तात्या टोपे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती (१८१४-१८५९)
(१८१४-१८५९)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
तात्या टोपे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(१८१४-१८५९)
पूर्ण नाव : रामचंद्र पांडुरंग टोपे
टोपण नाव: तात्या टोपे
जन्म : १८१४ (येवला नाशिक )
मृत्यू: १८ एप्रिल १८५९ (शिवपूरी मध्यप्रदेश)
चळवळ : १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध
धर्म : हिंदू
वडील : पांडुरंगराव टोपे
आई : रखमाबाई
-
तात्या टोपे हे १८५७ च्या उठावामधील सेनानी होते.
तात्या टोपे यांचा जन्म १८१४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी झाला. पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. त्यांचे मूळ नाव रघुनाथ, त्यांचे नाव रामचंद्र असेही ठेवण्यात आले होते. रघुनाथचे वडील पेशव्यांकडे दानाध्यक्ष्ज्ञाचे काम पाहण्यासाठी ब्रह्मावर्तास येऊन राहिले. पर्यायाने रघुनाथचे अर्थात
तात्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर गेले. पुढे बरीच वर्षे नानांच्या दरबारात तात्या कारकुनी कामांत गुतलेले होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात ग्वाल्हेरहून तात्यांनी आणलेल्या सैन्यावर मुख्य सेनापती म्हणून नानासाहेबांनी त्यांचीच निवड केली. त्या वेळी तात्यांच्या कर्तृत्वाचा कस लागला, कानपूरवर चढाई करण्यासासाठी तात्या सज्ज झाले.
१८५७ मधील दिल्ली, लखनौ, जगदीशपूर व कानपूर या ठिकाणच्या उठावांचे सुत्रधार तात्या टोपेच होते. त्यांचा धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा यांच्या बळावर त्यांच्या तलवारीला धार आली होती.
कानपूर, लखनौ, झाशी असे कूच करताना तात्यांचा पराक्रम पणाला लागला. कमकुवत सैन्य, नियोजनाची कमतरता, पैसा रसद तोफा या साधनांची कमतरता असताना त्यांना यशापयशाची चव चाखायला लागत होती, पण तात्यांची ध्येयासक्ती प्रचंड होती.
नानासाहेब पेशवे यांचा अज्ञातवास, ग्वाल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईचा पराभव या पार्श्वभूमीवर एकच मराठी वाघ शत्रूला तोंड देत होता. शत्रूवर जबर बसवत होता, वेळोवेळी इंग्रजांच्या तावडीतून सुटून पुढचे ध्येय गाठण्याचा त्यांचा यत्न इंग्रजांना मेटाकुटीला आणत होता. तात्यांच्या या पराक्रमाची गाया जगभर पसरली. काही युरोपियन इतिहासकारांनी तात्यांच्या शौर्याचा गौरव त्या काळी केला होता.
तात्यांची एकाकी झुंज थकली, जिंकण्याची आशा लोपली. इंग्रजांपुढे वाकायचे नाही हा निश्चय मात्र कायम होता. तात्या शत्रूपासून बचाव करताना मानसिंग या मित्राच्या आश्रयाला गेले. तात्यांच्या पराक्रमाला विटी पाडणारी घटना घडली, तात्यांचा मागमूस काढणारी इंग्रजी फौज मानसिंगापर्यंत पोहोचली. मानसिंगाची फितुरी नडली आणि तात्या इंग्रजांचे कैदी झाले.
७ एप्रिल १८५९ रोजी आरोपांना उत्तर देताना तात्यांच्या चेहेऱ्यावर भीती नव्हते, अपराधीपणा नव्हता, दुःख तर नव्हतेच, देशाभिमान आन् हौतात्म्याचे समाधान मात्र होते. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातल्या होमकुंडात तात्यांची शेवटची आहुती पडली. १८ एप्रिल १८५९ रोजी त्यांना मध्यप्रदेशातील शिवपूर येथे फाशी देण्यात आली. या ठिकाणीच त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. तसे तात्या टोपेंचे पुतळे मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी आहेत. तात्या टोपे स्टेडियम आहे, शेजारी टोपेंचा भव्य पूतळा आहे.
- Tatya Tope’s OPERATION RED LOTUS या पुस्तकात अनेक असे पुरावे दिलेले आहेत जे सिद्ध करतात की १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध हे एक वेल प्लॅन्ड ऑपरेशन होते.
- नवी दिल्ली – केंद्रीय सांस्कृतीक मंत्री महेश शर्मा यांनी १८५७ च्या संग्रामातील शहीद नायक तात्या टोपे यांच्या सन्मानार्थ २०० रुपयांचे स्मृती नाणे आणि १० रुपयांचे नाणे आणले.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents