चालू घडामोडी : २८ मे २०२१
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 28 MAY 2021 | चालू घडामोडी : २८ मे २०२१
चालू घडामोडी –
1] कर्नाटक राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात गुप्त शैलीतील बुद्धाची लघुशिल्प मूर्ती शोधली गेली?
1) बिदर
2) चिकबल्लापूर
3) कोलार
4) उडुपी
उत्तर :- कर्नाटक राज्याच्या उडुपी जिल्ह्यातील अलेंबी येथे गुप्त शैलीतील बुद्धाची लघुशिल्प मूर्ती शोधली गेली. मूर्तीची उंची 9 सेंटीमीटर, रुंदी 5 सेंटीमीटर आणि जाडी 2 सेंटीमीटर आहे.
चालू घडामोडी –
2] खालीलपैकी कोणते ‘PIMS-TS’ या संज्ञेचे पूर्ण नाव आहे?
1) पेडीएट्रिक इनफ्लॅमेटरी मल्टीसिस्टम सिंड्रोम
2) पॅडेड इनफ्लॅमेटरी मल्टीसिस्टम सिंड्रोम
3) पॅचिनेमा इनफ्लॅमेटरी मल्टीसिस्टम सिंड्रोम
4) यापैकी नाही
उत्तर :- कोरोनामधून बरे झाल्यानंतर लहान मुलांना ‘पेडीएट्रिक इनफ्लॅमेटरी मल्टीसिस्टम सिंड्रोम’(PIMS-TS) नावाच्या एका नवीन आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. PIMS-TS आजाराला “मल्टीसिस्टम इनफ्लॅमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रेन (MIS-C)” असे देखील नाव आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकार उद्भवत आहेत. अश्या मुलांमध्ये असलेल्या विशिष्ट लक्षणांपैकी मुख्य म्हणजे ताप, सर्दी, खोकला, कोरडा खोकला, उलट्या, भूक न लागणे, अन्नाची चव कमी होणे, थकवा येणे, श्वास घेण्यास अडचण यासारखे लक्षणे आहेत.
चालू घडामोडी –
3] मे 2021 महिन्यात, _____ याच्या माध्यमातून भरल्या गेलेल्या जलस्त्रोतांमध्ये पारा धातूचे उच्च प्रमाण आढळले.
1) जाकोब्शवन हिमनदी
2) ग्रीनलँड हिमखंड
3) अंटार्क्टिक हिमखंड
4) लॉरेन्टाइड हिमखंड
उत्तर :- मे 2021 महिन्यात झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ग्रीनलँड हिमखंड याच्या माध्यमातून भरल्या गेलेल्या जलस्त्रोतांमध्ये पारा धातूचे उच्च प्रमाण आढळले.
चालू घडामोडी –
4] मे 2021 महिन्यात, युरोपीय संघाने _____ या देशावर निर्बंध लादले असून त्यातून विमानसेवा कंपन्यांना युरोपीय संघाच्या अधिकार क्षेत्रात येणारे हवाई क्षेत्र वापरण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.
1) बेलारूस
2) युक्रेन
3) पोलंड
4) आर्मेनिया
उत्तर :- पत्रकार रेमन प्रतासेविच यांना अटक करण्यासाठी प्रवासी जेट विमानाला सक्तीने वळविल्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेचा निषेध म्हणून मे 2021 महिन्यात, युरोपीय संघाने बेलारूस या देशावर निर्बंध लादले असून त्यातून विमानसेवा कंपन्यांना युरोपीय संघाच्या अधिकार क्षेत्रात येणारे हवाई क्षेत्र वापरण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रतासेविच यांना तातडीने मुक्त करण्याची मागणी केली.
चालू घडामोडी –
5] कोणती व्यक्ती केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) नवीन संचालक आहे?
1) दत्तात्रय पडसलगीकर
2) संजय बर्वे
3) सुबोध कुमार जयस्वाल
4) अमुल्य पटनायक
उत्तर :- भारतीय पोलीस सेवा अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांनी 26 मे 2021 रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) प्रमुखपदाचा म्हणजेच संचालकाचा पदभार स्वीकारला. CBI प्रमुख ऋषीकुमार शुक्ला यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ 3 फेब्रुवारी 2021 रोजी पूर्ण झाला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. जयस्वाल यांनी पदभार स्वीकारल्यापासून पुढील दोन वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी त्यांची नियुक्ती असणार आहे.
चालू घडामोडी –
6] कोणत्या संघटनेच्या सहकार्याने स्वित्झर्लंडमध्ये ‘बायोहब (BioHub)’ नामक एका सुविधेची स्थापना करण्यात येणार?
1) संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF)
2) संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO)
3) अन्न व कृषी संघटना (UN FAO)
4) जागतिक आरोग्य संघटना (WHO)
उत्तर :- जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) त्याच्या ‘बायोहब (BioHub) उपक्रम’च्या अंतर्गत स्पीझ शहरामधील स्विस बायोसेफ्टी प्रयोगशाळेत एका बायोहब सुविधेची स्थापना करण्यासाठी स्वित्झर्लंड देशासोबत 25 मे 2021 रोजी सामंजस्य करार केला. या सुविधेमुळे विविध प्रयोगशाळा आणि भागीधारक यांच्यात रोगजनकांच्या जलद सामायिकरणास परवानगी मिळेल आणि त्यांचे चांगले विश्लेषण करता येणार आणि त्यांच्या विरुद्ध सज्जता ठेवता येईल.
चालू घडामोडी –
7] कोणत्या ठिकाणी ‘अर्जेटिने अॅंट’ या मुंगी-जातीच्या ‘एनव्हिरोंमेंटल डीएनए’ (eDNA) याचा यशस्वीरित्या शोध लागला?
1) रॉक बेट, कोबे, जपान
2) होन्शु, टोकियो, जपान
3) शिकोकू, जपान
4) पोर्ट बेट, कोबे, जपान
उत्तर :- जपानच्या कोबे प्रांतातील पोर्ट बेटावर ‘अर्जेटिने अॅंट’ या मुंगी-जातीच्या ‘एनव्हिरोंमेंटल डीएनए’ (eDNA) याचा यशस्वीरित्या शोध लागला.
चालू घडामोडी –
8] खालीलपैकी कोणते विधान “माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ आणि डिजिटल प्रसार माध्यम नीतीतत्त्वे नियमावली यासाठी मार्गदर्शके) नियम-2021” याच्या संदर्भात चुकीचे आहे?
1) सामाजिक प्रसार माध्यम कंपन्यांना तक्रार निवारण अधिकाऱ्याचे नाव सार्वजनिक करावे लागेल.
2) 90 लक्षाहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते असलेल्या सामाजिक प्रसार माध्यम कंपन्या ‘महत्त्वपूर्ण सामाजिक प्रसार माध्यम मध्यस्थ’ म्हणून ओळखल्या जातील.
3) भारतातील ओव्हर द टॉप (OTT) आणि डिजिटल संकेतस्थळांसाठी तक्रार निवारण व्यवस्था तयार करावी लागेल.
4) महत्त्वपूर्ण सामाजिक प्रसार माध्यम कंपन्यांना मुख्य अनुपालन अधिकारी नियुक्त करावे लागेल.
उत्तर :- सामाजिक प्रसार माध्यमवरील अश्लीलता आणि प्रक्षोभक वक्तव्य याला आळा घालण्यासाठी आणि सामाजिक प्रसार माध्यमाचा दुरुपयोग रोखण्यासाठीचा हेतू पुढे ठेवत केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने “माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ आणि डिजिटल प्रसार माध्यम नीतीतत्त्वे नियमावली यासाठी मार्गदर्शके) नियम-2021” जाहीर केले. नवीन नियम पुढीलप्रमाणे आहेत –
50 लक्षाहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते असलेल्या सामाजिक प्रसार माध्यम कंपन्या ‘महत्त्वपूर्ण सामाजिक प्रसार माध्यम मध्यस्थ’ म्हणून ओळखल्या जातील.
सामाजिक प्रसार माध्यम कंपन्यांना तक्रार निवारण व्यवस्था तयार करावी लागेल आणि तक्रारींचे निवारण करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव देखील सार्वजनिक करावे लागेल. हा अधिकारी 24 तासांत तक्रारीची नोंदणी करेल आणि 15 दिवसांमध्ये तक्रारीचे निवारण करेल. सामाजिक प्रसार माध्यम कंपन्यांना एक मुख्य तक्रार अधिकारी, क्षेत्रीय तक्रार अधिकारी आणि स्थानिक तक्रार अधिकारी अशा अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागेल आणि हे सगळे अधिकारी भारतातच राहतील.
तक्रारींसंदर्भातला अहवालही त्यांना दर महिन्याला जाहीर करावा लागेल.
सामाजिक प्रसार माध्यमवरच्या माहितीची तीन स्तरीय तपासणी होणार.
महिलाविरोधी लिखित टीका 24 तासांमध्ये हटवाव्या लागतील.
सामाजिक प्रसार माध्यम कंपन्यांना फर्स्ट ओरिजिनेटर कोण आहे, ते सांगावे लागेल. ते भारताबाहेरून सुरू झाले असेल तर भारतात ते कुणी सुरू केले हे सांगावे लागेल.
चालू घडामोडी –
9] कोणता देश त्याचे अंतिम सैन्य दल परत बोलविण्यापूर्वी त्याचे काबूल शहरातील दूतावास बंद करणार आहे?
1) ऑस्ट्रेलिया
2) चीन
3) संयुक्त राज्ये अमेरिका
4) भारत
उत्तर :- संयुक्त राज्ये अमेरिका हा देश अफगाणिस्तान देशात चाललेल्या दहशतवादाचा सामना करण्यात अफगाणिस्तान सैन्याला सहकार्य करणारे त्याचे सैन्य परत बोलवित आहे. त्यामुळे अमेरिका त्याचे काबूल शहरातील दूतावास बंद करणार आहे.
चालू घडामोडी –
10] कोणत्या दिवशी ‘जागतिक अवटु ग्रंथि (थायरॉईड) दिवस’ साजरा करतात?
1) 24 मे
2) 25 मे
3) 26 मे
4) 27 मे
उत्तर :- दरवर्षी 25 मे या दिवशी ‘जागतिक अवटु ग्रंथि (थायरॉईड) दिवस’ साजरा करतात.
मानेच्या पुढच्या भागात असलेल्या द्विखंडी अंतःस्रावी (जिचा स्राव एकदम रक्तात मिसळतो अशा) ग्रंथीला ‘अवटू ग्रंथी’ असे म्हणतात. सर्व पृष्ठवंशीय (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांमध्ये शरीराचे योग्य पोषण आणि वाढ होण्यासाठी आणि चयापचयाच्या (शरीरात सतत होणार्या भौतिक व रासायनिक बदलांच्या) नियंत्रणासाठी या ग्रंथीची जरूरी असते. या ग्रंथीचा आकार ढालीसारखा असल्यामुळे तिला ‘ढालग्रंथी’ असेही म्हणतात. ही ग्रंथी मानेत ‘अवटू’ या नावाच्या उपास्थीच्या (मजबूत व लवचिक असलेल्या पेशी-समूहाच्या म्हणजे ऊतकाच्या) दोन्ही बाजूंस द्विखंडात्मक असून ते दोन्ही खंड मध्यभागी जोडलेले असतात. अवटू ग्रंथी ही एक अंतःस्रावी ग्रंथी आहे म्हणजे हिच्यामध्ये उत्पन्न होणारा स्राव नलिकेवाटे बाहेर न जाता एकदम रक्तात मिसळून रक्तमार्गाने सर्व शरीरात पसरतो व कोशिकांच्या चयापचयाचे नियंत्रण करतो. या ग्रंथीच्या स्रावामध्ये आयोडीन हा पदार्थ प्रामुख्याने दिसून येतो. अवटू ग्रंथीची महत्त्वाची कार्ये म्हणजे शरीराची योग्य प्रकारे वाढ करणे व चयापचयावर नियंत्रण ठेवणे ही होत.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents