चालू घडामोडी : 14 जुलै 2021

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
79

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 14 JULY 2021 | चालू घडामोडी : १४ जुलै २०२१

चालू घडामोडी – 

Q1] कोणत्या व्यक्तीची फेडरल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर पुनर्नियुक्ती झाली?

1) श्याम श्रीनिवासन
2) राकेश शर्मा
3) संदीप बख्शी
4) अमिताभ चौधरी

उत्तर :- भारतीय रिझर्व्ह बँकेने फेडरल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर श्याम श्रीनिवासन यांच्या पुनर्नियुक्तीसाठी मंजूरी दिली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q2] कोणत्या संस्थेने “न्यू शेपर्ड’ प्रक्षेपक प्रणालीद्वारे मनुष्याला अंतराळात पाठविण्याच्या मोहिमेसाठी “ब्लू ओरिजिन” कंपनीचा परवाना मंजूर केला?

1) फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन
2) एयरक्राफ्ट ओनर्स अँड पायलट्स असोसिएशन
3) बोईंग
4) एक्सपेरिमेंटल एयरक्राफ्ट असोसिएशन

उत्तर :-फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FAA) या संस्थेने “न्यू शेपर्ड’ प्रक्षेपक प्रणालीद्वारे मनुष्याला अंतराळात पाठविण्याच्या मोहिमेसाठी अमेरिकेच्या “ब्लू ओरिजिन” कंपनीचा परवाना मंजूर केला. 20 जुलै 2021 रोजी अ‍ॅमेझॉन कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी जेफ बेझोस या मोहिमेतून अंतराळ प्रवास करणार आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q3] भारत आणि _____ या देशांनी “2030 रोडमॅप’ या पथदर्शी योजनेला मान्यता दिली आणि प्रथम वित्तीय बाजारपेठा संवाद आयोजित केला?

1) फ्रान्स
2) ब्रिटन
3) अमेरिका
4) इस्त्रायल

उत्तर :- 9 जुलै 2021 रोजी भारत आणि ब्रिटन या देशांच्या प्रधानमंत्र्यांचा प्रथम वित्तीय बाजारपेठ संवाद आयोजित करण्यात आला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q4] कोणत्या देशात ‘क्विंगदाओ बंदर शहर’ हे शहर वसलेले आहे, जिथे प्रचंड प्रमाणात फुललेल्या शेवाळाची घटना बातमीत आहे?

1) फ्रान्स
2) मालदीव
3) चीन
4) इटली

उत्तर :- चीन देशाच्या पूर्व शेडोंग प्रांतात ‘क्विंगदाओ बंदर शहर’ हे शहर वसलेले आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q5] कोणत्या राज्यात ’लेमरू हत्ती अभयारण्य’ आहे?

1) छत्तीसगड
2) उत्तर प्रदेश
3) बिहार
4) ओडिशा

उत्तर :- छत्तीसगड राज्यात ’लेमरू हत्ती अभयारण्य’ आहे. हे अरण्य ओडिशा आणि झारखंड राज्यांच्या सीमेवर आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q6] कोणत्या अंतराळ संस्थेने 2023 या वर्षात “व्होलाटाइल्स इन्व्हेस्टिगेशन पोलर एक्सप्लोरेशन रोव्हर (VIPER)” मोहीम प्रक्षेपित करणार असल्याची घोषणा केली?

1) ISRO
2) NASA
3) JAXA
4) CNES

उत्तर :- अमेरिकेच्या NASA संस्थेने चंद्राच्या पृष्ठभागावर आणि त्याखाली बर्फ आणि इतर स्त्रोतांचा शोध घेण्यासाठी “व्होलाटाइल्स इन्व्हेस्टिगेशन पोलर एक्सप्लोरेशन रोव्हर (VIPER)” नावाचा त्याचा पहिला मोबाइल रोबोट / यंत्रमानव 2023 या वर्षाच्या शेवटी चंद्रावर पाठविणार असल्याची घोषणा केली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q7] कोणत्या राज्यात शुक्ल पक्षच्या दुसर्‍या दिवशी ‘आषाढी बिज’ सण साजरा करतात?

1) हिमाचल प्रदेश
2) गुजरात
3) राजस्थान
4) मध्य प्रदेश

उत्तर :-गुजरात राज्यात शुक्ल पक्षच्या दुसर्‍या दिवशी ‘आषाढी बिज’ सण साजरा करतात. हा दिवस कच्छी नववर्ष म्हणून ओळखला जातो. गुजरातच्या कच्छ भागात हा सण साजरा करतात. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q8] 2022 या वर्षात ‘खेलो इंडिया युथ गेम्स’ _____ राज्यात आयोजित केले जाणार आहेत.

1) पंजाब
2) हरयाणा
3) गुजरात
4) उत्तर प्रदेश

उत्तर :-2022 या वर्षात फेब्रुवारी महिन्यात हरयाणा सरकार ‘खेलो इंडिया युथ गेम्स’ याचे आयोजन करणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q9] कोणत्या व्यक्तीने सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी इथिओपिया देशाच्या पंतप्रधान पदाची निवडणूक जिंकली?

1) अबी अहमद
2) जव्हार मोहम्मद
3) लेम्मा मेगेर्सा
4) यापैकी नाही

उत्तर :- अबी अहमद यांनी इथिओपिया देशाच्या पंतप्रधान पदाची निवडणूक जिंकली असून ते सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी निवडून आले आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q10] कोणती व्यक्ती“द रामायण ऑफ श्री गुरु गोबिंद सिंग जी” पुस्तकाचे लेखक आहे?

1) अरुंधती रॉय
2) बलजित कौर तुलसी
3) किरण देसाई
4) अंजुम हसन

उत्तर :- (दिवंगत) श्रीमती बलजित कौर तुलसी या “द रामायण ऑफ श्री गुरु गोबिंद सिंग जी” पुस्तकाचे लेखक आहेत. 

# Current Affairs


mpscexams Free Current Affairs Quiz
Free Current Affairs Quiz

आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम