चालू घडामोडी : 30 जुन 2021
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 30 JUNE 2021 | चालू घडामोडी : ३० जुन २०२१
चालू घडामोडी –
Q1] कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (IAEA) मुख्यालय आहे?
1) जिनिव्हा, स्वित्झर्लंड
2) व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
3) पॅरिस, फ्रान्स
4) यापैकी नाही
उत्तर :-आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जी अणुऊर्जेच्या शांतीमय वापरला प्रोत्साहन देते. संस्थेची स्थापना 29 जुलै 1957 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आहे.
चालू घडामोडी –
Q2] कोणत्या ठिकाणी 28 जून 2021 रोजी DRDO संस्थेने ‘अग्नी-P’ या अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली?
1) ए.पी.जे अब्दुल कलाम बेट, बालासोर (ओडिशा)
2) सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश)
3) लपन रॉकेट लॉन्चर स्टेशन, पामेंगपुक, गरुत
4) क्यूओम स्पेस सेंटर
उत्तर :-दि. 28 जून 2021 रोजी भारताने ‘अग्नी-P’ या अण्वस्त्रक्षम आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशा किनारपट्टीवरील बालासोर येथील ए.पी.जे अब्दुल कलाम बेटावर संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (DRDO) नेतृत्वात नव्या पिढीच्या या अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.
‘अग्नी-P’ हे अग्नी-श्रेणीतील नव्या पिढीचे प्रगत क्षेपणास्त्र आहे. ते कॅनिस्टिराइज्ड क्षेपणास्त्र असून त्याची 1000 ते 2000 कि.मी. पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे.
चालू घडामोडी –
Q3] कोणत्या भाषेत बर्मी द्राक्षांना ‘लेटेकु’ म्हणून संबोधले जाते, जे दुबईकडे हवाई मार्गाने निर्यात करण्यात आले?
1) डोगरी भाषा
2) गुजराती भाषा
3) कन्नड भाषा
4) आसामी भाषा
उत्तर :- बर्मी द्राक्षांना आसामी भाषेत ‘लेटेकु’ म्हणून संबोधले जाते. ही द्राक्षे जीवनसत्व ‘क’ आणि लोह यांनी समृद्ध आहेत.
चालू घडामोडी –
Q4] कोणत्या शहरात ‘झेन गार्डन अँड कैझेन अॅकॅडमी’ याचे उद्घाटन झाले?
1) मुंबई
2) चेन्नई
3) अहमदाबाद
4) बंगळुरू
उत्तर :-अहमदाबाद येथील अहमदाबाद मॅनेजमेंट असोसिएशन (AMA) परिसरात भारत-जपान संबंध अंतर्गत ‘झेन गार्डन अँड कैझेन अॅकॅडमी’ स्थापित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 जून 2021 रोजी अकादमीचे उद्घाटन झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना गुजरात प्रशासनात कैझनची अंमलबजावणी केली. 2004 साली गुजरातमधील प्रशासकीय प्रशिक्षणात याची सुरूवात झाली आणि 2005 साली सर्वोच्च नागरी सेवकांसाठी एक विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित केले गेले. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी कैझन संबंधित गुजरातचे अनुभव पंतप्रधान कार्यालय आणि केंद्र सरकारच्या इतर विभागांपर्यंत आणले. यामुळे प्रक्रियेचे सुलभीकरण आणि कार्यालयीन जागेचा सुनियोजित वापर झाला आहे. आज केंद्र सरकारच्या अनेक विभाग, संस्था आणि योजनांमध्ये कैझनचा वापर केला जात आहे.
चालू घडामोडी –
Q5] कोणत्या व्यक्तीची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली?
1) रवी विजयकुमार मलीमथ
2) लिंगप्पा नारायण स्वामी
3) अरुप कुमार गोस्वामी
4) राजेश बिंदल
उत्तर :- भारताच्या राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती रवी विजयकुमार मलीमथ यांची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्ती केली. ही नियुक्ती 01 जुलै 2021 पासून लागू असेल.
चालू घडामोडी –
Q6] कोणत्या देशाने बैहेतन जलविद्युत प्रकल्पातील दोन संयंत्रे कार्यान्वित केली?
1) भारत
2) चीन
3) रशिया
4) इस्त्रायल
उत्तर :-चीन देशात बैहेतन जलविद्युत केंद्र नामक जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्पाला 28 जून 2021 रोजी सक्रिय करण्यात आले. यांग्त्झी नदीच्या जिन्शा नामक उपनदीवर बांधण्यात आलेला हा प्रकल्प युनान आणि सिचुआन या प्रांतांच्या सीमेवर आहे. 16 दशलक्ष किलोवॅट एवढी या प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता आहे.
चालू घडामोडी –
Q7] 2021 या वर्षी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांची _____ जयंती साजरी करण्यात आली आहे.
1) 94 वी
2) 100 वी
3) 96 वी
4) 98 वी
उत्तर :- 28 जून 2021 रोजी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या जन्म शताब्दीनिमित्त उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी आदरांजली अर्पण केली. पी व्ही नरसिंह राव यांनी वर्ष 1991 ते वर्ष 1996 या काळात भारताचे दहावे पंतप्रधान म्हणून काम पाहिले. त्यांना आर्थिक सुधारणांचे प्रणेते मानले जाते. देशामधील लायसन्स राज संपुष्ठात आणण्याचे श्रेय राव यांच्याकडे जाते. ते भारताच्या आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार होते.
चालू घडामोडी –
Q8] इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) यांच्या घोषणेनुसार, ब्रँड फायनान्स या संस्थेने _____ याला जगातील सर्वात ‘स्ट्रॉंगेस्ट हॉटेल ब्रँड’ म्हणून दर्जा प्रदान केला आहे.
1) ताज हॉटेल्स
2) द ओबेरॉय ग्रुप
3) आयटीसी हॉटेल्स
4) मॅरियट इंटरनॅशनल
उत्तर :- इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) यांच्या घोषणेनुसार, ब्रँड फायनान्स या संस्थेने ‘ताज हॉटेल्स’ याला जगातील सर्वात ‘स्ट्रॉंगेस्ट हॉटेल ब्रँड’ म्हणून दर्जा प्रदान केला आहे. ब्रँड फायनान्स संस्थेने त्याच्या वार्षिक ‘हॉटेल्स 50 2021’ अहवालात ही घोषणा केली.
चालू घडामोडी –
Q9] ब्रिटनच्या फायनॅनष्यल कंडक्ट अथॉरिटी (FCA) यांनी सेशल्स येथे मुख्यालय असलेल्या कोणत्या कंपनीवर बंदी घातली?
1) बायनॅन्स
2) कोईनमार्केटकॅप
3) कॉईनबेस
4) बीटीसीट्रक
उत्तर :- ब्रिटनच्या फायनॅनष्यल कंडक्ट अथॉरिटी (FCA) यांनी सेशल्स येथे मुख्यालय असलेल्या ‘बायनॅन्स’ कंपनीवर बंदी घातली. ‘बायनॅन्स’ हे जगातील सर्वात मोठे क्रिप्टोकरंसी एक्सचेंज आहे.
चालू घडामोडी –
Q10] कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिवस’ साजरा करतात?
1) 27 जून
2) 28 जून
3) 29 जून
4) 30 जून
उत्तर :- दरवर्षी 29 जून या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिवस’ साजरा करतात. दैनंदिन जीवनात सांख्यिकीचा उपयोग लोकप्रिय करण्यासाठी आणि धोरणे आखण्यासाठी आणि त्यांना आकार देण्यासाठी सांख्यिकीचे सहाय्य कसे होते याबाबत जनतेला माहिती मिळावी या उद्देशाने सांख्यिकी दिवस साजरा करतात. राष्ट्रीय सांख्यिकी प्रणाली उभारण्यामधील अमुल्य योगदानासाठी दिवंगत प्राध्यापक पी. सी. महालनोबीस यांच्या 29 जून या जन्मदिनी हा दिवस साजरा केला जातो.
भारतात, 2021 साली राष्ट्रीय सांख्यिकी दिवस (29 जून) याची संकल्पना – “शाश्वत विकास ध्येये (SDG)-2 : उपासमारीचा अंत, अन्न सुरक्षा साध्य करणे, पोषण सुधारणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे”.
आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents