चालू घडामोडी : 28 जुन 2021

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
149

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 28 JUNE 2021 | चालू घडामोडी : २८ जुन २०२१

चालू घडामोडी – 

Q1] कोणत्या राज्यात ‘रामगड विशधारी वन्यजीवन अभयारण्य’ आहे?

1) पश्चिम बंगाल
2) राजस्थान
3) आसाम
4) ओडिशा

उत्तर :-‘रामगड विशधारी वन्यजीवन अभयारण्य’ राजस्थानमधील भेरूपुरी अंतरी येथे आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे ते रणथंभोर, मुकुंद्रा, सरिस्का येथील व्याघ्र प्रकल्पानंतर राज्यातील चौथे आणि देशातील 52 वे व्याघ्र प्रकल्प ठरणार. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q2] कोणते मंत्रालय ‘आयटीअॅट ई-द्वार’ (‘itat e-dwar’) नामक संकेतस्थळाचे व्यवस्थापन करते?

1) विधी व न्याय मंत्रालय
2) वित्त मंत्रालय
3) कामगार व रोजगार मंत्रालय
4) विदेश कार्य मंत्रालय

उत्तर :- केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाने आयकर अपील न्यायाधिकरणाचे (ITAT) ‘आयटीअॅट ई-द्वार’ (‘itat e-dwar’) नामक ई-फाइलिंग संकेतस्थळ कार्यरत केले आहे. हे व्यासपीठ करदात्यांना खटला, अर्ज, कागदपत्रे इत्यादी दाखल करण्याची परवानगी देते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q3] कोणत्या मंत्रालयाने LiDAR तंत्राने करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रकाशित केला?

1) आयुष मंत्रालय
2) पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय
3) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
4) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

उत्तर :- केंद्रीय पर्यावरण, जंगल आणि हवामान बदल मंत्रालयाने LiDAR तंत्राने करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रकाशित केला आहे. सर्वेक्षणामधून 10 राज्यांमधील वनक्षेत्राला लागणाऱ्या पाण्याची पातळी मोजण्यात आली. या अहवालाचा उपयोग करून वनक्षेत्रातील भूजलपातळीत वाढ करण्यासाठी केला जाईल. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q4] कोणत्या शहराकडे भारताने खनिज समृद्ध ‘ड्रॅगन फ्रूट’ या फळांची पहिली खेप निर्यात केली?

1) अबू धाबी
2) शारजाह
3) दुबई
4) दोहा

उत्तर :-महाराष्ट्रातील सांगली येथे पिकविलेला खनिज समृद्ध ‘ड्रॅगन फ्रूट’ या फळांची पहिली खेप दुबई (संयुक्त अरब अमिराती) या शहराकडे निर्यात करण्यात आली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q5] कोणत्या देशासोबत भारताने पुढील पाच वर्षांसाठी तूर डाळ आणि उडीद डाळ आयात करण्याच्या संदर्भात सामंजस्य करार केला?

1) म्यानमार आणि मलावी
2) जिबूती आणि इथिओपिया
3) मॉरिशस आणि मोझांबिक
4) बांगलादेश आणि रवांडा

उत्तर :-भारताने पुढील पाच वर्षांसाठी तूर डाळ आणि उडीद डाळ आयात करण्याच्या संदर्भात म्यानमार आणि मलावी या देशांसोबत सामंजस्य करार केला आहे. म्यानमारकडून दरवर्षी 250,000 टन उडीद आणि 100000 टन तूर आयात केली जाईल आणि मलावीकडून दरवर्षी 50,000 टन तूर आयात केली जाईल. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q6] कोणत्या देशात ‘द अॅपल डेली’ हे लोकशाही समर्थक वृत्तपत्राचे मुख्यालय आहे?

1) सिंगापूर
2) हाँगकाँग
3) तैवान
4) थायलँड

उत्तर :- ‘द अॅपल डेली’ वृत्तपत्र वर्ष 1995 ते वर्ष 2021 या काळात हाँगकाँगमध्ये चीनी भाषेत प्रकाशित होणारे वृत्तपत्र होते.
‘द अॅपल डेली’ या लोकशाही समर्थक वृत्तपत्राने त्याची अखेरची आवृत्ती 24 जून 2021 रोजी प्रकाशित केली, कारण चीनी सरकारकडून राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली कंपनीला मिळणारा निधी गोठविण्यात आला आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q7] कोणत्या ठिकाणी फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) या संस्थेचे मुख्यालय आहे?

1) जिनिव्हा, स्वित्झर्लंड
2) पॅरिस, फ्रान्स
3) नैरोबी, केनिया
4) रोम, इटली

उत्तर :-फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स ऑन मनी लॉंडरिंग (FATF) अर्थात (काळा पैसा संदर्भात) वित्तीय कृती कार्य दल (FATF) या संस्थेची स्थापना 1989 साली झाली. त्याचे मुख्यालय पॅरिस (फ्रान्स) या शहरात आहे. ही काळा पैश्याच्या मुद्यावर धोरणे विकसित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एक आंतरसरकारी संस्था आहे. 2001 साली दहशतवादाला वित्तपुरवठा रोखणे ही तरतूद समाविष्ट करण्यासाठी त्याचा विस्तार करण्यात आला आहे
FATF संस्थेने पाकिस्तान देशाला ‘ग्रे लिस्ट’ यादीतून वगळण्यास पुन्हा एकदा नकार दिला आहे, कारण तो दहशतवाद्यांविरूद्ध योग्य ती कृती करण्यात अयशस्वी ठरला आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q8] कोणत्या संघटनेसोबत गुजरात सागरी विद्यापीठाने गुजरात आंतररक्षत्रित सागरी लवाद केंद्र (GIMAC) याच्या संवर्धनासाठी सामंजस्य करार केला?

1) आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे प्राधिकरण
2) जागतिक बँक
3) आंतरराष्ट्रीय चलननिधी
4) युरोपियन सेंट्रल बँक

उत्तर :- गुजरात सागरी विद्यापीठाने गुजरात आंतररक्षत्रित सागरी लवाद केंद्र (GIMAC) याच्या संवर्धनासाठी गुजरातमधील GIFT सिटी येथील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे प्राधिकरण (IFSCA) सोबत सामंजस्य करार केला आहे. ते गुजरात सागरी मंडळाने गुजरातच्या गांधीनगर येथे GIFT सिटीमध्ये स्थापित केलेल्या सागरी समूहाचा एक भाग असेल.

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q9] कोणत्या देशाने तिबेटमध्ये पहिली बुलेट ट्रेन सेवा कार्यरत केली?

1) चीन
2) भारत
3) भूतान
4) बांगलादेश

उत्तर :- चीन देशाने तिबेटच्या दुर्गम पर्वती भागात तिबेटमध्ये पहिली बुलेट ट्रेन सेवा कार्यरत केली आहे. ती पूर्णपणे विजेवर धावणारी बुलेट ट्रेन आहे. ही सेवा राजधानी ल्हासा आणि निआंगची या शहरांना जोडते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q10] कोणत्या श्रेणीचे ‘INS तबर’ हे एक जहाज आहे?

1) गोदावरी श्रेणी
2) कलवरी श्रेणी
3) तलवार श्रेणी
4) वीर श्रेणी

उत्तर :- भारतीय नौदलातील ‘INS तबर’ हे तलवार श्रेणीचे एक लढाऊ जहाज आहे. 

# Current Affairs


mpscexams Free Current Affairs Quiz
Free Current Affairs Quiz

आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम