चालू घडामोडी : २१ मे २०२१

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
92

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 21 MAY 2021 | चालू घडामोडी : २१ मे २०२१

चालू घडामोडी – 

1] अॅटलस-5 नामक अग्निबाणाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या:

1. स्पेसएक्स कंपनीने अ‍ॅटलास-5 अग्निबाण अलीकडेच अंतराळात प्रक्षेपित केले.

2. फ्लोरिडा येथील केप कॅनाव्हेरल स्पेस फोर्स स्टेशन या केंद्रावरून त्याचे प्रक्षेपण झाले.

दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?

1) फक्त 1
2) फक्त 2
3) 1 आणि 2
4) त्यापैकी एकही नाही

उत्तर :- विधान 2 अचूक आहे; त्यामुळे पर्याय (B) उत्तर आहे.
युनायटेड लॉन्च अलायन्स (ULA) कंपनीने अ‍ॅटलास-5 अग्निबाण अलीकडेच अंतराळात प्रक्षेपित केले. अमेरिकेच्या स्पेस फोर्ससाठी अग्निबाणाद्वारे क्षेपणास्त्राची चेतावणी देणारा ‘SBIRS जिओ-5’ उपग्रह कक्षेत ठेवण्यात आला आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

2] खालीलपैकी कोणत्या स्थळाची ‘UNESCO जागतिक वारसा स्थळे’ याच्या तात्पुरत्या यादीमध्ये नोंद झाली?

1) मराठा मिलिटरी आर्किटेक्चर, महाराष्ट्र
2) कांचीपुरमची मंदिरे, तामिळनाडू
3) हिरे बेनाकल मेगालिथिक स्थळ
4) वरील सर्व

उत्तर :- ‘UNESCO जागतिक वारसा स्थळे’ याच्या तात्पुरत्या यादीमध्ये 6 भारतीय स्थळांची नोंद केली गेली असल्याची घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रह्लाद सिंग पटेल यांनी केली. ते पुढीलप्रमाणे आहेत-
नर्मदा खोऱ्यातील भेडाघाट लमेटा घाट, मध्यप्रदेश कांचीपुरमची मंदिरे, तामिळनाडू सातपुडा व्याघ्र प्रकल्प, मध्यप्रदेश गंगा घाट, वाराणसी मराठा मिलिटरी आर्किटेक्चर, महाराष्ट्र हिरे बेनाकल मेगालिथिक स्थळ
यासह, ‘UNESCO जागतिक वारसा स्थळे’ याच्या तात्पुरत्या यादीमध्ये नोंद झालेल्या भारतीय स्थळांची एकूण संख्या 48 झाली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

3] कोणता देश आर्क्टिक परिषदेचा सदस्य नाही आहे?

1) कॅनडा
2) स्वीडन
3) भारत
4) संयुक्त राज्ये अमेरिका

उत्तर :- आर्क्टिक परिषद हे एक आंतरसरकारी मंच आहे, जे आर्क्टिक प्रदेशाच्या विकास कामांसाठी जबाबदार आहे. केवळ आर्क्टिक प्रदेशाची सीमा समायिक करणारे देश आर्क्टिक परिषदेचे सदस्य आहेत. 2013 सालापासून, आर्क्टिक परिषदेत भारताचा बारा इतर देशांसह (जपान, चीन, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, इटली, स्वित्झर्लंड, पोलंड, स्पेन, नेदरलँड्स, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया) ‘निरीक्षक’ हा दर्जा आहे.
आर्क्टिक हा पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडील, आर्क्टिक महासागराच्या किनाऱ्याकडील प्रदेश आहे. उत्तर ध्रुवाभोवतीच्या प्रदेशाला ‘आर्क्टिक’ हे नाव पडले. प्रदेशाच्या आत ग्रीनलंड, स्पिट्स्‌बर्गेन व इतर ध्रुवीय बेटे, अलास्का, कॅनडा व सायबीरियाचा उत्तर भाग, लॅब्रॅडॉरचा किनारा आणि आईसलँड, नॉर्व, स्वीडन, फिनलंड व यूरोपीय रशिया यांचे उत्तर भाग हे प्रदेश येतात. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

4] भारत सरकारने खतांच्या अनुदानात _____ वाढ केली आहे

1) 1,200 रुपये प्रति बॅग
2) 2,400 रुपये प्रति बॅग
3) 1,500 रुपये प्रति बॅग
4) 500 रुपये प्रति बॅग

उत्तर :- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खतांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी भारत सरकारने 19 मे 2021 रोजी खतांच्या अनुदानात 1,200 रुपये प्रति बॅग एवढी (140 टक्के) वाढ केली आहे. यापूर्वी ते 500 रुपये एवढे होते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

5] कोणत्या नदीत प्लास्टिकचा प्रवेश रोखण्यासाठी ‘बबल कर्टन’ तंत्रज्ञानाचा वापर भारतात प्रथमच केला जात आहे?

1) ब्रह्मपुत्र
2) गोदावरी
3) गंगा
4) यमुना

उत्तर :- यमुना नदीत प्लास्टिकचा प्रवेश रोखण्यासाठी ‘बबल कर्टन’ तंत्रज्ञानाचा वापर भारतात प्रथमच केला जात आहे. या तंत्राचा जलजीवांच्या मार्गक्रमणावर विपरीत परिणाम होत नाही. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

6] कोणत्या वर्षापर्यंत हवामानामुळे वितळत असलेले अंटार्क्टिकामधील हिमआच्छादन सलग न राहण्याच्या स्थितीत बदलेल, असा अंदाज एका अभ्यासानंतर व्यक्त करण्यात आला आहे?

1) 2030
2) 2045
3) 2060
4) 2050

उत्तर :- 2060 या वर्षापर्यंत हवामानामुळे वितळत असलेले अंटार्क्टिकामधील हिमआच्छादन (बर्फाच्या चादरी) सलग न राहण्याच्या स्थितीत बदलेल, असा अंदाज एका अभ्यासानंतर व्यक्त करण्यात आला आहे.
अश्या स्थितीला ‘क्लायमेट टिपिंग पॉईंट’ असे नाव देण्यात आले आहे. इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) या संस्थेच्या 5 व्या मूल्यांकन अहवालानुसार, ‘क्लायमेट टिपिंग पॉईंट’ प्राप्त झाल्यानंतर हवामान प्रणालीला त्याच्या पूर्वस्थितीत आणता येत नाही. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

7] विलुप्त झाल्याचे मानले जात असलेली ‘कोएलाकांथ’ ही प्रगैतहासिक मत्स्यप्रजाती अलीकडेच _____ यामध्ये जिवंत आढळून आली आहे.

1) हिंद महासागर
2) बंगालचा उपसागर
3) अरबी समुद्र
4) यापैकी नाही

उत्तर :- डायनासोर युगाच्या आधीच्या काळापासून अस्तित्वात असलेली आणि विलुप्त झाल्याचे मानले जात असलेली ‘कोएलाकांथ’ (मोठे शरीर आणि आठ पंख असलेली) नामक जीवाश्म मत्स्यप्रजाती पश्चिम हिंद महासागरात मादागास्कर देशाच्या किनाऱ्यालगत हिंद महासागरात जिवंत आढळून आली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

8] कोणती संस्था भारताला केंद्रस्थानी ठेऊन सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पाण्याखालून टाकलेली केबल प्रणाली तयार करीत आहे?

1) भारती एअरटेल
2) रिलायन्स जिओ
3) भारत संचार निगम मर्यादित
4) व्होडाफोन ग्रुप पीएलसी

उत्तर :- रिलायन्स जिओ इन्फोकॉम ही कंपनी भारताला केंद्रस्थानी ठेऊन इंडिया-एशिया-एक्सप्रेस (IAX) सिस्टम आणि इंडिया-युरोप-एक्सप्रेस (IEX) सिस्टम या नावांनी ओळखली जाणारी सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पाण्याखालून टाकलेली केबल प्रणाली तयार करीत आहे. डिजिटल दळणवळण आणि इंटरनेट जाळे व्यवस्था उपलब्ध करून देणारी IEX सिस्टम भारताला पश्चिम दिशेला मध्य पूर्व आणि युरोपशी जोडेल आणि IAX सिस्टम भारताला पूर्वेकडील सिंगापूर आणि त्याही पुढे जोडेल. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

9] खालीलपैकी कोणती 2021 साली ‘जागतिक मधमाशी / मधुमक्षिका दिवस’ याची संकल्पना आहे?

1) सेव्ह द बीज<
2) बीकीपिंग सेव्हज द इकोसिस्टम
3) प्रोटेक्ट द बीज फॉर बेटर
4) बी एंगेज्ड: बिल्ड बॅक बेटर फॉर बीझ

उत्तर :- दरवर्षी 20 मे या दिवशी ‘जागतिक मधमाशी / मधुमक्षिका दिवस’ साजरा करतात. मानवी जीवनात मधमाशीचे महत्व पटवून देण्याकरिता जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटना (UN FAO) याच्या पुढाकाराने हा दिवस पाळला जातो.
2021 सालाची संकल्पना – “बी एंगेज्ड – बिल्ड बॅक बेटर फॉर बीझ”.
मधमाशीपालन क्षेत्रातले प्रणेते अँटॉन जानिया यांचा जन्म 20 मे 1734 रोजी झाला होता. त्या व्यक्तीच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

10] स्पेसएक्स कंपनीने जगभरातील ग्राहकांना उच्च-गती उपग्रह इंटरनेट सुविधा प्रदान करण्यासाठी _____ सोबत भागीदारी करार केला आहे.

1) अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस
2) मायक्रोसॉफ्ट अझूर
3) गूगल क्लाऊड
4) आयबीएम क्लाऊड

उत्तर :- स्पेसएक्स कंपनीने जगभरातील ग्राहकांना उच्च-गती उपग्रह इंटरनेट सुविधा प्रदान करण्यासाठी गूगल क्लाऊड या कंपनीसोबत भागीदारी करार केला आहे. 

# Current Affairs


 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम