चालू घडामोडी : 13 मार्च 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 13 March 2020 | चालू घडामोडी : १३ मार्च २०२०
चालू घडामोडी – ‘महामारी कायदा-1897’ लागू करण्याविषयी राज्यांना सूचना
- COVID-19 विषाणूचा प्रसार थांबावा यासाठी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना ‘महामारी कायदा-1897’ याच्या कलम 2 मधील तरतुदींना लागू करण्याविषयी सूचना केली आहे.
- या तरतुदींमुळे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय किंवा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकार यांच्याकडून वेळोवेळी येणाऱ्या सर्व सुचनांची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येते. तसेच धोकादायक साथीच्या रोगांच्या विरूद्ध विशेष उपाययोजना करण्याचे आणि नियम आखण्याची शक्ती प्रदान करते. यामुळे लोकांच्या हितासाठी सरकारला रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कोणत्याही आवश्यक (सक्तीच्या) पद्धतीचा अवलंब करण्यास ताकद मिळते.
- या तरतुदींमुळे रेल्वेने किंवा इतर मार्गाने प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तींची तपासणी करण्याचे अधिकार तसेच संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तीला लोकांपासून वेगळे करणे, रुग्णालयात, तात्पुरत्या निवासस्थानात स्थलांतरित करणे अश्या सक्तीच्या उपाययोजना करण्याचे अधिकार देखील सरकारला देते.
पार्श्वभूमी
- 11 मार्च 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेनी COVID-19 विषाणू ‘महामारी’ म्हणून घोषित केले. आतापर्यंत भारतातल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनी 70 हा आकडा पार केला आहे. तर जगभरात याचे 1 लक्षाहून अधिक रुग्ण आढळले आहेत.
- महामारी रोग कायदा-1897’ पहिल्यांदा पूर्वीच्या बॉम्बे राज्यात ब्यूबोनिक प्लेगच्या वेळी लागू करण्यात आला होता.
चालू घडामोडी – मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव मिळणार
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात येणार असून स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
नाना शंकरशेठ कोण होते?
- नाना शंकरशेठ हे भारतातली पहिली रेल्वे कंपनी ‘ग्रेट ईस्टर्न रेल्वे’ याचे पहिले संचालक होते. त्यामुळे त्यांना ‘भारतीय रेल्वेचे पितामह’ असेही म्हटले जाते.
- मुंबई ते ठाणेदरम्यान धावलेल्या पहिल्या लोकलसाठी नाना शंकरशेट यांनी शेकडो हेक्टर जमीन दान केली होती. त्याबदल्यात त्यांनी कोणताही मोबदला घेतला नव्हता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या 150 व्या पुण्यतिथीनिमित्त स्थानकाला त्यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली.
- नाना शंकरशेठ व्यवसायाने एक व्यापारी होते. त्यांनी सती प्रथा बंदीच्या कायद्यालाही पाठिंबा दिला होता. तसेच 1848 साली त्यांनी मुलींसाठी शाळा सुरु केली होती.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक
- मुंबई सेंट्रल हे पश्चिम मार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे, जे महाराष्ट्रातल्या मुंबई या शहरात आहे. ब्रिटीश वास्तुकार क्लेड बॅटले यांनी स्थानकाच्या मुख्य इमारतीची रचना केली होती.
- 18 डिसेंबर 1930 रोजी ही स्थानक लोकांसाठी उघडले गेले.
चालू घडामोडी – नीता अंबानी जगातील ‘टॉप टेन’ प्रभावशाली महिलांच्या यादीत!
- आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण आणि प्रसिद्ध भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचा जगातील प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश झाला आहे.
- प्रसिद्ध अमेरिकन टेनिसस्टार सेरेना विल्यम्स आणि जिम्नॅस्टिक सिमोन माईल्स या क्रीडा जगतातील सर्वात प्रभावशाली महिला ठरल्या आहेत.
- स्पोर्ट्स बिझनेस नेटवर्क आणि आय. ए. स्पोर्ट कनेक्ट यांच्यावतीने २०२० या वर्षासाठीच्या इन्फ्लुएन्शिअल वूमन इन स्पोर्ट महिलांची यादी जाहीर केली. या यादीत २५ महिलांची निवड करण्यात आली. नीता अंबानी या क्रिकेट आणि फुटबॉल या क्रीडा प्रकारांशी निगडीत असल्याने त्यांचा टॉप टेन यादीत समावेश झाला आहे.
- नीता अंबानी या मुंबई इंडियन्स या संघाच्या मालकीण आहेत. मुंबईच्या संघाने आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. तसेच त्यांनी फुटबॉल आणि इतर खेळातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसाठी विशेष योगदान दिले आहे.
- आयपीएलचा पहिला सीझन वगळता इतर सर्व सीझनमध्ये नीता अंबानी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. जेव्हा जेव्हा मुंबईची मॅच असायची तेव्हा तेव्हा त्यांनी मैदानावर हजेरी लावली होती. फक्त मुंबईच नाही तर इतर टीमच्या खेळाडूंसोबतही त्या मैदानावर चर्चा करताना दिसतात.
- नीता अंबानी यांच्याबरोबर टेनिसस्टार सेरेना विल्यम्स, नाओमी ओसाका, फॉर्म्युला वनच्या संचालक मंडळातील सदस्य एली नॉर्मन, वुमन्स एनबीएच्या आयुक्त कॅथी एंगेल्बर्ट, फिफाच्या सरचिटणीस सा मौरा, ऑलिम्पिक संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेरी कॉमिस, ईसीबीच्या व्यवस्थापकीय संचालक क्लेयर कॉनर या प्रभावशाली महिला ठरल्या आहेत.
- तसेच भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज यांचाही आयए स्पोर्ट कनेक्टच्या मूळ यादीत समावेश करण्यात आला आहे.
चालू घडामोडी – एअरोस्पेस विद्यापीठ
- हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या पुनर्रचनेसाठी आणि मजबूतीकरणासाठी सरकारने गठित केलेल्या नियोजन आयोगाचे तत्कालीन सदस्य श्री बी. के. चतुर्वेदी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ गटाने एरोस्पेस विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती.
- एअरोस्पेस विद्यापीठाच्या स्थापनेचा सविस्तर प्रकल्प वृत्तांत (डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट) सोसायटी फॉर एचएएल एरोनॉटिक्स रिसर्च अँड टेक्नॉलॉजीज इन्स्टिट्यूट नावाच्या एचएएल-संस्थापित सोसायटीने तयार केला आणि एचएएल मंडळाने तो मंजूर केला होता.
- त्यानंतर डीपीआरबाबत मंत्रालयात आढावा घेण्यात आला. आणि सुचविण्यात आले की, संसदेच्या अधिनियमाद्वारे संस्थेच्या स्थापनेसाठी ही रचना इतर केंद्रीय विद्यापीठांमध्ये नियम आणि प्रक्रिया यांच्या अनुषंगाने असली पाहिजे. एचएएलची भूमिका प्रस्तावित विद्यापीठाच्या स्थापनेत मदत करेल.
- 2 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या 409 व्या मंडळाच्या बैठकीत चर्चेनंतर एचएएलने निर्णय घेतला आहे की, डीआरडीओ, खासगी उद्योग इत्यादी संघटनांच्या सहकार्याने त्यांना एरोस्पेस विद्यापीठ सुरू करण्याचा विचार करता येणार नाही.
- ही माहिती संरक्षण राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक यांनी आज लोकसभेत श्री रवी किशन आणि श्री रवींद्र कुशवाह यांना लेखी उत्तरात दिली.
# Current Affairs
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents