चालू घडामोडी : 19 जुलै 2021
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 19 JULY 2021 | चालू घडामोडी : १९ जुलै २०२१
चालू घडामोडी –
Q1] ‘जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख केंद्रशासित प्रदेश यांचे एकत्र उच्च न्यायालय’ याचे नाव बदलून ______ असे ठेवण्यात आले आहे.
1) जम्मू व काश्मीर उच्च न्यायालय
2) लडाख उच्च न्यायालय
3) जम्मू व काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय
4) यापैकी नाही
उत्तर :- ‘जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख केंद्रशासित प्रदेश यांचे एकत्र उच्च न्यायालय’ याचे नाव बदलून ‘जम्मू व काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय’ (High Court of Jammu and Kashmir and Ladakh) असे ठेवण्यात आले आहे.
चालू घडामोडी –
Q2] ‘किसान सारथी’ मंच शेतकऱ्यांना ______ प्राप्त करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देतो.
1) योग्य वेळी योग्य माहिती
2) गंगा नदीची स्वच्छता
3) वार्षिक 12 रुपयांच्या प्रीमियमसह अपघाती विमा
4) यापैकी नाही
उत्तर :-शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छित भाषेत योग्य वेळी योग्य माहिती मिळावी या हेतूने केंद्रीय कृषी मंत्रालयाने ‘किसान सारथी’ नामक एक डिजिटल मंच तयार केला आहे.
चालू घडामोडी –
Q3] कोणत्या दिवशी खासी स्वातंत्र्यसैनिक यू. तिरोट सिंग सिएम यांची पुण्यतिथी दरवर्षी साजरी करतात?
1) 16 जुलै
2) 17 जुलै
3) 18 जुलै
4) 19 जुलै
उत्तर :- दरवर्षी 17 जुलै या दिवशी खासी स्वातंत्र्यसैनिक यू. तिरोट सिंग सिएम यांची पुण्यतिथी साजरी करतात. यू. तिरोट सिंग सिएम यांचा मृत्यू 17 जुलै 1835 रोजी झाला. ते 19व्या शतकातील खासी समुदायाचे प्रमुख होते.
चालू घडामोडी –
Q4] कोणत्या मंत्रालयाने ‘मॅपमायइंडिया’ कंपनी सोबत सामंजस्य करार करून उमंग अॅपमध्ये नकाशा सेवा सक्षम केल्या आहेत?
1) माहिती व प्रसारण मंत्रालय
2) दळणवळण मंत्रालय
3) इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
4) शिक्षण मंत्रालय
उत्तर :- व्यक्तीच्या जवळील सरकारी सुविधा शोधण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘मॅपमायइंडिया’ कंपनी सोबत सामंजस्य करार करून उमंग अॅपमध्ये नकाशा सेवा सक्षम केल्या आहेत. या सेवेमुळे लोकांना त्यांच्या जागेजवळील भाजी-बाजार, रक्तपेढी इत्यादी सरकारी सुविधा शोधता येणार.
चालू घडामोडी –
Q5] गुगल कंपनीने 18 जुलै 2021 रोजी प्रथम भारतीय महिला वैद्यकीय चिकित्सक _______ यांची 160 वी जयंती साजरी केली.
1) कादंबिनी गांगुली
2) चंद्रमुखी बसु
3) आनंदी गोपाळ जोशी
4) अबला बोस
उत्तर :- गुगल कंपनीने 18 जुलै 2021 रोजी प्रथम भारतीय महिला वैद्यकीय चिकित्सक कादंबिनी गांगुली यांची 160 वी जयंती साजरी केली.
चालू घडामोडी –
Q6] कोणत्या दिवशी ‘नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करतात?
1) 18 जुलै
2) 17 जुलै
3) 19 जुलै
4) 20 जुलै
उत्तर :- दरवर्षी 18 जुलै या दिवशी ‘नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करतात. नेल्सन मंडेला यांना दक्षिण आफ्रिकेचे रचनाकार मानले जाते. त्यांचा जन्म 18 जुलै 1918 रोजी झाला.
चालू घडामोडी –
Q7] कोणत्या राज्यात ‘पेरियार व्याघ्र अभयारण्य’ आहे?
1) ओडिशा
2) पश्चिम बंगाल
3) केरळ
4) तामिळनाडू
उत्तर :-केरळ राज्यात इदूक्की आणि पटणमथिट्टा या जिल्ह्यांच्यामध्ये ‘पेरियार व्याघ्र अभयारण्य’ आहे.
चालू घडामोडी –
Q8] भारताची पहिली विना-चालक ‘पॉड टॅक्सी’ सेवा ______ याला ग्रेटर नोएडा सोबत जोडणार.
1) जेवार आंतरराष्ट्रीय विमानतळ
2) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
3) बीजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ
4) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
उत्तर :-भारताची पहिली विना-चालक ‘पॉड टॅक्सी’ सेवा जेवार आंतरराष्ट्रीय विमानतळाला ग्रेटर नोएडा सोबत जोडणार.
चालू घडामोडी –
Q9] कोणत्या देशाने 16 जुलै 2021 रोजी पहिले दोन MH-60R मल्टी-रोल हेलिकॉप्टर भारतीय नौदलाला सुपूर्द केलेत?
1) रशिया
2) फ्रान्स
3) अमेरिका
4) इस्त्रायल
उत्तर :- अमेरिकेच्या नौदलाने 16 जुलै 2021 रोजी पहिले दोन MH-60R मल्टी-रोल हेलिकॉप्टर भारतीय नौदलाला सुपूर्द केलेत.
चालू घडामोडी –
Q10] कोणत्या देशाने सागरी सुरक्षेच्या संदर्भात ‘TTX-2021’ या आभासी त्रिपक्षीय बैठकीचे आयोजन केले?
1) भारत
2) श्रीलंका
3) मालदीव
4) वरील सर्व
उत्तर :- मालदीव, भारत, श्रीलंका या देशांनी सागरी सुरक्षेच्या संदर्भात ‘TTX-2021’ या आभासी त्रिपक्षीय बैठकीचे 14 जुलै आणि 15 जुलै 2021 रोजी आयोजन केले.

आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents