Current Affairs :18 नोव्हेंबर 2019 चालू घडामोडी Latest

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
102

Visit Regularly our site to check Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Current Affairs : 18 November 2019 | चालू घडामोडी : 18 नोव्हेंबर 2019

चालू घडामोडी – श्रीलंकेच्या अध्यक्षपदी गोटाबाया राजपक्षे

  • श्रीलंकेतील अध्यक्षीय निवडणुकीत युद्धकाळातील वादग्रस्त संरक्षण सचिव गोटाबाया राजपक्षे यांची निवड झाली असून त्यांनी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार साजिथ प्रेमदास यांचा पराभव केला.
  • राजपक्षे घराणे हे चीनकडे झुकलेले असून सात महिन्यांपूर्वी ईस्टर संडेच्या दहशतवादी हल्ल्यात २६९ लोक मारले गेल्यानंतर निर्माण झालेल्या सुरक्षा आव्हानांमुळे या प्रश्नावर कठोर भूमिका घेतलेल्या गोटाबाया राजपक्षे यांची निवड अध्यक्षपदी झाली आहे.
  • राजपक्षे (वय ७०) हे मैत्रीपाल सिरीसेना यांचे उत्तराधिकारी असतील.
  •  श्रीलंकेला कर्जपुरवठा करणाऱ्या चीनबरोबरचे संबंध पुनस्र्थापित करण्याचे सूतोवाच त्यांनी केले असून श्रीलंका चीनच्या कर्जसापळ्यात गुंतत चालल्याची टीका होत असतानाही त्यांनी प्रचारातही चीनशी मैत्रीचे गोडवे गायले होते.
  • राजपक्षे हे १० वर्षे संरक्षण मंत्रालयात सचिव होते. त्यांना पाच वर्षांसाठी अध्यक्ष घोषित करण्यात आले आहे.
  • अध्यक्षीय निवडणुकीत राजपक्षे यांनी प्रेमदास यांच्यावर तेरा लाख मतांनी मात केली असून राजपक्षे यांना ६९२४२५५ म्हणजे ५५.२५ टक्के मते पडली. प्रतिस्पर्धी उमेदवार प्रेमदास यांना ५५६४२३९ म्हणजे ४१.९९ टक्के मते पडली. इतर उमेदवारांना ५.७६ टक्के मते मिळाली आहेत .

# Current Affairs


चालू घडामोडी – न्यायमूर्ती शरद बोबडे झाले सरन्यायाधीश; राष्ट्रपतींनी दिली शपथ

  • न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी देशाचे ४७वे सरन्यायाधीश म्हणून सकाळी साडेनऊ वाजता शपथ घेतली.
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पदाची शपथ दिली.
  •  न्यायमूर्ती शरद बोबडे यांची कारकीर्द १७ महिन्यांची असेल आणि ते सरन्यायाधीश पदावरून २३ एप्रिल २०२१ या दिवशी निवृत्त होतील.
  • सरन्यायाधीशपदी त्यांची निवड सेवाज्येष्ठतेनुसार झाली आहे. 
  • दरम्यान, न्याय संस्थेतील सर्वोच्च पदावर विराजमान होणारे न्यायमूर्ती शरद बोबडे हे चौथे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. त्यांच्यापूर्वी न्यायमूर्ती प्रल्हाद गजेंद्रगडकर, न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह, न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचुड यांनी सरन्यायाधीशपदी काम केलं आहे.

न्यायमूर्ती बोबडे –

  • न्या. बोबडे हे मूळचे नागपूरचे आहेत.
  • त्यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ रोजी झाला. बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे हे सुद्धा ज्येष्ठ विधिज्ञ आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते. न्या. शरद बोबडे यांचे शालेय शिक्षण नागपुरामध्ये झाले.
  • त्यानंतर त्यांनी १९७८ साली नागपूर विद्यापीठाशी संलग्नित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयातून ‘एल.एल.बी.’ची पदवी घेतली. त्यानंतर नागपूर खंडपीठात वकिलीला सुरूवात केली.
  • १९९८ साली त्यांना वरिष्ठ अधिवक्तापद देण्यात आले. २००० मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
  • त्यानंतर १६ ऑक्टोबर २०१२ रोजी न्यायमूर्ती बोबडे मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले.
  • १२ एप्रिल २०१३ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली.
  • २०१६ साली नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे (नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे) कुलपती म्हणून त्यांनी काम केलं.

# Current Affairs


चालू घडामोडी –  संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली

  • मोदी म्हणाले की, सर्व विषयावर साधकबाधक चर्चा व्हावी. मागील अधिवेशनाप्रमाणेच हे अधिवेशन देशाच्या विकासाला गती देईल.
  • अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वी पंतप्रधानांनी प्रसार माध्यमांशी वार्तालाप केला.
  • अधिवेशन काळात विरोधकांनी जास्तीत जास्त कामकाज होण्यासाठी सहकार्य आवाहन करताना मोदी म्हणाले, “संसदेच्या अधिवेशनामध्ये संवाद, चर्चा व्हावी.
  • सर्व विषयांवर सर्वांगिक चर्चा व्हावी, अशी सरकारची इच्छा आहे. २६ नोव्हेंबर हा संविधान दिन आहे.
  • संविधानामुळे देशाची एकता, अखंडता टिकून आहेत. या वर्षीचे हे अखेरचे सत्र आहे तसेच राज्यसभेचे २५० वे अधिवेशन आहे.
  • मागील अधिवेशन अभूतपूर्व होते. त्यात सर्वाधिक कामकाज झाले. याचे श्रेय सर्व पक्षांच्या खासदारांचे आहे. आता आशा आहे की आता हे हिवाळी अधिवेशनही असेच सर्वाधिक कामकाजाचे ठरेल, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

# Current Affairs


 

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम