चालू घडामोडी : २३ एप्रिल २०२१
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 23 April 2021 | चालू घडामोडी : २३ एप्रिल २०२१
चालू घडामोडी –
1] जागतिक पृथ्वी दिनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. दरवर्षी 21 एप्रिल या दिवशी जागतिक पृथ्वी दिन साजरा करतात.
2. 1970 साली पहिला जागतिक पृथ्वी दिन साजरा करण्यात आला होता.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
1) फक्त 1
2) फक्त 2
3) A आणि B
4) यापैकी नाही
उत्तर :- केवळ विधान 2 अचूक आहे, त्यामुळे पर्याय (B) उत्तर आहे.
पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी 22 एप्रिल या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन’ (किंवा वसुंधरा / धरणी दिन) जगभर साजरा करतात. वर्ष 2021 मधील आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिनाची संकल्पना “रिस्टोअर अवर अर्थ” ही संकल्पना होती.
पर्यावरणाच्या रक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचे आमदार गेलॉर्ड नेल्सन ह्यांनी 22 एप्रिल 1970 रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे अमेरिकेत आयोजन केले होते. पहिला पृथ्वी दिन अमेरिकेत पाळला गेला, तरीही त्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय समन्वयक असलेले डेनिस हेस ह्यांनी स्थापन केलेल्या संस्थेनी 1990 साली 141 देशांमध्ये या दिवसाचे आयोजन करून पृथ्वी दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला.
चालू घडामोडी –
2] खालीलपैकी कोणत्या मंडळामध्ये भारताची निवड झाली?
1) लैंगिक समानता व महिला सशक्तीकरणासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था (यूएन विमेन) याचे कार्यकारी मंडळ
2) जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाचे कार्यकारी मंडळ
3) गुन्हे प्रतिबंध व फौजदारी न्याय आयोग
4) वरील सर्व
उत्तर :- संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक व सामाजिक परिषदेच्या (ECOSOC) तीन मंडळामध्ये इतर देशांसोबत भारताला निवडण्यात आले आहे. ही मंडळे खालीलप्रमाणे आहेत –
गुन्हे प्रतिबंध व फौजदारी न्याय आयोग लैंगिक समानता व महिला सशक्तीकरणासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था (यूएन विमेन) याचे कार्यकारी मंडळ जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाचे कार्यकारी मंडळ
ही निवड दिनांक 1 जानेवारी 2022 पासून तीन वर्षांच्या मुदतीसाठी आहे
चालू घडामोडी –
3] कोणत्या संस्थेने व्हिजीबल इन्फ्रारेड इमेजिंग रेडिओमीटर सूट (VIIRS) तयार केला?
1) नॉर्थ्रॉप ग्रुमन
2) रेथियन कंपनी
3) लॉकहीड मार्टिन
4) बोईंग
उत्तर :- रेथियन कंपनीने व्हिजीबल इन्फ्रारेड इमेजिंग रेडिओमीटर सूट (VIIRS) तयार केला आहे. हा एक सेंसर आहे, जो सुओमी नॅशनल पोलर-ऑर्बिटिंग पार्टनरशिप (सुओमी NPP) आणि NOAA-20 हवामान उपग्रह यांच्या मंचावर कार्यरत आहे. ही प्रणाली जंगलातील वणव्यांची नोंद घेण्यासाठी तयार केली गेली आहे.
ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या अहवालानुसार, भारतात 1 एप्रिल 2021 ते 14 एप्रिल 2021 या कालावधीत 82,170 वणव्यांची नोंद झाली आहे.
चालू घडामोडी –
4] कोणत्या कंपनीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोळशाच्या गॅसिफिकेशनद्वारे उत्पादित होणाऱ्या यूरियासाठी एक अनुदान धोरण मंजूर केले?
1) कोरोमंडल इंटरनेशनल लिमिटेड
2) हिंदुस्तान फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड
3) तलचर फर्टिलायझर्स लिमिटेड
4) इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड
उत्तर :- केंद्रीय मंत्रिमंडळाने तलचर फर्टिलायझर्स लिमिटेड या कंपनीसाठी कोळशाच्या गॅसिफिकेशनद्वारे उत्पादित होणाऱ्या यूरियासाठी एक अनुदान धोरण मंजूर केले आहे.
चालू घडामोडी –
5] कोण ‘अन्नपूर्णा पर्वतशिखर’ (8091 मीटर) सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली?
1) अमिषा चौहान
2) निशा भोटे
3) कमलदीप (कम) कौर
4) प्रियंका मोहिते
उत्तर :- प्रियंका मोहितेने नेपाळकडून ‘अन्नपूर्णा पर्वतशिखर’ (8091 मीटर) सर केले. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे. ‘अन्नपूर्णा पर्वतशिखर’ जगातील दहाव्या क्रमांकाचे उंच पर्वतशिखर आहे.
चालू घडामोडी –
6] कोणत्या कार्यक्रमाच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडो-पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्ह (IPOI) याचा प्रस्ताव मांडला?
1) ASEAN शिखर परिषद
2) पूर्व आशिया शिखर परिषद
3) जी-20 नेत्यांची शिखर परिषद
4) जी-7 शिखर परिषद
उत्तर :- नोव्हेंबर 2019 मध्ये पूर्व आशिया शिखर परिषद या कार्यक्रमाच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडो-पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्ह (IPOI) याचा प्रस्ताव मांडला होता. अलीकडेच ऑस्ट्रेलियाने IPOI अंतर्गत 81.2 दशलक्ष रुपयांचे अनुदान जाहीर केले.
चालू घडामोडी –
7] कोणत्या संस्थेने उत्तराखंडमध्ये ‘वॉटर स्पोर्ट्स अँड अॅडव्हेंचर इन्स्टिट्यूट’ (WSAI) याची स्थापना केली?
1) भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP)
2) केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)
3) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)
4) यापैकी नाही
उत्तर :- भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) दलाने उत्तराखंडमध्ये ‘वॉटर स्पोर्ट्स अँड अॅडव्हेंचर इन्स्टिट्यूट’ (WSAI) याची स्थापना केली.
चालू घडामोडी –
8] ‘टिरानोसॉरस रेक्स’ ______ या युगात अस्तित्वात होते.
1) ट्रायसिक युगाचा शेवट
2) क्रेटासियस युगाचा शेवट
3) जुरासिक युगाचा शेवट
4) पालेओझोइक युगाचा शेवट
उत्तर :- ‘टिरानोसॉरस रेक्स’ या जातीचे डायनासोर सुमारे 66 दशलक्ष ते 68 दशलक्ष वर्षांपूर्वी क्रेटासियस युगाच्या शेवटी-शेवटी अस्तित्वात होते.
चालू घडामोडी –
9] कोणत्या व्यक्तीची रासायनिक शास्त्रास्त्रांवर प्रतिबंध (OPCW) या मंडळाद्वारे बाह्य लेखापरीक्षक म्हणून निवड झाली?
1) के. के. वेनुगोपाल
2) शशी कांत शर्मा
3) राजीव मेहरीशी
4) जी. सी. मुर्मू
उत्तर :- भारतीय नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG) जी. सी. मुर्मू यांची 29 एप्रिल 1997 रोजी स्थापना झालेल्या रासायनिक शास्त्रास्त्रांवर प्रतिबंध (OPCW) या मंडळाद्वारे बाह्य लेखापरीक्षक म्हणून निवड झाली आहे. ही निवड 2021 पासून तीन वर्षाच्या मुदतीसाठी झाली आहे.
चालू घडामोडी –
10] खालीलपैकी कोणते विधान भारत सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’चे स्पष्ट वर्णन करते?
1) परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका
2) भारतातील स्थलांतरीत कामगारांना मदत
3) भारतातील छोट्या व्यवसायाना सहाय्य
4) यापैकी नाही
उत्तर :- कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या सर्वात मोठ्या मोहिमेला 7 मे 2020 पासून सुरुवात झाली. ‘वंदे भारत मिशन’ असे या अभियानाचे नाव आहे. ज्या प्रवाशांमध्ये कोविड-19 रोगाची कुठलीही लक्षणे आढळलेली नाहीत, त्यांनाच भारतात परत आणले जात आहे.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents