चालू घडामोडी : 10 जुलै 2021
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 10 JULY 2021 | चालू घडामोडी : १० जुलै २०२१
चालू घडामोडी –
Q1] कोणत्या मंडळाने “मानव अधिकार: नयी दिशाएं” या वार्षिक हिंदी पत्रिकेमध्ये प्रकाशित झालेल्या लेखांना आमंत्रित केले?
1) राष्ट्रीय मानवी हक्क आयोग
2) राष्ट्रीय महिला आयोग
3) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग
4) यापैकी नाही
उत्तर :- राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने (NHRC) “मानव अधिकार: नयी दिशाएं” या वार्षिक हिंदी पत्रिकेमध्ये प्रकाशित झालेल्या लेख, कथा आणि कवितांना आमंत्रित केले आहे. आयोग या साहित्यकृती त्याच्या प्रकाशाणांत प्रकाशित करणार असून त्याची संकल्पना “नैसर्गिक आपत्ती आणि मानवी हक्क” ही आहे.
चालू घडामोडी –
Q2] _____ ही एअरबस H125 हेलिकॉप्टर खरेदी करून विमानाच्या खरेदी करारावर स्वाक्षरी करणारी गुजरातमधील गिफ्ट सिटी येथील पहिली कंपनी ठरली आहे.
1) व्हिमान एव्हिएशन सर्व्हिसेस
2) डेक्कन एव्हिएशन लिमिटेड
3) पॅरामाउंट एअरवेज
4) इंडिगो
उत्तर :- व्हिमान एव्हिएशन सर्व्हिसेस ही एअरबस H125 हेलिकॉप्टर खरेदी करून विमानाच्या खरेदी करारावर स्वाक्षरी करणारी गुजरातमधील गिफ्ट सिटी येथील पहिली कंपनी ठरली आहे.
चालू घडामोडी –
Q3] कोणत्या खंडात हैती या नावाचा देश आहे, जो पूर्व दिशेला डोमिनिक प्रजासत्ताक देशासोबत हिस्पॅनियोला बेट सामायिक करतो?
1) आफ्रिका
2) उत्तर अमेरीका
3) युरोप
4) दक्षिण अमेरिका
उत्तर :- उत्तर अमेरीका खंडातील हैती देशाचे राष्ट्राध्यक्ष जोवेनेल मोईज यांची हत्या झाली. हैती हा एक कॅरिबियन देश आहे. त्याची राजधानी पोर्ट-औ-प्रिन्स हे शहर आहे.
चालू घडामोडी –
Q4] _____ राज्याच्या छतरपूर जिल्ह्यात ‘बक्सवाहा संरक्षित वनक्षेत्र’मधील प्रस्तावित हिऱ्याची खाण आहे.
1) छत्तीसगड
2) ओडिशा
3) मध्य प्रदेश
4) झारखंड
उत्तर :- मध्य प्रदेश राज्याच्या छतरपूर जिल्ह्यात ‘बक्सवाहा संरक्षित वनक्षेत्र’मधील प्रस्तावित हिऱ्याची खाण आहे. त्या ठिकाणी दरवर्षी सुमारे 5 दशलक्ष टन उत्खनन होईल.
चालू घडामोडी –
Q5] कोणत्या राज्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे?
1) महाराष्ट्र
2) गुजरात
3) राजस्थान
4) मध्य प्रदेश
उत्तर :- महाराष्ट्र राज्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे.
चालू घडामोडी –
Q6] कोणत्या मंत्रालयाने “स्पर्श / SPARSH” नामक एकात्मिक प्रणाली अंमलात आणली आहे, ज्यामार्फत निवृत्तीवेतनाला स्वयंचलितरीत्या मंजुरी मिळते तसेच त्याचे वितरण केले जाते?
1) गृह कार्य मंत्रालय
2) संरक्षण मंत्रालय
3) संसदीय कार्य मंत्रालय
4) कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालय
उत्तर :- संरक्षण मंत्रालयाने “स्पर्श / SPARSH” नामक एकात्मिक प्रणाली अंमलात आणली आहे, ज्यामार्फत संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच्या निवृत्तीवेतनाला स्वयंचलितरीत्या मंजुरी मिळते तसेच त्याचे वितरण केले जाते
चालू घडामोडी –
Q7] कोणत्या देशात जगातील सर्वात उंच ‘वाळूपासून बनविलेला महल’ आहे?
1) जर्मनी
2) डेन्मार्क
3) फ्रान्स
4) स्पेन
उत्तर :-डेन्मार्क देशात वाळूपासून जगातील सर्वात उंच महल उभारण्यात आला आहे. तो महल 21.16 मीटर उंचीचा आहे. त्याच्या निर्मितीसाठी 4860 टन वाळू वापरली गेली.
चालू घडामोडी –
Q8] कोणत्या राज्याच्या / केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने ‘मुख्यमंत्री कोविड-19 परिवार आर्थिक सहायता योजना’ लागू केली?
1) उत्तर प्रदेश
2) जम्मू व काश्मीर
3) दिल्ली
4) बिहार
उत्तर :-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या केंद्रशासित प्रदेशात ‘मुख्यमंत्री कोविड-19 परिवार आर्थिक सहायता योजना’ लागू करण्यात आल्याची घोषणा केली. कोविड-19 आजारामुळे कमवत्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याच्या हेतूने ही सामाजिक सुरक्षा योजना तयार करण्यात आली आहे.
चालू घडामोडी –
Q9] खालीलपैकी कोणत्या प्रजातीची शोधली गेलेली ‘ग्रेव्हेलिया बोरो’ ही नवीन जात आहे?
1) भूमिगत कोळी
2) इंडियन वुल्फ सर्प
3) जंगली तांदूळ
4) यापैकी नाही
उत्तर :- आसाममध्ये शोधली गेलेली ‘ग्रेव्हेलिया बोरो’ ही ‘भूमिगत कोळी’ प्रजातीची एक नवीन जात आहे. ही भूमिखाली राहणारे कोळी आहे.
चालू घडामोडी –
Q10] “न्यूज ऑन एअर रेडिओचे थेट प्रसारण याच्या लोकप्रियतेबाबत जागतिक क्रमवारी” याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. क्रमवारीमध्ये भारताला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
2. फिजी देशाने पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
1) फक्त 1
2) फक्त 2
3) 1 आणि 2
4) यापैकी एकही नाही
उत्तर :- दिलेल्यापैकी कोणतेही विधान अचूक नाही, त्यामुळे पर्याय (D) उत्तर आहे.
प्रसारभारतीच्या अधिकृत असलेल्या ‘न्यूज ऑन एअर’ या अप्लिकेशनवर ऑल इंडिया रेडिओचे थेट प्रसारण जेथे सर्वाधिक लोकप्रिय आहे, अशा बाबतीत जागतिक क्रमवारीत असणाऱ्या देशांमध्ये (भारत वगळता), अमेरिका सातत्याने पहिल्या क्रमांकावर आहे. फिजीने पाचव्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. ऑल इंडिया रेडिओची (आकाशवाणी) तेलगू आणि तमिळ थेट प्रसारण सेवा (लाइव्ह स्ट्रीम सर्विसेस) अमेरिकेमध्ये लोकप्रिय आहे तर आकाशवाणीची पंजाबी सेवा ब्रिटनमध्ये लोकप्रिय आहे.
आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents