अभय बंग यांच्या बद्दल संपूर्ण माहिती (सप्टेंबर 23, इ.स. 1950 – हयात)
जन्म : २३ सप्टेंबर १९५०
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अभय बंग (सप्टेंबर २३, इ.स. १९५० – हयात) हे मराठी डॉक्टर आहेत. ते सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूप (मॉडेल) वापरतात. वैद्यकीय नियतकालिक द लॅन्सेटमध्ये त्यांचे अनेक लेख छापून आलेले आहेत. त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
अभय बंग यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
अभय बंग (सप्टेंबर २३, इ.स. १९५० – हयात) हे मराठी डॉक्टर आहेत. ते सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूप (मॉडेल) वापरतात. वैद्यकीय नियतकालिक द लॅन्सेटमध्ये त्यांचे अनेक लेख छापून आलेले आहेत. त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
जन्म : २३ सप्टेंबर १९५० (वर्धा – महाराष्ट्र)
निवासस्थान : शोधग्राम, गडचिरोली
शिक्षण: MBBS, MD, MPH
प्रशिक्षण संस्था : जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, बाल्टिमोर, अमेरिका
पेशा : वैद्यकीय
पत्नी : राणी बंग
अपत्ये : आनंद, अमृत
वडिल : ठाकुरदास
आई : सुमन
पुरस्कार : महाराष्ट्र भूषण
- अभय बंग हे मराठी डॉक्टर आहेत. ते सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारताबरोबरच अनेक देशांनी घेतली असून आफ्रिकन देश, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश त्यांनी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे मॉडेल वापरतात.
- अभय हे वर्षाच्या सेवाग्राम आश्रमात वाढले. गांधीजीनी सुरु केलेल्या नयी तालीम या शिक्षणपद्धतीत त्यांचे शिक्षण झाले.
- कार्ल टेलर यांच्याकडून सार्वजनिक आरोग्याचे धडे घेतले.
- डॉक्टर झाल्यावर त्यांनी वर्ध्याजवळ कान्हापूर आणि महाकाळ या गावात वैद्यकीय काम सुरु केले. कालांतराने त्यांनी चेतना विकास ही संस्था सुरु केली आणि त्यामार्फत रोजगार हमीच्या मजुरांचे संघटन सुरु केले.
गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी चळवळ :
- १९८८ मध्ये सुरु असलेल्या एका महिला जागरण यात्रेत एका स्विने दारुच्या समस्येवर लक्ष वेधले. त्यावर उपाययोजना म्हणून १०४ गावामध्ये अभ्यास केला.
- यात दारुच्या अर्थशास्त्राविषयी माहिती जमविण्यात आली. अनेक संघटना आमदार एकत्र आले. आज गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी आहे.
- नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास आणि उपाययोजना
स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावरील संशोधन
त्यांच्या संशोधनानुसार स्त्रियांमध्ये गायनॉलॉजिकल आजारांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे हे सिद्ध झाले. यावून असे लक्षात आले की ९२ टक्के स्त्रियांना कोणत्याना कोणत्या प्रकारचे स्त्रियांचे आजार आहेत आणि यावरुन जागतिक आरोग्य संघटनेने महिला आरोग्य वर्षाची आखणी केली.
- १९८८ साली त्यांनी सर्च नावाची बिगर सरकारी संघटना ५८ गावातील ४८००० लोकसंख्येसाठी स्थापन केली व आदिवासींना आरोग्यसेवा देण्याकरिता त्यांनी अशिक्षीत स्त्रियांनाच आरोग्यसेवेत किमान प्रशिक्षण दिले.
- संशोधन :
रोजगार हमी योजनेतील किमान मजुरीचा दरामागचा शास्त्रीय अभ्यास केल्यावर तो दर ४ रु. नसून १२ रु. आहे असा निष्कर्ष काढला व तो मान्यच करावा लागला.
ब्रेथ काउंटर:
अभय बंग यांनी ब्रेथ काउंटर नावाच्या उपकरणाचा शोध लावला. यामुळे १२ च्या पुढे मोजू न शकणाऱ्या ग्रामीण स्त्रिया देखील न्युमोनियाचे यशस्वी निदान आणि त्यामुळे उपचार करु शकतात.
कोवळी पानगळ:
गडचिरोली जिल्ह्याच्या कुपोषणावर व नवजात अर्भकांच्या मृत्यूवर अभय व राणी यांनी लिहिलेला कोवळी पानगळ हा शोधप्रबंध खूप गाजला. यामुळे थेट जागतिक संघटनेला आपले आरोग्यविषयी धोरण बदलावे लागले होते.
• गांधीजी, लोक आणि विज्ञान ह्या अभय यांच्या महत्त्वाच्या प्रेरणा आहेत.
- प्रकाशित साहित्य : माझा साक्षात्कारी हृदयरोग
पुरस्कार :
१. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी. लिट. ही सन्माननीय पदवी
२. २००३ सालचा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार.
३. २०१८ सालचा पद्मश्री पुरस्कार.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents