चालू घडामोडी : 21 जुलै 2021
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 21 JULY 2021 | चालू घडामोडी : २१ जुलै २०२१
चालू घडामोडी –
Q1] “नियर-अर्थ अॅस्टेरॉइड स्काऊट (NEA स्काऊट)” याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. ती कमी किमतीचे ‘क्यूबसॅट सोलार सेल” अंतराळयान तयार करण्यासाठी ISRO संस्थेची एक नियोजित मोहीम आहे.
2. ते ‘आर्टेमिस 1’ मोहिमेसह हेलिओसेंट्रिक कक्षेत पाठविण्यात येणाऱ्या 13 ‘क्यूबसॅट’ यानांपैकी एक असेल.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
1) फक्त 1
2) फक्त 2
3) 1 आणि 2
4) यापैकी एकही नाही
उत्तर :- केवळ ‘विधान 2’ अचूक आहे, त्यामुळे पर्याय (B) उत्तर आहे.
“नियर-अर्थ अॅस्टेरॉइड स्काऊट (NEA स्काऊट)” ही पृथ्वीजवळ फिरणाऱ्या लघुग्रहांचा पृथ्वीला असलेला धोका कमी करण्यासाठी त्यांना भेदणारी एक मोहीम आहे. ती कमी किमतीचे ‘क्यूबसॅट सोलार सेल” अंतराळयान तयार करण्यासाठी अमेरिकेच्या NASA या अंतराळ संशोधन संस्थेची एक नियोजित मोहीम आहे.
चालू घडामोडी –
Q2] कोणत्या शहरात ‘भारतीय वारसा संस्था (अर्थात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ हेरिटेज)’ याची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?
1) नोएडा
2) बंगळुरू
3) चेन्नई
4) हैदराबाद
उत्तर :- गौतम बुद्ध नगरच्या नोएडा येथे ‘भारतीय वारसा संस्था (अर्थात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ हेरिटेज)’ याची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ती संस्था पाच संस्थांना एकात्मिक करून एका डिम्ड विद्यापीठाच्या रूपात स्थापन केली जाणार आहे.
चालू घडामोडी –
Q3] कोणत्या संस्थेने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्राचा वापर करणारे ‘एनबीड्रायव्हर / NBDriver’ (नेबरहूड ड्राइव्हर) नामक एक डिजिटल साधन तयार केले?
1) IIT खडगपूर
2) IIT रुडकी
3) IIT मुंबई
4) IIT मद्रास
उत्तर :- भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास या संस्थेच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्राचा वापर करणारे ‘एनबीड्रायव्हर / NBDriver’ (नेबरहूड ड्राइव्हर) नामक एक डिजिटल साधन तयार केले आहे. पेशींमध्ये कर्करोगामुळे होणार्या उत्परिवर्तनांचे विश्लेषण करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
चालू घडामोडी –
Q4] कोणत्या भारतीय राज्याने येत्या तीन वर्षात ‘ॲगार’च्या लागवडीपासून 2000 कोटी रुपयांचा व्यवसाय साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे?
1) उत्तराखंड
2) हिमाचल प्रदेश
3) नागालँड
4) त्रिपुरा
उत्तर :- त्रिपुरा सरकारने येत्या तीन वर्षात ‘ॲगार’च्या लागवडीपासून 2000 कोटी रुपयांचा व्यवसाय साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
चालू घडामोडी –
Q5] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये ‘पेगासस’ हे मोडते?
1) चंद्रोच्च जवळील पूर्ण चंद्र
2) पृथ्वीवरुन दिसणारा चंद्राचा गोलार्ध
3) दर 18.6 वर्षांनी चंद्राच्या कक्षामध्ये होणारे चक्रीय स्थलांतर
4) यापैकी नाही
उत्तर :-दर 18.6 वर्षांनी चंद्राच्या कक्षामध्ये होणारे चक्रीय स्थलांतर म्हणजे “मूब वोबल’ (MOON WOBBLE) होय. NASA संस्थेच्या अभ्यासानुसार, पृथ्वीवर समुद्राची भरती-ओहटी घडविण्याची शक्ती या घटनेत असते.
चालू घडामोडी –
Q6] ‘हिंदु विवाह कायदा-1955’ यामधील कोणते कलम ‘दांपत्य अधिकारांचे प्रत्यास्थापन’ या मुद्याच्या संदर्भात आहे?
1) कलम 9
2) कलम 23
3) कलम 14
4)कलम 19
उत्तर :- ‘हिंदु विवाह कायदा-1955’ यामधील ‘कलम 9’ हे ‘दांपत्य अधिकारांचे प्रत्यास्थापन’ या मुद्याच्या संदर्भात आहे. दांपत्य अधिकार विवाहाद्वारे तयार केले गेले आहेत; उदा. पती किंवा पत्नी किंवा इतर जोडीदाराचा समाजातील हक्क. कायदा लग्न, घटस्फोट, पोटगी अश्या अधिकारांना मान्यता देतो.
चालू घडामोडी –
Q7] एका बातमीनुसार, ‘झुरोंग’ रोव्हरने आतापर्यंत _____ ग्रहाच्या पृष्ठभागावर 509 मीटर एवढ्या अंतरचा प्रवास पूर्ण केला आहे.
1) चंद्र
2) गुरू
3) शुक्र
4) मंगळ
उत्तर :-चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या माहितीनुसार, ‘झुरोंग’ रोव्हरने आतापर्यंत मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर 509 मीटर एवढ्या अंतरचा प्रवास पूर्ण केला आहे. 15 मे 2021 रोजी रोव्हर मंगळाच्या उत्तरेकडील गोलार्धात उतरविण्यात आले होते.
चालू घडामोडी –
Q8] कोणत्या कंपनीला भारतात मोटार इंधन विक्री करण्यासाठी अधिकृत परवानगी देण्यात आली?
1) रिलायन्स इंडस्ट्रीज
2) आरबीएमएल सोल्युशन्स
3) मानस अॅग्रो इंडस्ट्रीज
4) वरील सर्व
उत्तर :-भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाने भारतातील सात कंपन्यांना भारतात मोटार इंधन विक्री करण्यासाठी अधिकृत परवानगी दिली आहे. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, आरबीएमएल सोल्युशन्स, आयएमसी (चेन्नई), मानस अॅग्रो इंडस्ट्रीज, एम के अॅग्रोटेक, ऑनसाइट एनर्जी आणि आसाम गॅस कंपनी यांचा समावेश आहे.
चालू घडामोडी –
Q9] ‘अर्थ नेटवर्क’ या संस्थेच्या ‘2020 इंडिया लाइटनिंग रिपोर्ट’ या अहवालानुसार, कोणते राज्य सर्वाधिक वीजा पडल्याची नोंद करण्यात आलेल्या पहिल्या पाच राज्यांपैकी एक आहे?
1) आंध्र प्रदेश
2) कर्नाटक
3) 1 आणि 2
4) यापैकी नाही
उत्तर :- ‘अर्थ नेटवर्क’ या संस्थेच्या ‘2020 इंडिया लाइटनिंग रिपोर्ट’ या अहवालानुसार, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि कर्नाटक या प्रथम पाच राज्यांमध्ये सर्वाधिक वीजा पडल्याची नोंद करण्यात आली आहे. 2020 साली भारतभर पसरलेल्या लाइटनिंग नेटवर्कद्वारे भारतात 39.5 दशलक्षपेक्षा जास्त विजा कडाडल्या. त्यापैकी 12,022,402 विजा जमिनीवर पडल्या.
चालू घडामोडी –
Q10] भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) हे _______ याच्या अखत्यारीत कार्य करते.
1) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
2) अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
3) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
4) परराष्ट्र कार्य मंत्रालय
उत्तर :-भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) हे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्य करते. त्याची 20211 साली स्थापना झाली.
आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents