चालू घडामोडी : 29 जुन 2021

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
165

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 1 JUNE 2021 | चालू घडामोडी : १ जुन २०२१

चालू घडामोडी – 

Q1] कोणती अंतराळ संस्था जगातील पहिला शारीरिकदृष्ट्या दिव्यांग अंतराळवीर अंतराळात पाठविणार आहे?

1) नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन
2) युरोपियन स्पेस एजन्सी
3) भारतीय अंतराळ संशोधन संस्था
4) CNES

उत्तर :-युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ही संस्था जगातील पहिला शारीरिकदृष्ट्या दिव्यांग अंतराळवीर अंतराळात पाठविणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q2] खालीलपैकी कोणते भारतातील पहिले रेबीज-मुक्त राज्य ठरले?

1) गोवा
2) पश्चिम बंगाल
3) कर्नाटक
4) केरळ

उत्तर :- गोवा हे भारतातील पहिले रेबीज-मुक्त राज्य ठरले आहे. गोव्यात मागील तीन वर्षांमध्ये रेबीज रोगाचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q3] कोणत्या देशात ‘नेशर रामला’ हे ठिकाण आहे?

1) सिरिया
2) *इस्त्रायल
3) इजिप्त
4) जॉर्डन

उत्तर :- इस्त्रायल देशात ‘नेशर रामला’ हे ठिकाण आहे. तेल अवीव शहराच्या आग्नेयला असलेल्या ‘नेशर रामला’ येथे इस्त्रायली शास्त्रज्ञांना 130,000 वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या मानवाच्या कवटीचे तुकडे आणि जबड्याचा दात असलेल्या खालचा भागाचे जीवाश्म आढळून आले आहेत. तत्कालीन मानवाला ‘नेशर रामला होमो’ असे नाव देण्यात आले आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q4] कोणत्या मंत्रालयाने लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांची व्याख्या सुधारित केली?

1) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
2) अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
3) कंपनी कार्य मंत्रालय
4) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय<

उत्तर :- कंपनी (कॉर्पोरेट) कार्य मंत्रालयाने लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांची व्याख्या सुधारित केली आहे. लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्याच्या नवीन व्याख्येनुसार, स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध नसणारी कंपनी, बँक, विमा प्रदाता किंवा वित्तीय संस्था, ज्यांची उलाढाल 250 कोटी रुपयांपर्यंत (पूर्वी 50 कोटी रुपये) आहे आणि ऋण 50 कोटी रुपयांपर्यंत (पूर्वी 10 कोटी रुपये) आहे.
आता लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्याला ‘कंपनी (लेखापरीक्षण मानके) नियम 2021’ अंतर्गत बरीच सूट मिळण्याची परवानगी आहे. त्यामुळे लघु कंपन्यांना दिलासा मिळणार. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q5] कोणत्या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक खाद्यान्न कार्यक्रम (WFP) या संघटनेचे मुख्यालय आहे?

1) रोम, इटली
2) हेग, नेदरलँड
3) मॉनैरोबी, केनिया
4) जिनिव्हा, स्वित्झर्लंड

उत्तर :- जागतिक खाद्यान्न कार्यक्रम (WFP) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे, जी उपासमारला पराभूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न करते. त्याची स्थापना 19 डिसेंबर 1961 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय रोम (इटली) येथे आहे.
उदरनिर्वाहासाठी हजारो राज्य-समर्थीत महिला बचत गटांपर्यंत पोहचून उपजीविकेच्या उपक्रमांना बळकटी देऊन घरगुती अन्न व पौष्टिक सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी ओडिशा सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक खाद्यान्न कार्यक्रम (WFP) यांच्यात करार झाला 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q6] ‘विजेवर चालणार्‍या वाहनांचा जलद अंगिकार आणि उत्पादन’ (FAME) योजनेचा कालावधी _____ वर्षांनी वाढविण्यात आला आहे.

1) 31 मार्च 2025
2) 31 मार्च 2024
3) 31 मार्च 2026
4) 31 मार्च 2027

उत्तर :- भारत सरकारने देशात विजेवर चालणार्‍या वाहतुकीला चालना देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘विजेवर चालणार्‍या वाहनांचा जलद अंगिकार आणि उत्पादन टप्पा-2’ (FAME इंडिया टप्पा-II) या योजनेचा कालावधी आणखी दोन वर्षांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेचा द्वितीय टप्पा 1 एप्रिल 2019 पासून राबवला जात आहे. आता ही योजना 31 मार्च 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून ई-दुचाकी, ई-तीनचाकी, ई-चारचाकी आणि ई-बस खरेदी करण्यात येत आहेत. नव्या तंत्रज्ञानास प्रोत्साहन दिले जात आहे. चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q7] कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ आणि अवैध वाहतूक विरोधी दिवस’ साजरा करतात?

1) 25 जून
2) 26 जून
3) 27 जून
4) 28 जून

उत्तर :- दरवर्षी 26 जून या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ आणि अवैध वाहतूक विरोधी दिवस’ किंवा ‘आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ दिवस’ साजरा करतात. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ दिवस अमली पदार्थांशी संबंधित मुद्द्यांविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्यावर, समाज आणि कारभारावर होणाऱ्या दुष्परिणामांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची मागणी करण्यासाठी पाळला जातो.
2021 साली ‘आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ दिवस’ची संकल्पना – “शेअर फॅक्ट्स ऑन ड्रग्स, सेव्ह लाइव्हज” 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q8] कोणत्या भालाफेकपटूने फिनलँडमधील ‘कुओर्ताने गेम्स’ स्पर्धांमध्ये कांस्यपदक जिंकले?

1) नीरज चोप्रा
2) जोहान्स व्हेटर
3) केशोर्न वालकोट
4) अन्नु राणी

उत्तर :- भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने फिनलँडमधील ‘कुओर्ताने गेम्स 2021’ स्पर्धांमध्ये कांस्यपदक जिंकले. स्पर्धेचे सुवर्णपदक जर्मनीच्या जोहान्स व्हेटरने जिंकले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q9] कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला ‘स्मार्ट शहरे पुरस्कार 2020’ यामधील सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला?

1) चंदीगड
2) लडाख
3) जम्मू व काश्मीर
4) पुडूचेरी

उत्तर :- 25 जून रोजी ‘स्मार्ट शहरे अभियान’ अंतर्गत ‘स्मार्ट शहरे पुरस्कार 2020’ जाहीर झाले.
विजेत्याची यादी सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रथम क्रमांक – चंदीगड.
सर्वांगीण विकासासाठी ‘स्मार्ट शहर पुरस्कार 2020’ याचा विजेता – इंदूर (मध्यप्रदेश) आणि सूरत (गुजरात).
सर्व राज्यांमध्ये प्रथम क्रमांक – उत्तरप्रदेश (त्याखालोखाल मध्यप्रदेश आणि तामिळनाडू).
हवामान स्मार्ट शहरे मूल्यांकन कार्यचौकट अंतर्गत 4-स्टार मानांकन देण्यात आलेली शहरे – सूरत, इंदूर, अहमदाबाद, पुणे, विजयवाडा, राजकोट, विशाखापट्टणम, पिंपरी-चिंचवड आणि वडोदरा.
“अभिनव कल्पना पुरस्कार” याचा विजेता – इंदूर.
‘स्मार्ट सिटीज लीडरशिप पुरस्कार’ मधील प्रथम क्रमांकाचा विजेता – अहमदाबाद (त्याखालोखाल वाराणसी आणि रांची).
स्मार्ट शहरे अभियान हा भारत सरकारचा नागरी पुनर्नविनीकरण आणि सुधारणा कार्यक्रम आहे. केंद्रीय नागरी विकास मंत्रालय राज्य सरकारांच्या मदतीने हे अभियान राबवत आहे. 25 जून 2015 रोजी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q10] कोणत्या व्यक्तीची कर्मचारी वर्ग मंत्रालयाने केंद्रीय दक्षता आयोगाचे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती केली?

1) संजय कोठारी
2) के. व्ही. चौधरी
3) सुरेश एन. पटेल
4) राजीव

उत्तर :- कर्मचारी वर्ग मंत्रालयाने सुरेश एन. पटेल यांची केंद्रीय दक्षता आयोगाचे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. संजय कोठारी यांचा CVC प्रमुखपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे. ते 24 जून 2021 रोजी पदाचा भार सांभाळणार.
भारताचे केंद्रीय दक्षता आयोग (CVC) भारत सरकारच्या विभिन्न विभागांच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या संबंधित भ्रष्टाचार नियंत्रणाची सर्वोच्च संस्था आहे. याची स्थापना सन 1964 मध्ये केली गेली. ही कोणत्याही कार्यकारी अधिकारांच्या नियंत्रणापासून मुक्त आहे आणि केंद्र सरकाराच्या अंतर्गत सर्व दक्षता कृतींवर देखरेख ठेवते. आयोगात एक केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC) आणि दोन दक्षता आयुक्त नियुक्त केले जातात. 

# Current Affairs


mpscexams Free Current Affairs Quiz
Free Current Affairs Quiz

आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम