Coronavirus | एमपीएससी पूर्वपरीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित, SMS द्वारे तारीख कळवणार
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
आताच प्राप्त झालेल्या अपडेट नुसार राज्यातील करोनाचा Coronavirus दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अधिकृत परिपत्रका द्वारे जाहीर केला आहे.
26 एप्रिलला होणारी एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पुढची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. तसंच 10 मे रोजी होणारी दुय्यम सेवा अरापत्रित परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. या दोन्ही परीक्षांच्या तारखा उमेदवारांना एसएमएसद्वारे कळवण्यात येईल असंही आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच उमेदावारांनी वेळोवेळी आयोगाची वेबसाईटही चेक करावी, असं सांगण्यात आली आहे.
एमपीएससीची पूर्वपरीक्षा आधी 4 एप्रिलला होणार होती. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर ती पुढे ढकलून 26 एप्रिल रोजी घेण्यात येईल, असं सांगण्यात आलं. आता मात्र 26 एप्रिलपासून पूर्वपरिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
सध्या कोरोना परिस्थिती मुळे आपण घरी असाल तर एक महत्वाची बातमी, सध्या आम्ही मोफत सराव परीक्षा (टेस्ट सिरीज) सुरु केल्या आहे. यात रोज चालू घडामोडी , पोलीस भरती, इतिहास,भूगोल व विज्ञान असेल एकूण पाच नवीन पेपर प्रकाशीत होत असतात. या पेपर्स मध्ये सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट आहेत. तेव्हा या लिंक वरून किंवा MPSCExams (https://www.mpscexams.com/) वरून रोज या पेपर्सचा सराव करावा.