चालू घडामोडी : 18 जुलै 2021
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 18 JULY 2021 | चालू घडामोडी : १८ जुलै २०२१
चालू घडामोडी –
Q1] भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने कोकिंग कोळसा याच्या संदर्भात सहकार्यासाठी भारताच्या _____ सोबत होणाऱ्या सामंजस्य कराराला मान्यता दिली.
1) चीन
2) अमेरिका
3) रशिया
4) फ्रान्स
उत्तर :- 16 जुलै 2021 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोकिंग कोळसा याच्या संदर्भात सहकार्यासाठी भारताच्या रशिया देशासोबत होणाऱ्या सामंजस्य कराराला मान्यता दिली. हा करार भारतीय पोलाद मंत्रालय आणि रशियाचे ऊर्जा मंत्रालय यांच्यात होणार आहे, त्यामुळे देशातील पोलाद निर्मितीत कमी खर्च होईल.
चालू घडामोडी –
Q2] कोणत्या शहरात 14 जुलै 2021 रोजी शांघाय सहकार्य संघटनेची बैठक पार पडली?
1) दुशान्बे
2) नवी दिल्ली
3) शांघाय
4) ताशकंद
उत्तर :-ताजिकिस्तान देशाची राजधानी दुशान्बे या शहरात 14 जुलै 2021 रोजी शांघाय सहकार्य संघटनेची बैठक पार पडली. त्यात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
चालू घडामोडी –
Q3] कोणत्या दिवशी ‘जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिवस’ साजरा करतात?
1) 16 जुलै
2) 17 जुलै
3) 18 जुलै
4) 19 जुलै
उत्तर :- दरवर्षी 17 जुलै या दिवशी ‘जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिवस’ किंवा ‘आंतरराष्ट्रीय न्याय दिवस’ साजरा करतात. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या (ICC) कार्याला पाठिंबा व मान्यता देण्यासाठी जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. 17 जुलै 1998 रोजी रोम कायदा स्वीकारल्यामुळे आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय (ICC) अस्तित्वात आले.
चालू घडामोडी –
Q4] कोणत्या शहरात ‘रुद्राक्ष’ नामक आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले?
1) लखनऊ
2) कानपूर
3) वाराणसी
4) मेरठ
उत्तर :- 15 जुलै 2021 रोजी वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे ‘रुद्राक्ष’ नामक आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले.
चालू घडामोडी –
Q5] खालीलपैकी कोणते ‘मंडुआदीह रेल्वे स्थानक’ याचे नवीन नाव आहे?
1) बनारस रेल्वे स्थानक
2) गोरखपूर रेल्वे स्थानक
3) दीनदयाल उपाध्याय स्थानक
4) यापैकी नाही
उत्तर :- 15 जुलै 2021 पासून उत्तर-पूर्व रेल्वे विभागात येणाऱ्या ‘मंडुआदीह रेल्वे स्थानक’ याचे नवीन नाव ‘बनारस रेल्वे स्थानक’ हे आहे.
चालू घडामोडी –
Q6] कोणत्या जिल्ह्यात भारतातील पहिले ‘धान्य वितरण करणारे एटीएम’ स्थापन करण्यात आले?
1) फरीदाबाद
2) अंबाला
3) फतेहाबाद
4) गुरुग्राम
उत्तर :- हरयाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यातील फर्रुखनगर येथे भारतातील पहिले ‘धान्य वितरण करणारे एटीएम’ स्थापन करण्यात आले.
चालू घडामोडी –
Q7] 2025 सालापर्यंत सेंद्रिय पद्धतीने शेती करणारा प्रदेश म्हणून अस्तित्वात येण्यासाठी लडाखच्या प्रशासनाने ______ सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे.
1) अरुणाचल प्रदेश
2) पश्चिम बंगाल
3) सिक्किम
4) नागालँड
उत्तर :-2025 सालापर्यंत सेंद्रिय पद्धतीने शेती करणारा प्रदेश म्हणून अस्तित्वात येण्यासाठी लडाखच्या प्रशासनाने सिक्कीम सरकारच्या सिक्कीम राज्य सेंद्रिय प्रमाणीकरण संस्था (SOCCA) सोबत सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या अंतर्गत लडाख प्रदेशात परंपरागत कृषी विकास योजना आणि मिशन ऑर्गनिक डेवलपमेंट इनिशीएटीव (MODI) यांची अंमलबजावणी केली जाईल.
चालू घडामोडी –
Q8] कोणत्या संस्थेने 14 जुलै 2021 रोजी सुधारित हवामान व ऊर्जा कायद्यांचे ‘फिट फॉर 55’ पॅकेजचे अनावरण केले?
1) संयुक्त राष्ट्रसंघ
2) युरोपिय आयोग
3) UNESCO
4) UNICEF
उत्तर :-युरोपिय आयोगाने 14 जुलै 2021 रोजी सुधारित हवामान व ऊर्जा कायद्यांचे ‘फिट फॉर 55’ पॅकेजचे अनावरण केले. या उपक्रमामधून 2030 सालापर्यंत 55 टक्के निव्वळ कार्बन उत्सर्जन कपात करण्यासाठी धोरणांना संरेखित करण्याचे उद्दीष्ट आहे.
चालू घडामोडी –
Q9] खालीलपैकी कोणते नुकतेच जाहीर झालेल्या ‘FASTER’ योजनेचे पूर्ण नाव आहे?
1) फास्ट अँड सेफेस्ट ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स
2) फास्ट अँड सेफर ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स
3) फास्ट अँड सिक्युअर ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स
4) यापैकी नाही
उत्तर :- 16 जुलै 2021 रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी ‘FASTER’ (फास्ट अँड सिक्युअर ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स) योजना जाहीर केली.
चालू घडामोडी –
Q10] केंद्रीय मंत्रिमंडळाने संविधानाच्या ‘कलम 340’ अन्वये OBC मधील उप-वर्गीकरणाविषयी मुद्याच्या परीक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचा कार्यकाळ ______ पर्यंत वाढविण्यास मान्यता दिली आहे.
1) 31 मे 2022
2) 30 एप्रिल 2022
3) 31 मार्च 2022
4) 31 जानेवारी 2022
उत्तर :- केंद्रीय मंत्रिमंडळाने संविधानाच्या ‘कलम 340’ अन्वये इतर मागासवर्गीय (OBC) मधील उप-वर्गीकरणाविषयी मुद्याच्या परीक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचा कार्यकाळ 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढविण्यास मान्यता दिली आहे. आयोगाचा कार्यकाळ वाढविण्याची ही अकरावी वेळ आहे. 11 ऑक्टोबर 2017 रोजी कामकाज सुरू करणार्या या आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश जी. रोहिणी या आहेत.

आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents