चालू घडामोडी : 5 जुलै 2021

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
94

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 5 JULY 2021 | चालू घडामोडी : ५ जुलै २०२१

चालू घडामोडी – 

Q1] कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस’ साजरा करतात?

1) 03 जुलै
2) 02 जुलै
3) 05 जुलै
4) 04 जुलै

उत्तर :- दरवर्षी 3 जुलै या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस’ साजरा करतात. या दिवशी एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्याचा वापर थांबविण्यास लोकांना प्रोत्साहन दिले जाते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q2] कोणत्या कंपनीच्या सहकार्याने DRDO संस्थेने ‘शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टम (SSBS)-10m’ ही त्वरित पूल उभारण्याची प्रणाली विकसित केली?

1) लार्सन अँड टुब्रो
2) इन्फोसिस
3) माइंडट्री
4) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

उत्तर :- भारतीय भुदलासाठी ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीच्या सहकार्याने संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (DRDO) ‘शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टम (SSBS)-10m’ ही त्वरित पूल उभारण्याची प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे 9.5 मीटर आणि 4 मीटर रुंदीचा पूल उभारला जाऊ शकतो. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q3] कोणत्या मंत्रालयाच्यावतीने ‘UDISE+ 2019-20’ अहवाल प्रसिद्ध केला?

1) गृह कार्य मंत्रालय
2) शिक्षण मंत्रालय
3) वित्त मंत्रालय
4) आरोग्य मंत्रालय

उत्तर :- केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने भारतातील शालेय शिक्षणाविषयक “शिक्षणासाठी एकात्मिक जिल्हा माहिती यंत्रणा प्लस (UDISE+) 2019-20” अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. UDISE+ ही शाळांकडून ऑनलाईन माहिती/आकडेवारी संकलित करणारी एक व्यवस्था असून, 2018-19 या वर्षामध्ये ती विकसित करण्यात आली.
अहवालानुसार, 2018-19 या वर्षाच्या तुलनेत 2019-20 या वर्षात सर्व स्तरातील शालेय शिक्षणात सकल हजेरीपट नोंदणी गुणोत्तरात सुधारणा झाली आहे. तसेच सर्व शालेय शिक्षणात विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तरातही सुधारणा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q4] कोणत्या दिवशी भारतात ‘सनदी लेखापाल (CA) दिवस’ साजरा करतात?

1) 2 जुलै
2) 3 जुलै
3) 1 जुलै
4) 4 जुलै

उत्तर :- दरवर्षी 1 जुलै या दिवशी भारतात ‘सनदी लेखापाल (CA) दिवस’ साजरा करतात. या दिवशी भारतीय सनदी लेखापाल संस्थेचा (ICAI) स्थापना दिवस येतो. संस्थेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q5] कोणत्या ठिकाणी जगातील तिसरे सर्वात मोठे क्रिडामैदान तयार केले जात आहे?

1) जयपूर
2) इंदूर
3) पुणे
4) बंगळुरू

उत्तर :- राजस्थान राज्यातील जयपूर या शहरात 75000 प्रेक्षकांची क्षमता असलेले जगातील तिसरे सर्वात मोठे क्रिडामैदान तयार केले जात आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q6] खालीलपैकी कोणते मोबाइल अॅप भारतीय सनदी लेखापाल संस्थेने (ICAI) त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केले?

1) ICAI-FOS
2) ICAI-BOS
3) ICAI-DOS
4) ICAI-COS

उत्तर :-भारतीय सनदी लेखापाल संस्थेने (ICAI) त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ICAI-BOS’ नामक मोबाइल अॅप तयार केले आहे. त्यामार्फत विद्यार्थ्यांना परस्परसंवादी शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q7] कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने ‘दरबार मुव्ह’ (दरबार हलविणे) नामक 149 वर्ष जुनी प्रथा नष्ट केली?

1) हिमाचल प्रदेश
2) जम्मू व काश्मीर
3) उत्तराखंड
4) अंदमान व निकोबार

उत्तर :-जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने ‘दरबार मुव्ह’ (दरबार हलविणे) नामक 149 वर्ष जुनी प्रथा नष्ट केली आहे. त्या द्विवार्षिक कार्यक्रमाच्या अंतर्गत सरकारी सचिवालये आणि इतर सर्व कार्यालये एका राजधानीमधून दुसर्‍या राजधानीमध्ये हलवली जात होती. ही परंपरा महाराजा रणबीर सिंग यांच्या काळात सुरू केली गेली होती. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q8] कोणत्या संस्थेला ‘OCO ग्लोबल’ या संस्थेच्यावतीने देण्यात आलेला ‘जगातील सर्वात नवोन्मेष संवर्धन संस्था 2021’ हा पुरस्कार प्राप्त झाला?

1) ANGLEPaisa.com
2) वेल्थ इंडिया फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड
3) इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशन
4) इन्व्हेस्ट इंडिया

उत्तर :-केंद्रीय व्यापार व वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग व अंतर्गत कार्य संवर्धन विभागाच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या इन्व्हेस्ट इंडिया या ना-नफा संस्थेला ‘OCO ग्लोबल’ या संस्थेच्यावतीने देण्यात आलेला ‘जगातील सर्वात नवोन्मेष संवर्धन संस्था 2021’ हा पुरस्कार प्राप्त झाला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q9] कोणत्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI) याचे मुख्यालय आहे?

1) मुंबई
2) नवी दिल्ली
3) बंगळुरू
4) चेन्नई

उत्तर :- भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI) ही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थापनाखाली किरकोळ देयकांचे व्यवहार संचालित करण्यासाठी स्थापना करण्यात आलेली एकछत्री संस्था आहे. संस्थेचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
भारत सरकारच्यावतीने भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI) मार्फत नागरिकांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक वॅक्सीन व्हाउचर’ ही नवीन सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि त्यासाठी संस्था एक डिजिटल व्यासपीठ तयार करणार आहे. व्हाउचरमुळे कुणीही कोणासाठीही सेवाभावी मनाने दुसऱ्यासाठी लागणारा लस घेण्याचा खर्च स्वतः उचलू शकतो. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q10] NASA संस्थेच्या ‘NEOWISE’ हा शोधक अंतराळ दुर्बिणीचा कार्यकाळ _____ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

1) जून 2025
2) जून 2024
3) जून 2023
4) जून 2026

उत्तर :- NASA संस्थेची ‘NEOWISE (नियर-अर्थ ऑब्जेक्ट वाइड-फील्ड इन्फ्रारेड सर्वे एक्सप्लोरर)’ नामक खगोल-शोधक अंतराळ दुर्बिण आता जून 2023 पर्यंत कार्यरत राहणार आहे. 

# Current Affairs


mpscexams Free Current Affairs Quiz
Free Current Affairs Quiz

आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम