Current Affairs : 04 April 2020 | चालू घडामोडी :०४ एप्रिल २०२०

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
176

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 04 April 2020 | चालू घडामोडी :०४ एप्रिल २०२०

चालू घडामोडी – NCC योगदान’ सराव

  • कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) या संरक्षण क्षेत्रातल्या विद्यार्थी संघटनेनी ‘NCC योगदान’ नावाचा उपक्रम देशात राबविण्यास सुरुवात केली आहे.
  • या उपक्रमाच्या माध्यमातून नागरी अधिकाऱ्यांना मदत दिली जात आहे. महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानात्मक परिस्थितीत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी गुंतलेल्या विविध संस्थांना मदत देण्याच्या मार्गदर्शक सूचना संघटनेचे सदस्य असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.
  • मदत क्रमांक / कॉल सेंटरमध्ये सेवा, आवश्यक वस्तू / औषधे / अन्न यांचे वितरण, नागरिकांना मदत; माहितीचे व्यवस्थापन तसेच रांगेचे आणि रहदारीचे व्यवस्थापन अशी कामे विद्यार्थी करीत आहेत. विद्यार्थी कायदे व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी काम करणार नाहीत.
  • 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले NCC अधिकारीच्या देखरेखीखाली 8 ते 20 च्या गटात काम करणार आहेत.

NCC विषयी

  • राष्ट्रीय विद्यार्थी सेना (National Cadet Corps -NCC) ही देशातल्या तरुणाईला शिस्तबद्धता आणि राष्ट्रीय नागरिकत्व क्षेत्रात प्रोत्साहन देणारी भारतीय भुदल, नौदल आणि हवाई दल यांची एक तिहेरी सेवा संघटना आहे.
  • NCCची 1948 साली स्थापना झाली व त्याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे. दरवर्षी NCC कडून मुलगी तसेच मुलग्यांसाठी पर्वतारोहणाच्या मोहिमा आयोजित करते.

# Current Affairs


चालू घडामोडी – जीवन लाइट’: IIT हैदराबाद या संस्थेत तयार करण्यात आलेले कमी किंमतीचे व्हेंटिलेटर

  • हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या सांगोपणात वाढणाऱ्या एरोबिओसिस इनोव्हेशन्स या स्टार्टअप उद्योगाने कमी किमतीचे स्वदेशी व्हेंटिलेटर तयार केले आहे.
  • त्यांनी त्याला ‘जीवन लाइट’ व्हेंटिलेटर असे नाव दिले.कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते, ज्याद्वारे त्यांना प्राणवायू पोहचवला जातो. देशात रुग्णांची वाढती संख्या पाहता आणीबाणी परिस्थितीसाठी सज्ज राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे. त्यात देशांमधली वाहतूक बंद असल्यामुळे परदेशांमधून उपकरणांची आयात बंद आहे. त्यामुळे संस्थेच्या पुढाकाराने हे उपकरण तयार करण्यात आले आहे.
  • सध्या औद्योगिक भागीदाराच्या सहकार्याने दररोज कमीत कमी 50 ते 70 एकाकांचे उत्पादन घेणे हे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

जीवन लाइट’उपकरणाची वैशिष्ट्ये

  • व्हेंटिलेटर अ‍ॅपद्वारे चालवले जाऊ शकते आणि त्यामधील संकेत प्रत्यक्ष वेळेत प्रदान केले जाऊ शकते.
  • टेलिमेडिसिन समर्थनासाठी रूग्णाच्या प्रत्येक श्वासाची नोंद वैद्यांकडे होते. उपकरण पाच तासांपर्यंत Cबॅटरीवर चालविले जाऊ शकते, ज्यामुळे वीज पुरवठा नसलेल्या भागात सुद्धा वापरले जाऊ शकते.
  • हे उपकरण बालकांसाठी आणि प्रौढ रूग्णांसाठी वापरले जाऊ शकते.

# Current Affairs


चालू घडामोडी –   फिफाने फुटबॉलपटूंच्या वयाची मर्यादा वाढवली

  • फुटबॉलची जागतिक संघटना फिफाने टोकियो ऑलिम्पिकसाठी फुटबॉलपटूंच्या वयोमर्यादेत वाढ केली आहे.
  • आता ऑलिम्पिकमध्ये १ जानेवारी १९९७ किंवा त्यानंतर जन्मलेले फुटबॉलपटू सहभागी होऊ शकतील. म्हणजे आता २०२१ मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत २४ वर्षांखालील फुटबॉलपटू खेळताना दिसतील.
  • हा निर्णय टोकियो ऑलिम्पिकला एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्याने घेतला.
  • ऑलिम्पिकमध्ये फुटबॉलमध्ये २३ वर्षांखालील खेळाडू सहभागी होत असत.

# Current Affairs


चालू घडामोडी –महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागाची व्हॉट्स अ‍ॅपवर कोविड-19 हेल्पलाइन सुरू

  •   नागरिकांच्या मनात कोरोना विषाणूसंदर्भात अनेक प्रश्न आहेत. सोशल मीडियावर फॉरवर्ड होणा-या चुकीच्या माहितीमुळे अनेकांमध्ये भीतीचेवातावरण निर्माण झाले आहे.
  •  सर्वसामन्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सोशल मीडियाचेच माध्यम निवडले असून, व्हॉट्स अ‍ॅपवर स्टेट कोविड हेल्पलाइन सुरू केली आहे.
  •   तर ही सेवा विनामूल्य असून, सध्या पसरलेल्या कोविड-19 साथीबद्दल अचूक, विश्वासार्ह व अद्ययावत माहिती मिळवण्याचा केंद्रीय स्रोत म्हणून ही हेल्पलाइन काम करणार आहे.
  •   व्हॉट्स अ‍ॅपवरील ही कोविड महाराष्ट्र हेल्पलाइन वापरण्यासाठी केवळ +91 20 2612 7394 हा क्रमांक आपल्या फोन कॉण्टॅक्ट्समध्ये सेव्ह करावा आणि मग असा मेसेज या क्रमांकावर पाठवावा. ही हेल्पलाइन सेवा सुरू होईल.
  •  तसेच ही सेवा इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांत उपलब्ध होणार आहे. कोविड हेल्पलाइन महाराष्ट्र ही एक स्वयंचलित चॅटबोटसेवा असून, याद्वारे नागरिकांच्या कोरोना विषाणूसंदभार्तील प्रश्नांना सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे 24 तासांच्या आत खात्रीशीर उत्तरे दिली जात आहेत.

 # Current Affairs

आजचे चालू घडामोडीचे PDF मिळवण्यासाठी येथे क्लिक करा


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम