयोग केला जाऊ शकतो. वाहनाच्या उड्डाणाचे प्रोग्रॅमिंग स्वतंत्रपणे केले जाऊ शकते. तसेच वाहनाची सर्व कार्यप्रणाली लॅपटॉपच्या मदतीने GSAवरून संचालित केली जाऊ शकते. -
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या दिवशी जागतिक गेंडा दिन साजरा केला जातो?
Correct
Incorrect
दरवर्षी 22 सप्टेंबर या दिवशी जागतिक गेंडा दिन साजरा केला जातो. 2010 साली वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (WWF) या संस्थेनी या दिनाची स्थापना केली होती.
जगात गेंडाच्या पाच प्रजाती आढळतात, त्यातल्या 2 आफ्रिकेत आणि 3 आशियामध्ये आहेत. आज, एक-शिंगी गेंड्याच्या एकूण जागतिक संख्येपैकी सुमारे 75 टक्के भारताच्या आसाम, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये आढळते. -
Question 4 of 10
4. Question
1 pointsन्यूट्रिनो हे काय आहे?
Correct
Incorrect
न्यूट्रिनो हे ब्रह्मांड तयार करणारे आकाराने सर्वात छोटे कण असतात. न्यूट्रिनो नावाप्रमाणेच विद्युतदृष्ट्या तटस्थ असतात आणि त्याचे वस्तुमान इतर कोणत्याही ज्ञात कणांपेक्षा शून्यसमान अगदीच कमी असते. सूर्य आणि पृथ्वीचे वातावरण हे न्यूट्रिनो कणांचे मुख्य स्रोत आहेत. न्यूट्रिनो डिटेक्टर नामक मॅग्नेटाईज्ड आयर्न कॅलोरीमीटर उपकरणाच्या मदतीने या कणांचा शोध घेतला जातो.
तामिळनाडू राज्याच्या थाटी जिल्ह्यात बोडी वेस्ट हिल्सच्या परिसरात जमिनीखाली भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार आहे. वर्तमानात, न्यूट्रिनो वेधशाळा कॅनडा, जापान आणि इटली या देशांमध्ये जमिनीखाली तर अंटार्क्टिका व फ्रान्स या देशांमध्ये समुद्राखाली आहेत. -
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या शहारातल्या संस्थेला भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदे (दुरुस्ती) विधेयक-2020 मार्फत राष्ट्रीय महत्त्व असलेली संस्था म्हणून घोषित करण्यात आले नाही?
Correct
Incorrect
भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदे (दुरुस्ती) विधेयक-2020 मार्फत सूरत, भोपाळ, भागलपूर, आगरतळा आणि रायचूर या शहरांमधल्या संस्थांना सार्वजनिक-खासगी भागीदारी पद्धतीत राष्ट्रीय महत्त्व असलेली संस्था म्हणून घोषित केले जाणार आहे. संसदेत हे विधेयक मंजूर झाले आहे. राष्ट्रीय महत्त्व असलेले विद्यापीठ किंवा संस्थांना बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा पीएचडी पदवी या नावांचा वापर करण्याचे अधिकार दिले जातात.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या राज्यात भारतातले दुसरे रॉकेट लॉंच पोर्ट तयार केले जाणार आहे?
Correct
Incorrect
तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातल्या कुलासेकरपट्टिनम येथे भारतातले दुसरे रॉकेट लॉंच पोर्ट तयार केले जाणार आहे. वर्तमानात, श्रीहरिकोटा येथे ISROचे एकमेव रॉकेट लॉंच पोर्ट आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकाकातीया राजवंश ची जागा कोणत्या कुळाने घेतली?
Correct
Incorrect
13व्या शतकात धरणीकोटा (आंध्रप्रदेश) येथे काकातीया शासक गणपती देवा या राजाने काकती देवीचे मंदिर बांधले, जे आता बालूसुलम्मा (दुर्गा देवी) देवीचे निवासस्थान बनले आहे. 12व्या आणि 13व्या शतकात या प्रदेशात दक्षिण भारतीय राजवंशचे साम्राज्य होते, ज्याची राजधानी ओरुगाल्लू होती जी आता वरंगल या नावाने ओळखले जाते. पुढे पाश्चात्य चालुक्य या कुळाने त्या साम्राज्यावर आपले आधिपत्य गाजवले.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsबॅसेल III अनुरुप रोखे याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. 2008 साली बॅसेल III मार्गदर्शके जाहीर करण्यात आली होती.
2. ट्रेडिंग बुक कार्यांसारख्या बहुतेक बँकिंग क्रियाकलाप भांडवलावर अधिक केंद्रित करणे हे बॅसेल III मानदंडांचे उद्दिष्ट आहे.
3. रोखे बँकेचे टियर II भांडवल म्हणून पात्र ठरतात आणि प्रत्येकाची मूळ किंमत 10 रुपये असते.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
केवळ 2 व 3 विधान अचूक असल्यामुळे पर्याय (C) उत्तर आहे.
2010 साली बॅसेल III मार्गदर्शके जाहीर करण्यात आली होती. ते 10 वर्षांच्या मुदत कालावधीसाठी 6.24 टक्के या वार्षिक कूपन दराने असतात. बॅसेल I आणि बॅसेल II अनुक्रमे 1988 आणि 2004 साली प्रसिद्ध झाले होते. -
Question 9 of 10
9. Question
1 pointsमेडिकानेस ही संज्ञा कश्यासंदर्भात आहे?
Correct
Incorrect
भूमध्य समुद्रावर तयार झालेल्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाला मेडिकानेस म्हटले जाते.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsन्यू स्टार्ट हा अमेरिका आणि _____ या देशांच्या दरम्यान झालेला एक करार आहे.
Correct
Incorrect
न्यू स्टार्ट करार हा अमेरिका आणि रशिया या देशांच्या दरम्यान झालेला एक करार आहे. हा अण्वस्त्रांची संख्या कमी करण्यासंबंधीचा करार आहे. 5 फेब्रुवारी 2011 रोजी हा करार लागू झाला.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents