Current Affairs : 19 December 2020 | चालू घडामोडी : १९ डिसेंबर २०२०
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 19 December 2020 | चालू घडामोडी : १९ डिसेंबर २०२०
चालू घडामोडी –
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) विषयी 17 डिसेंबर 2020 रोजी ‘CMS-01’ (किंवा जीसॅट-12R) नामक भारताचा 42 वा दळणवळण उपग्रह यशस्वीपणे पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेत सोडला. श्रीहरिकोटाच्या द्वितीय प्रक्षेपण केंद्रातून PSLV-C50 प्रक्षेपकाने अंतराळात झेप घेतली. उपग्रह आपत्ती व्यवस्थापन आणि माहिती महाजाल संपर्कतेसाठी काम करणार आहे.
चालू घडामोडी –
रशिया देशावर पुढील दोन ऑलिम्पिकमध्ये किंवा पुढील दोन वर्ष कोणत्याही स्पर्धेत त्याचे नाव, ध्वज आणि राष्ट्रीय गीत वापरण्यावर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट या न्यायालयाने बंदी घातली.
चालू घडामोडी –
‘स्पेसएक्स क्रू-3’ अभियानाच्या कमांडर पदावर राजा चारी या भारतीय वंशाच्या अमेरिकावासीची निवड झाली आहे. ते अमेरिकेच्या हवाई दलाचे कर्नल आहेत. त्यांना पहिल्या खासगी मोहिमेच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) पाठवले जाणार आहे.
चालू घडामोडी –
‘सेनेका गन’ विज किंवा तोफच्या गर्जनेसारखा प्रचंड ध्वनी असतो. उत्तर कॅरोलिनाच्या काही भागात असा ध्वनी 150 हून अधिक वर्षांपासून ऐकला जात आहेत. घटनेचे कारण अज्ञात आहे.
चालू घडामोडी –
अल्फाबेट इंक. कंपनी ‘प्रोजेक्ट लून’ राबवित आहे आणि अल्फाबेट इंक. गूगलची एक उपकंपनी आहे. जगाच्या पाठीवर दुर्गम भागात इंटरनेट सेवा सुलभ करणे हे या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत हीलियमने भरलेले फुगे पाठवून, त्यावरील उपकरणांद्वारे हवाई वायरलेस नेटवर्क तयार केले जात आहे.
चालू घडामोडी –
दरवर्षी 18 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत दिन साजरा करतात. 2020 साली हा दिवस “रिईमॅजिनिंग ह्यूमन मोबिलीटी” या विषयाखाली साजरा करण्यात आला.
चालू घडामोडी –
बेंगळुरू शहरात “नेत्र / NETRA” (नेटवर्क फॉर स्पेस ऑब्जेक्ट ट्रॅकिंग अँड अॅनालिसिस) या नावाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याचे नवे “अंतराळ स्थिती जागृती (SSA) नियंत्रण केंद्र” उभारण्यात आले आहे, ज्याचे उद्दीष्ट भारताच्या अंतराळ मालमत्तांचे निरीक्षण, मागोवा आणि संरक्षण करणे आहे.
चालू घडामोडी –
गुजरातमधला 107 वर्ष जुना बिलीमोरा-वाघाई रेलमार्ग पश्चिम रेल्वे विभागाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
चालू घडामोडी –
शशी शेखर वेंपती (प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी) हे पुढील तीन वर्षांसाठी ‘आशिया प्रशांत प्रसारण संघ (ABU) याचे नवे उपाध्यक्ष आहेत.
आशिया प्रशांत प्रसारण संघ (ABU) याची स्थापना 1964 साली प्रसारण संस्थांची एक व्यवसायिक संघटना म्हणून केली गेली होती. 57 देश आणि प्रदेशात त्याचे सुमारे 286 सभासद आहेत.
चालू घडामोडी –
हिमाचल प्रदेश राज्यात दुर्लभ ‘हिमालयन शेळी (serow)’ आढळून आली आहे. हा प्राणी पाहता बकरी, गाढव, गाय आणि डुक्कर यांच्या संकरणाने तयार झालेला प्राणी असल्याचा भास होतो. हा एक मध्यम आकाराचा सस्तन प्राणी आहे.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents