चालू घडामोडी : 4 जुलै 2021

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
137

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 4 JULY 2021 | चालू घडामोडी : ४ जुलै २०२१

चालू घडामोडी – 

Q1] कोणत्या दिवशी ‘जागतिक क्रिडा पत्रकार दिवस’ साजरा करतात?

1) 01 जुलै
2) 02 जुलै
3) 03 जुलै
4) 04 जुलै

उत्तर :- दरवर्षी 2 जुलै या दिवशी ‘जागतिक क्रिडा पत्रकार दिवस’ साजरा करतात. 1994 साली आंतरराष्ट्रीय क्रिडा पत्र संघाच्या (ISPA) 70 व्या वर्धापन दिनानिमित्त या दिवसाची स्थापना करण्यात आली होती. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q2] कोणत्या विभागाने ‘सरल संचार’ संकेतस्थळाच्या कार्याचा विस्तार केला?

1) दूरसंचार विभाग
2) टपाल विभाग
3) संरक्षण विभाग
4) उच्च शिक्षण विभाग

उत्तर :- दूरसंचार विभागाच्या वायरलेस नियोजन व समन्वय कक्षाने स्पेक्ट्रम तंत्रावर आधारित अनुप्रयोगांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने दूरसंचारसंबंधी प्रयोग, प्रात्यक्षिक आणि चाचणीमध्ये स्पेक्ट्रमचा उपयोग करण्यासाठी ऑनलाइन परवाना प्रदाता सुविधा कार्यरत केली असून त्याद्वारे विभागाच्या ‘सरल संचार’ संकेतस्थळाच्या कार्याचा विस्तार केला आहे.
‘सरल संचार’ नामक डिजिटल व्यासपीठाच्या मार्फत प्रवेशात्मक सेवा, इंटरनेट सेवा आणि इतर परवान्यांसाठी अर्ज प्राप्त केले जातात. आता प्रयोग, प्रात्यक्षिक आणि चाचणीमध्ये स्पेक्ट्रमचा उपयोग करण्यासाठी परवान्याची प्राप्ती, प्रक्रिया आणि अनुदानासाठी हे व्यासपीठ उपलब्ध असणार.

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q3] कोणत्या कंपनीने ‘इंद्रजाल’ नावाची भारताची पहिली स्वदेशी ड्रोन-रोधी संरक्षण प्रणाली विकसित केली?

1) क्रेडिट रोबोटिक्स
2) ग्रेने रोबोटिक्स
3) आयफ्यूचर रोबोटिक्स
4) रॅप्युटा रोबोटिक्स इंडिया

उत्तर :- ग्रेने रोबोटिक्स या कंपनीने ‘इंद्रजाल’ नावाची भारताची पहिली स्वदेशी ड्रोन-रोधी संरक्षण प्रणाली विकसित केली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q4] कोणत्या तंत्रज्ञान कंपनीने भारतीयांना त्यांचे ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्यास सक्षम करणारा ‘शॉप्सी’ (Shopsy) अॅप तयार केले?

1) अॅमेझॉन
2) झोमाटो
3) फ्लिपकार्ट
4) स्विगी

उत्तर :- फ्लिपकार्ट या ऑनलाइन विक्रेता कंपनीने भारतीयांना त्यांचे ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्यास सक्षम करणारा ‘शॉप्सी’ (Shopsy) अॅप तयार केले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q5] कोणता खेळाडू बुद्धिबळ खेळाच्या इतिहासातील सर्वाधिक कमी वयाचा ग्रँडमास्टर ठरला?

1) अभिमन्यू मिश्रा
2) सेर्गेई कर्जाकिन
3) जावोखिर सिंदारोव
4) गुकेश डोममराजू

उत्तर :- अमेरिकेच्या न्यू जर्सी येथील अभिमन्यू मिश्रा (12 वर्ष, चार महिने आणि 25 दिवस) हा बुद्धिबळ खेळाच्या इतिहासातील सर्वाधिक कमी वयाचा ग्रँडमास्टर ठरला आहे. त्याने सेर्गेई कर्जाकिन याचा (12 वर्ष आणि सात महिने) विक्रम मोडला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q6] कोणत्या व्यक्तीने 01 जुलै 2021 पासून भारतीय हवाई दलाचे उप-मुख्य अधिकारी (Vice Chief of the Air Staff) या पदाचा भार स्वीकारला?

1) एअर मार्शल बी. आर. कृष्णा
2) एअर मार्शल विवेक राम चौधरी
3) लेफ्टनंट जनरल संजीव कुमार शर्मा
4) यापैकी नाही

उत्तर :-एअर मार्शल विवेक राम चौधरी यांनी 01 जुलै 2021 पासून भारतीय हवाई दलाचे उप-मुख्य अधिकारी (Vice Chief of the Air Staff) या पदाचा भार स्वीकारला आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q7] कोणत्या दिवशी ‘जागतिक अज्ञात उडती वस्तु (UFO) दिवस’ साजरा करतात?

1) 01 जुलै
2) 02 जुलै
3) 03 जुलै
4) 04 जुलै

उत्तर :- दरवर्षी 2 जुलै या दिवशी ‘जागतिक अज्ञात उडती वस्तु (UFO) दिवस’ साजरा करतात. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q8] कोणती व्यक्ती ‘टोकियो ऑलिम्पिक 2021’ खेळांसाठी पात्र ठरलेली भारताची प्रथम महिला आणि तिसरी जलतरणपटू ठरली?

1) शिवानी कटारिया
2) पूर्वा शेटे
3) अनिता सूद
4) मान पटेल

उत्तर :-मान पटेल ही ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणारी भारताची पहिली महिला जलतरणपटू तसेच ‘टोकियो ऑलिम्पिक 2021’ खेळांसाठी पात्र ठरलेली भारताची प्रथम महिला आणि तिसरी जलतरणपटू ठरली आहे. ती बॅकस्ट्रोक जलतरणपटू आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q9] कोणत्या संस्थेला भारताच्या क्रिडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रिडा महासंघ (NSF) म्हणून मान्यता दिली?

1) WAKO इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन
2) द्रोणाचार्य बॉक्सिंग क्लब
3) बॅंगलोर बॉक्सिंग क्लब
4) इंडियन कॉम्बॅट स्पोर्ट्स अॅकॅडमी

उत्तर :- भारतात किकबॉक्सिंग खेळाच्या विकासासाठी वर्ल्ड असोसिएशन ऑफ किकबॉक्सिंग ऑर्गनायझेशन (WAKO) या संस्थेशी संलग्न असलेल्या भारताच्या ‘WAKO इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन’ या संस्थेला केंद्रीय युवा कार्य व क्रिडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रिडा महासंघ (NSF) म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q10] कोणत्या नौसेनेच्यावतीने ‘हिंद महासागर नौसेना परिसंवाद’ (IONS) याची 7 वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती?

1) भारतीय नौसेना
2) रशियाची नौसेना
3) फ्रान्सची नौसेना
4) यापैकी नाही

उत्तर :- 28 जून ते 01 जुलै 2021 या कालावधीत फ्रान्सच्या नौसेनेच्यावतीने ‘ला रियुनियन’ येथे हिंद महासागर नौसेना परिसंवाद (IONS) या द्वैवार्षिक कार्यक्रमाची 7 वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. 

# Current Affairs


mpscexams Free Current Affairs Quiz
Free Current Affairs Quiz

आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम