Current Affairs : चालू घडामोडी : 7 जुन २०२१
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 7 JUNE 2021 | चालू घडामोडी : ७ जुन २०२१
चालू घडामोडी –
1] ओणत्या व्यक्तीची भारतीय हवाई दलाचे ‘वाइस चीफ ऑफ एयर स्टाफ’ या पदावर नियुक्ती झाली?
1) एअर मार्शल विवेक राम चौधरी
2) एअर मार्शल अमित तिवारी
3) एअर मार्शल संदीप सिंग
4) एअर मार्शल मानवेंद्र सिंग
उत्तर :- एअर मार्शल विवेक राम चौधरी यांची भारतीय हवाई दलाचे ‘वाइस चीफ ऑफ एयर स्टाफ’ या पदावर नियुक्ती झाली. ते 30 जून 2021 रोजी निवृत्त होत असलेले एअर मार्शल एच.एस. अरोरा यांच्याकडून पदभार घेतील.
चालू घडामोडी –
2] कोणत्या दिवशी ‘जागतिक पर्यावरण दिवस’ साजरा करतात?
1) 5 जून
2) 4 जून
3) 3 जून
4) 2 जून
उत्तर :- दरवर्षी 5 जून या दिवशी ‘जागतिक पर्यावरण दिवस’ साजरा करतात. जगातल्या प्रत्येक मनुष्यामध्ये पर्यावरणाविषयी जागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा यामागील मुख्य उद्देश्य आहे.
2021 साली जागतिक पर्यावरण दिवस “इकोसिस्टम रिस्टोरेशन” (UNESCO द्वारे) / “रिइमेजीन. रिक्रीएट. रिस्टोर.” (UNEP द्वारे) या संकल्पनांखाली साजरा करण्यात आला.
चालू घडामोडी –
3] कोणत्या व्यक्तीने 2021 साली ‘आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार’ जिंकला?
1) शुगी बेन
2) ओल्गा रॅव्हन
3) निकोलस मॅथियू
4) डेव्हिड डिओप
उत्तर :- फ्रान्सचे कादंबरीकार डेव्हिड डिओप यांनी त्यांच्या “अॅट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक” या पुस्तकासाठी 2021 साली ‘आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार’ जिंकला.
चालू घडामोडी –
4] कोणत्या राज्य सरकारने ज्ञानदान करणाऱ्या कामगारांचे समर्थन करून नोकरीच्या संधी वाढविण्यासाठी ‘नॉलेज इकॉनॉमी मिशन’ या अभियानाचा प्रारंभ केला?
1) महाराष्ट्र
2) उत्तरप्रदेश
3) तामिळनाडू
4) केरळ
उत्तर :- केरळ सरकारने ज्ञानदान करणाऱ्या कामगारांचे समर्थन करून नोकरीच्या संधी वाढविण्यासाठी ‘नॉलेज इकॉनॉमी मिशन’ या अभियानाचा प्रारंभ केला आहे. सुशिक्षित लोकांना नोकरी देण्याचे चालू असलेले प्रयत्न आणि ज्ञानदान करणाऱ्या कामगारांना पाठिंबा देणे हे एकाच कार्यक्रमाच्या अंतर्गत आणले गेले आहे. अश्या कामगारांना मूलभूत सुविधा आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
चालू घडामोडी –
5] कोणत्या व्यक्तीने ‘नेचर TTL फोटोग्राफर ऑफ द इयर 2021’ हा पुरस्कार जिंकला?
1) थॉमस विजयन
2) फ्रॅन फोरमॅन
3) जेम्स टाय
4) अलेक्स मॅकेलन
उत्तर :- थॉमस विजयन यांनी ‘नेचर TTL फोटोग्राफर ऑफ द इयर 2021’ हा पुरस्कार जिंकला. त्यांच्या “द वर्ल्ड इज गोइंग अपसाइड डाऊन” हे शीर्षक दिलेल्या छायाचित्राला हा पुरस्कार मिळाला.
चालू घडामोडी –
6] कोणत्या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने ‘रशियन भाषा दिवस’ साजरा करतात?
1) 03 जून
2) 06 जून
3) 04 जून
4) 07 जून
उत्तर :- दरवर्षी 06 जून या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने ‘रशियन भाषा दिवस’ साजरा करतात.
चालू घडामोडी –
7] _____ यांच्यासाठी YounTab योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे.
1) स्थलांतरित कामगार
2) वैद्यकीय चिकित्सक
3) ज्येष्ठ नागरिक
4) विद्यार्थी
उत्तर : – लडाख सरकारने केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी YounTab योजनेचा प्रारंभ केला, ज्याअंतर्गत इयत्ता 6 ते 12 वीच्या शासकीय शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 12300 टॅबलेट वितरित करण्यात येणार आहे. यावेळी लडाखचे नायब राज्यपाल आर. के. माथुर यांच्या हस्ते टॅबलेट वितरित करण्यात आले.
चालू घडामोडी –
8] कोणत्या देशाने वाढत्या समुद्रपातळीपासून कोपेनहेगन बंदराला सुरक्षित करण्यासाठी कृत्रिम बेटाच्या निर्मितीची योजना मान्य केली?
1) डेन्मार्क
2) रशिया
3) स्वीडन
4) पोलँड
उत्तर :- डेन्मार्क देशाच्या सरकारने वाढत्या समुद्रपातळीपासून कोपेनहेगन बंदराला सुरक्षित करण्यासाठी कृत्रिम बेटाच्या निर्मितीची योजना मान्य केली. त्या कृत्रिम बेटाला ‘लिनेट होल्म बेट’ म्हणून ओळखले जाणार.
चालू घडामोडी –
9] कोणत्या देशात ‘मेरापी’ ज्वालामुखी आहे?
1) जपान
2) इथिओपिया
3) इंडोनेशिया
4) चिली
उत्तर :- ‘मेरापी’ ज्वालामुखी इंडोनेशियातील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो. त्याचा अलीकडेच अगदी कमी कालावधीत दोनदा उद्रेक झाला आहे.
चालू घडामोडी –
10] ‘INS चक्र’ ही _____ आहे.
1) खाबरोव्स्क श्रेणीची पाणबुडी
2) बोरेई-2 श्रेणीची प्रक्षेपणास्त्र पाणबुडी
3) अकुला-2 श्रेणीची पाणबुडी
4) बेल्गोरोड श्रेणीची विशेष मोहीम पाणबुडी
उत्तर :- ‘INS चक्र’ ही रशियाच्या बनावटीची अकुला-2 श्रेणीची पाणबुडी आहे. ती 4 एप्रिल 2012 रोजी भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आली.
10 वर्षांच्या भाडेपट्टीवर या पाणबुडीला रशियाकडून घेण्यात आले होते, जी मुदत संपण्याच्या 10 महिन्यांपूर्वीच आता रशियाकडे परत प्रवास करीत आहे.
आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents