चालू घडामोडी : 8 जुलै 2021
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 1 JULY 2021 | चालू घडामोडी : १ जुलै २०२१
चालू घडामोडी –
Q1] कोणत्या अंतराळ संस्थेने ‘रयुगू’ लघुग्रहावरील खडकांचे पहिले नमुने प्राप्त केले?
1) NASA
2) ISRO
3) CNES
4) रोसकॉसमॉस
उत्तर :- “हायाबुसा-2” हे जपानच्या जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) या अंतराळ संशोधन संस्थेनी लघुग्रह पृष्ठभागाची तपासणी करण्यासाठी पाठविलेले यान आहे. 2014 साली ते यान अंतराळात सोडण्यात आले होते. त्याने पृथ्वीपासून जवळपास 300 दशलक्ष किलोमीटर दूर असलेल्या ‘रयुगू’ अशनी किंवा लघुग्रहाचा अभ्यास केला आणि तेथील नमुने घेऊन आता ते यान पृथ्वीवर परतले आहे. लघुग्रहावरील खडकांचे पहिले नमुने अमेरिकेच्या NASA संस्थेकडे पाठविण्यात आले.
चालू घडामोडी –
Q2] 6 जुलै 2021 रोजी ______ या संस्थेने फास्टॅग किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) तंत्राचा वापर करून देयके स्वीकारणारी भारतातील पहिली करणारी पार्किंग सुविधा सुरू केली.
1) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन
2) मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन
3) कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन
4) यापैकी नाही
उत्तर :-6 जुलै 2021 रोजी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन या संस्थेने फास्टॅग किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) तंत्राचा वापर करून देयके स्वीकारणारी भारतातील पहिली करणारी पार्किंग सुविधा सुरू केली.
चालू घडामोडी –
Q3] कोणत्या विभागाने “ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स” (ONDC) प्रकल्पाचा प्रारंभ केला?
1) नीती आयोग
2) उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (DPIIT)
3) वाणिज्य विभाग
4) कृषी व सहकार विभाग (एग्रीकोऑप)
उत्तर :- 06 जुलै 2021 रोजी वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (DPIIT) “ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स” (ONDC) प्रकल्पाचा प्रारंभ केला. या प्रकल्पाची अंमलबजावणी भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) या संस्थेकडून केली जाईल.
चालू घडामोडी –
Q4] कोणत्या देशात ‘ताल’ ज्वालामुखी आहे?
1) थायलँड
2) भारत
3) फिलिपिन्स
4) मलेशिया
उत्तर :- ‘ताल’ ज्वालामुखी फिलीपिन्स या देशात आहे. हा देशातील दुसरा सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे.
चालू घडामोडी –
Q5] 6 जुलै 2021 रोजी श्रीनगरमधून ‘मिश्री चेरी’ या फळांची पहिली व्यावसायिक निर्यात _____ या शहराकडे करण्यात आली.
1) दुबई
2) माले
3) व्हिक्टोरिया
4) यापैकी नाही
उत्तर :- 6 जुलै 2021 रोजी श्रीनगरमधून ‘मिश्री चेरी’ या फळांची पहिली व्यावसायिक निर्यात दुबई (UAE) या शहराकडे करण्यात आली.
चालू घडामोडी –
Q6] कोळसा मंत्रालयाच्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, कोणते राज्य कोळसा उत्पादनात अग्रेसर आहे?
1) झारखंड
2) छत्तीसगड
3) मध्यप्रदेश
4) ओडिशा
उत्तर :-कोळसा मंत्रालयाच्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये भारताचे एकूण (कोकिंग आणि नॉन-कोकिंग) कोळसा उत्पादन 716.084 दशलक्ष टन होते. कोळसा उत्पादनात छत्तीसगड राज्याचा प्रथम क्रमांक लागतो आहे. छत्तीसगडच्या पाठोपाठ ओडिशा, मध्यप्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. झारखंडमध्ये कोकिंग कोळशाचे सर्वाधिक उत्पादन झाले.
चालू घडामोडी –
Q7] खालीलपैकी कोणत्या दृष्टीकोनातून भारत सरकारने ‘सहकार मंत्रालय’ची स्थापना केली?
1) सेवा हमारा पंथ है
2) सहकार से समृद्धि
3) नभा स्पर्शम दीपथम्
4) यापैकी नाही
उत्तर :-‘सहकार से समृद्धि’ या दृष्टीकोनातून भारत सरकारने ‘सहकार मंत्रालय’ची स्थापना केली आहे. मंत्रालय देशातील सहकारी चळवळीला बळकट करण्यासाठी स्वतंत्र न्यायिक, प्रशासकीय आणि धोरणात्मक कार्यचौकट प्रदान करेल.
चालू घडामोडी –
Q8] कोणती व्यक्ती 23 जुलै 2021 रोजी सुरू होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय चमूचे नेतृत्व करणार आहे?
1) एम. सी. मेरी कोम
2) मनप्रीत सिंग
3) 1 आणि 2
4) यापैकी नाही
उत्तर :-भारतीय ऑलिम्पिक संघाने 23 जुलै 2021 रोजी सुरू होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय चमूचे नेतृत्व करण्यासाठी एम. सी. मेरी कोम (महिला मुष्टियोद्धा) आणि मनप्रीत सिंग (पुरुष हॉकी संघाचा कर्णधार) यांची निवड केली.
चालू घडामोडी –
Q9] कोणती व्यक्ती ‘खादी प्राकृतिक पेंट’ याचे ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ आहे?
1) नितीन गडकरी
2) रमेश पोखरियाल
3) पियुष गोयल
4) स्मृती इराणी
उत्तर :- रस्ते वाहतूक व महामार्ग तसेच MSME मंत्री नितीन गडकरी हे ‘खादी प्राकृतिक पेंट’ याचे ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ आहेत. ‘खादी प्राकृतिक पेंट’ हा गायीच्या शेणापासून बनविण्यात आलेल्या पहिला स्वदेशी पेंट आहे.
चालू घडामोडी –
Q10] कोणत्या दिवशी “जागतिक पशूजन्यरोग दिवस’ पाळतात?
1) 4 जुलै
2) 5 जुलै
3) 6 जुलै
4) 7 जुलै
उत्तर :- दरवर्षी 6 जुलै या दिवशी जगभरात “जागतिक पशूजन्यरोग दिवस’ पाळतात. पशूजन्यरोगाविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. 6 जुलै 1885 रोजी, लुईस पाश्चर या शास्त्रज्ञाने रेबीज विषाणूविरूद्ध जगातील पहिली लस यशस्वीरित्या विकसित केली होती.
आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents