चालू घडामोडी : १९ एप्रिल २०२१

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
105

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 19 April 2021 | चालू घडामोडी : १९ एप्रिल २०२१

चालू घडामोडी – 

1] कोणत्या मंत्रालयाने ‘ग्रामीण आरोग्य सांख्यिकी अहवाल’ प्रसिद्ध केला?

1) ग्रामीण विकास मंत्रालय
2) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
3) आयुष मंत्रालय
4) सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

उत्तर :- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘ग्रामीण आरोग्य सांख्यिकी अहवाल’ प्रसिद्ध केला. अहवालानुसार, सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये 76.1 टक्के तज्ञ चिकीत्सकांची कमतरता आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

2] ‘भारतीय हवाई दल कमांडर परिषद 2021’ या कार्यक्रमाची संकल्पना काय होती?

1) भविष्यासाठी पुनर्रचना
2) पुढील दशकात भारतीय हवाई दल
3) अथक प्रयत्न आणि सर्वोच्च त्याग
4) यापैकी नाही

उत्तर :- ‘भारतीय हवाई दल कमांडर परिषद 2021’ या कार्यक्रमाचा 16 एप्रिल 2021 रोजी नवी दिल्लीतील भारतीय हवाई दलाच्या मुख्यालयात समारोप झाला. यंदाच्या या परिषदेची ‘भविष्यासाठी पुनर्रचना’ ही संकल्पना होती. तीन दिवस चाललेल्या या परिषदेत भारतीय हवाई दलाच्या कार्यक्षमता वाढविण्याच्या मार्गांवर सविस्तर चर्चा झाली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

3] कोण राष्ट्रीय स्टार्टअप सल्लागार परिषदेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष होते?

1) निर्मला सीतारमण
2) रवी शंकर प्रसाद
3) राजनाथ सिंग
4) पियुष गोयल

उत्तर :- वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय स्टार्टअप सल्लागार परिषदेची पहिली बैठक झाली.
उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने देशातील स्टार्टअप कंपन्यांचे पालनपोषण करण्यासाठी एक परिसंस्था तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत सरकारला सल्ला देण्यासाठी राष्ट्रीय स्टार्टअप सल्लागार परिषदेची स्थापना केली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

4] कोणत्या दिवशी ‘जागतिक कला दिन’ साजरा करतात?

1) 17 एप्रिल
2) 16 एप्रिल
3) 14 एप्रिल
4) 15 एप्रिल

उत्तर :- दरवर्षी 15 एप्रिल या दिवशी जगभरात ‘जागतिक कला दिन’ साजरा करतात. ललित कलांचा जगभरात प्रसार करण्यासाठी तसेच सर्जनशील कृतीविषयी जनजागृती वाढवण्यासाठी ‘जागतिक कला दिन’ साजरा केला जातो. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

5] कोणत्या मंत्रालयाने ‘ईटस्मार्ट सिटीझ चॅलेंज’ आणि ‘ट्रान्सपोर्ट 4 ऑल चॅलेंज’ या स्पर्धांची सुरूवात केली?

1) रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय
2) गृह मंत्रालय
3) ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
4) गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय

उत्तर :- गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘ईटस्मार्ट सिटीझ चॅलेंज’ या स्पर्धेची सुरूवात केली. तसेच मंत्रालयाने परिवहन व विकास धोरण संस्था (ITDP) या संस्थेच्या सहकार्याने ‘ट्रान्सपोर्ट 4 ऑल चॅलेंज’ या स्पर्धेची देखील सुरूवात केली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

6] कोणत्या नक्षत्रात लायरीड उल्कावर्षावाचे प्रारण दिसून येते?

1) एक्वीला
2) हरक्यूलिस
3) लायरा
4) ड्रॅको

उत्तर :- दरवर्षी 16 एप्रिल ते 26 एप्रिल या काळात लायरा नक्षत्रात लायरीड उल्कावर्षावाचे प्रारण दिसून येते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

7] कोणत्या राज्यात मेत्तूर-सरबंगा उपसा सिंचन प्रकल्प आहे?

1) तामिळनाडू
2) हिमाचल प्रदेश
3) पश्चिम बंगाल
4) उत्तरप्रदेश

उत्तर :- तामिळनाडू राज्यात मेत्तूर-सरबंगा उपसा सिंचन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 4200 एकर क्षेत्राचे सिंचन केले जाणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

8] ‘अझडारचिड टेरोसॉरस’ हा प्राणी _____ या प्रसृष्टीचा आहे.

1) नॉन कॉरडाटा
2) कॉरडाटा
3) नेमाटोडा
4) आर्थ्रोपोडा

उत्तर :- ‘अझडारचिड टेरोसॉरस’ हा प्राणी ‘कॉरडाटा’ या प्रसृष्टीचा आहे. हवेत उडणारा हा प्राणी लेट क्रेटासियस युगात अस्तित्वात होता. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

9] कोणती संस्था ‘स्पेशल ड्रॉइंग राइट्स’ नावाची पूरक परकीय चलन साठा मालमत्ता सांभाळते?

1) आंतरराष्ट्रीय चलननिधी
2) जागतिक बँक
3) संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम
4) संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी

उत्तर :- आंतरराष्ट्रीय चलननिधी (IMF) ही संस्था ‘स्पेशल ड्रॉइंग राइट्स’ नावाची पूरक परकीय चलन साठा मालमत्ता परिभाषित करते आणि सांभाळते 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

10] खालीलपैकी कोणत्या नदीवर रोपॅक्स जेट्टी प्रकल्प उभारला जाईल?

1) कुशाभद्र नदी
2) महानदी
3) धमरा नदी
4) वंशाधरा नदी

उत्तर :- बंदर, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने सागरमाला उपक्रमाच्या अंतर्गत ओडिशातील धमरा नदीवर रोपॅक्स (रोल-ऑन / रोल-ऑफ पॅसेंजर) जेट्टी प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली आहे. 

# Current Affairs


 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम