‘पीएसआय’ भरतीत ‘एमपीएससी’कडून मोठा बदल, ‘या’ उमेदवारांचा होणार फायदा…
Change In PSI Exam By Mpsc
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
राज्यातील पोलिस उपनिरीक्षक अर्थात ‘पीएसआय’ पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धापरीक्षेच्या स्वरुपात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठा बदल केला आहे. एमपीएससीकडून आता बौद्धिक चाचणीबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीलाही अधिक प्रमाणात महत्व दिल्याचे दिसत आहे.
पीएसआय भरतीसाठी 400 मीटर धावणे व लांब उडीऐवजी आता 3 किमी वॉकिंग, 200 मीटर धावणे व गोळाफेक, अशी चाचणी घेतली जाणार आहे. तसेच, शारीरिक चाचणी 60 ऐवजी आता पूर्वीप्रमाणेच 100 गुणांची असणार आहे. शारीरिक चाचणीतील या बदलांचा महिला उमेदवारांना मोठा फायदा होणार आहे.
शारीरिक चाचणी व मुलाखतीला महत्व
‘पीएसआय’ची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आता शारीरिक चाचणी व मुलाखत हे महत्वाचा भाग असतील. पूर्वपरीक्षा ही 100 गुणांची असते. पीएसआय, एसटीआय या सर्व पदांसाठी ही एकच परीक्षा असते. त्यातून फक्त मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविले जाते. हे गुण मुख्य परीक्षेत ग्राह्य धरले जात नाही. पण, मुख्य परीक्षा वेगवेगळी असते. यात पदांसंबंधी एक वेगळा पेपर असतो.
‘पीएसआय’ पदाबाबतचे प्रश्न त्यात असतात. ही परीक्षा 200 गुणांची असून, त्यानंतर 100 गुणांची शारीरिक चाचणी आणि 40 गुणांची मुलाखत असते. म्हणजेच. मुख्य परीक्षेचे 200, शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचे 140 गुण, असे एकूण 340 पैकी गुण मिळणार आहेत.
उमेदवारांना शारीरिक चाचणीत 60 गुण मिळवणं अनिवार्य होतं. शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज ही अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून चाचणीचा निकाल जाहीर करण्यात येणार होता. या चाचणीत कमी गुण मिळाल्यास उमेदवार मुलाखतीला पात्र ठरू शकत नव्हते. त्यामुळं आता शारीरिक चाचणीला जास्त महत्त्व दिल्याचे सांगण्यात आलं.
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पीएसआय,
एमपीएससी,
एमपीएससी बदल,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
PSI,
Mpsc,
Change In PSI Exam By Mpsc
Table of Contents