चालू घडामोडी : 20 जुलै 2021

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
107

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 20 JULY 2021 | चालू घडामोडी : २० जुलै २०२१

चालू घडामोडी – 

Q1] कोणत्या देशात ‘ब्रेस्ट बंदर’ वसलेले आहे?

1) मालदीव
2) इटली
3) फ्रान्स
4) श्रीलंका

उत्तर :- फ्रान्स देशात ‘ब्रेस्ट बंदर’ (पोर्ट ऑफ ब्रेस्ट) वसलेले आहे. ते फ्रेंच लष्करी बंदर आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q2] कोणत्या संघटनेने ‘बिल्ड बॅक बेटर वर्ल्ड’ (B3W) उपक्रमाचा प्रस्ताव मांडला आहे?

1) जी-7 (ग्रुप ऑफ सेव्हन)
2) संयुक्त राष्ट्रसंघ
3) जी-20 (ग्रुप ऑफ ट्वेंटी)
4) जागतिक व्यापार संघटना (WTO)

उत्तर :- जी-7 (ग्रुप ऑफ सेव्हन) देशांनी ‘बिल्ड बॅक बेटर वर्ल्ड’ (B3W) उपक्रमाचा प्रस्ताव मांडला आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI)’ याला एक पर्याय म्हणून 47 व्या जी-7 शिखर परिषदेत या उपक्रमाचा प्रस्ताव मांडण्यात आला. विकसनशील आणि अल्प-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी लागणाऱ्या गुंतवणूकीची कमतरता दूर करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q3] “स्कूल इनोव्हेशन अ‍ॅम्बेसेडर ट्रेनिंग प्रोग्राम” हा ______ यांचा एक उपक्रम आहे.

1) आदिवासी कार्य मंत्रालय
2) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ
3) 1 आणि 2
4) यापैकी नाही

उत्तर :- 16 जुलै 2021 रोजी, केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी कार्य मंत्रालय यांनी संयुक्तपणे 50,000 शालेय शिक्षकांसाठी “स्कूल इनोव्हेशन अ‍ॅम्बेसेडर ट्रेनिंग प्रोग्राम” (अर्थात शालेय नवोन्मेष दूत प्रशिक्षण कार्यक्रम) याचा प्रारंभ केला. हा आदिवासी कार्य मंत्रालय, शिक्षण मंत्रालयातील नवोन्मेष कक्ष, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) या संस्थांचा एक संयुक्त उपक्रम आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q4] IRCON संस्थेने भारत आणि _____ या देशांच्या दरम्यान ‘जयनगर-कुर्था रेल्वे मार्ग’ तयार केला आहे.

1) पाकिस्तान
2) श्रीलंका
3) बांगलादेश
4) नेपाळ

उत्तर :- IRCON संस्थेने भारत आणि नेपाळ या देशांच्या दरम्यान ‘जयनगर-कुर्था रेल्वे मार्ग’ तयार केला आहे. 34.50 किलोमीटर लांबीच्या या मार्गाने भारतातील जयनगर (मधुबनी जिल्हा, बिहार) आणि नेपाळमधील कुर्था ही गावे जोडली गेली आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q5] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये ‘पेगासस’ हे मोडते?

1) स्पायवेअर
2) अँटी-व्हायरस
3) कोविड-19 याचे नवीन उत्परिवर्तित रूप
4) यापैकी नाही

उत्तर :- ‘पेगासस’ हे एक स्पायवेअर आहे, जे iOS आणि अँड्रॉइड यासारख्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टममध्ये इंस्टॉल केले जाऊ शकते, ज्याचा उपयोग सरकारला दहशतवाद व गुन्हेगारी रोखण्यासाठी होऊ शकतो. हे उत्पाद इस्त्रायलच्या NSO ग्रुप या कंपनी विकसित केले आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q6] कोणत्या भारतीय संस्थेने ‘UNDP इक्वेटर प्राइज 2021’ हा पुरस्कार जिंकला?

1) स्नेहकुंज ट्रस्ट
2) आधिमलाई पझांगुडीयनर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड
3) 1 आणि 2
4) यापैकी नाही

उत्तर :- हवामानातील बदल आणि जैवविविधतेचे नुकसान हाताळण्यासाठी स्थानिक विकास लक्ष्ये साध्य करण्यासाठी भारतातील आधिमलाई पझांगुडीयनर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड आणि स्नेहकुंज ट्रस्ट या दोन संस्थांना प्रतिष्ठित ‘UNDP इक्वेटर प्राइज 2021’ हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) यांच्यावतीने देण्यात आला आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q7] कोणत्या ठिकाणी अमेरिका-भारत व्यवसाय परिषद (USBIC) याचे मुख्यालय आहे?

1) हेग, नेदरलँड
2) जिनिव्हा, स्वित्झर्लंड
3) नैरोबी, केनिया
4) वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका

उत्तर :-1975 साली स्थापना झालेल्या अमेरिका-भारत व्यवसाय परिषद (USBIC) याचे मुख्यालय अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे आहे

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q8] कोणत्या देशात ‘अॅमेझॉनचे खोरे’ आहे?

1) ब्राझील
2) पेरू
3) कोलंबिया
4) वरील सर्व

उत्तर :-‘अॅमेझॉन नदी’ ही दक्षिण अमेरिका उपखंडातील सर्वात मोठी नदी आहे. ही नदी ब्राझील, बोलिव्हिया, पेरू, गयाना, सूरीनाम, इक्वाडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला या 8 विकसनशील देशांमधून आणि फ्रेंच गुएना या फ्रान्सच्या ताब्यात आलेल्या प्रदेशातून वाहते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q9] कोणत्या व्यक्तीने जर्मनीमध्ये खेळल्या गेलेल्या ‘स्पार्कासेन चषक 2021’ ही बुद्धिबळ स्पर्धा जिंकली?

1) व्लादिमीर क्रॅमनिक
2) इयान नेपोम्निआत्ची
3) विश्वनाथान आनंद
4) फॅबियानो कॅरुआना

उत्तर :- भारताच्या विश्वनाथन आनंद या बुद्धिबळपटूने जर्मनीमध्ये खेळल्या गेलेल्या ‘स्पार्कासेन चषक 2021’ ही बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q10] कोणत्या ‘कार्ड पेमेंट नेटवर्क’ कंपनीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतात नवीन ग्राहक बनविण्यास बंदी घातली?

1) अमेरिकन एक्सप्रेस
2) मास्टरकार्ड
3) डिनर्स क्लब
4) वरील सर्व

उत्तर :- भारतात तपशील साठविण्याच्या मुद्द्यावरून जुलै 2021 महिन्यापासून भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतात नवीन ग्राहक बनविण्यास ‘मास्टरकार्ड’ या ‘कार्ड पेमेंट नेटवर्क’ कंपनीवर बंदी घातली. आतापर्यंत RBI याने अमेरिकन एक्सप्रेस, मास्टरकार्ड आणि डिनर्स क्लब या तीन परदेशी कंपन्यांवर बंदी घातली आहे. 

# Current Affairs


mpscexams Free Current Affairs Quiz
Free Current Affairs Quiz

आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम