चालू घडामोडी : 12 मार्च 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
105

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 12 March 2020 | चालू घडामोडी : १२  मार्च २०२०

चालू घडामोडी – यंदा लेहमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम होणार

  • दरवर्षी 21 जून या दिवशी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतात. यावर्षी सहावा योग दिन साजरा करण्यात येणार असून यंदाचा राष्ट्रीय कार्यक्रम लडाख केंद्रशासित प्रदेशाची राजधानी असलेल्या लेह या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
  • यावेळी योगचा राष्ट्रीय कार्यक्रम पहिल्यांदाच उंच ठिकाणी आयोजित केला जाणार आहे ज्यात मोठ्या संख्येनी लोकांचा सहभाग असणार. सुमारे 15 ते 20 हजार लोक कार्यक्रमात एकत्र येण्याचा अंदाज आहे.

दिनाविषयी

  • योग ही भारतातली पाच हजार वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. भारतीय संस्कृतीत योग हा एक प्राचीन शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक अभ्यास आहे. आज जगभरात विविध स्वरूपात त्याचा अभ्यास केला जातो आणि मानवी आरोग्याला उपयुक्त असा म्हणून त्याची लोकप्रियता वाढू लागली आहे.
  • दिनांक 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ठराव 69/131 मंजूर करून “21 जून” या तारखेला “आंतरराष्ट्रीय योग दिन” साजरा करण्याची घोषणा केली होती. भारताचे स्थायी प्रतिनिधी अशोक मुखर्जी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत यासंबंधीचा ठराव चर्चेसाठी मांडला होता. या पुढाकारास एकूण 177 राष्ट्रांच्या जागतिक नेत्यांचा पाठिंबा मिळाला, जे की अश्याप्रकारच्या कोणत्याही UNGA ठरावासाठी कधीही न पाहिले गेलेले प्रमाण होते. 2015 साली प्रथम योग दिन साजरा केला गेला.
  • 21 जून हा दिवस उत्तर गोलार्धात वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो, तर दक्षिण गोलार्धात हा दिवस सर्वात लहान असतो. याच दिवशी सूर्याचे दक्षिणायण सुरु होते, अर्थात सूर्य दक्षिणेकडे कलू लागतो.

# Current Affairs


चालू घडामोडी – सिक्कीम सरकारने पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याचा निर्णय घेतला

  • पाच दिवसांचा आठवडा रद्द, आता केवळ दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी
  • १ एप्रिलपासून नव्या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे
  • कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर नाखूष असल्याने सिक्कीम सरकारने पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने पाच आठवड्याची सुविधा पूर्णपणे रद्द केली असून दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी आदेशानुसार, १ एप्रिलपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.
  • गतवर्षी मे महिन्यात सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री प्रेमसिंह तमंग यांनी सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला होता. याआधी कर्मचाऱ्यांसाठी सहा दिवसांचा आठवडा होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना पाच दिवसांच्या आठवड्याची सुविधा देऊनही त्यांची कामगिरी न सुधारल्याने सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा सरकार नाराज होतं.
  • सरकारने २८ मे २०१९ मधील आदेशात बदल केला आहे. मुख्य सचिव एस सी गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२० पासून नव्या निर्णयाची अमलबजावणी होणार आहे. राज्यातील सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालयांना दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी मिळणार आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – छतावरील सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात गुजरात अग्रेसर

  • अक्षय ऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने, छतावरील सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात गुजरात राज्य देशात अग्रेसर ठरला आहे. राज्यात 2 मार्च 2020 पर्यंत अश्या सुमारे 50,915 सौर यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा द्वितीय क्रमांक लागतो. महाराष्ट्रात 5,513 प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
  • 2 मार्च 2020 पर्यंत देशभरात प्रस्थापित करण्यात आलेल्या 79,950 छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांपैकी गुजरातमध्ये 64 टक्के किंवा दोन तृतीयांश प्रकल्प आहेत. यासह राज्यातल्या सौरऊर्जा क्षमतेमध्ये वाढ होऊन ती 177.67 मेगावॅट इतकी झाली. देशभरात प्रस्थापित सर्व प्रकल्पांची एकत्रित क्षमता 322 मेगावॅट इतकी आहे.
  • गुजरात सरकारची “सूर्य गुजरात” योजना
  • वर्ष 2022 पर्यंत सुमारे आठ लक्ष वीज ग्राहकांना लाभ देण्याच्या उद्देशाने गुजरात राज्य सरकारने “सूर्य गुजरात” नावाची छतावरील सौरऊर्जा योजना स्वीकारली. राज्य सरकारने या योजनेसाठी 912 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. योजनेनुसार, अश्या प्रकाल्पापासून मिळणारी वीज घरासाठी वापरली जाते आणि अतिरिक्त ऊर्जा प्रति युनिट 2.25 रुपये या दराने राज्य खरेदी करते.
  • तसेच 3 किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पासाठी स्थानिक वापरकर्त्यांसाठी प्रकल्पांच्या किंमतीवर 40 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले गेले, तर 3 ते 10 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ते अनुदान 20 टक्के केली गेले.

# Current Affairs


चालू घडामोडी – शर्विका म्हात्रेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद -भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक

अलिबागच्या शर्विका म्हात्रेची भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून इंडीया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यातील लोणेरे येथे राहणारी शर्विका ही दीड वर्षांपासून गिर्यारोहण करत आहे. तिने अतिशय दुर्गम किल्ले पायी चढून सर केले आहेत.

जितेन म्हात्रे यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी कार्यालयाकडे शर्विकाचे गड किल्ल्यावर पायी चढतानाचे व्हिडीओ आणि कागदपत्रे पाठवली होती. ती तपासल्यानंतर शर्विकाची भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून नोंद करण्यात आली. इंडिया रेकॉर्ड ऑफ बुककडून शर्विकाला मेडल, प्रमाणपत्र, बुक देण्यात आले.

11गड-किल्ले मोहिमेत शर्विकाचा समावेश
आतापर्यंत ती अकरा गड-किल्ले मोहिमेत सहभागी झाली आहे. यात काही जलदुर्ग असले तरी सरसगड, प्रतापगड, रायगड आणि प्रबळगडाचा कलावंतीणीचा सुळका असे उंच गडही यात समाविष्ट आहेत. कोर्लईचा किल्ला, खांदेरी-उंदेरी, कुलाबा किल्ला, रेवदंड्याचा भुईकोटा, जंजिरा, पद्मदुर्ग यावरही ती फिरली आहे. त्या सर्वांची नावेही तिला पाठ आहेत

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम