बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर 1812-1846 यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८१२ - मृत्यू : १८४६)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
746

 बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती 

दर्पण या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे, इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्च विद्याविभूषित, पंडिती व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर होत.

बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर 1812-1846 यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

जन्म : ६ जानेवारी १८१२

जन्मगाव : पोंभुर्ले, ता. राजापूर, जि. रत्नागिरी (देवगड)

मृत्यू: १७ मे १८४६ (वनेश्वर)

आयुष्य : ३४ वर्षे

पूर्ण नाव : बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर

वडिलांचे नाव : गंगाधरशास्त्री जांभेकर (न्युत्पन्न पुराणीक)

 

महत्तवाच्या घटना :

 

  • १८२५ मुंबईला येऊन इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला.
  • १८३० वयाच्या १८ व्या वर्षी ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सिक्रेटरी’ म्हणून निवड.
  • ६ जानेवारी १८३२ मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पणची सुरुवात केली. (वयाच्या २० व्या वर्षी)
  • या वृत्तपत्रातील इंग्रजी भाग लिहण्याचे कार्ये हाती घेतले.
  • २१ सप्टेंबर १८३२ दर्पण मध्ये पुणे येथील इंग्रजी शिक्षणाची दखल.
  • १८३२ बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे नेटीव्ह सिक्रेटरी म्हणून निवड.
  • २४ ऑगस्ट १८३२ विद्या हे बळ हे शिर्षक असणारा लेख दर्पणच्या अंकात लिहिला.
  • २६ जून १८४० दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. (८ व्या वर्षी)
  • १८४० बाळशास्त्री जांभेकर व भाऊ महाजन यांनी दिग्दर्शन हे साप्ताहिक सुरु केले. (मराठीतील पहिले मासिक)
  • इंग्रजांनी बाळशास्त्री जांभेकरांना जस्टीस ऑफ द पीस ही पदवी दिली. (जेम्स कर्नाऊ या इंग्रज अधिकाऱ्याने )
  • १३ सप्टेंबर १८४३ श्रीपती शेषाद्री प्रकरण.
  • बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या सहाय्याने श्रीपतीला हिंदू धर्मात घेतले.
  • १७ मे १८४६ वनेश्वर येथे प्राचीन शिलालेखांच्या अभ्यासासाठी गेले असता तापाने मृत्यू झाला. (वयाच्या ३४ व्या वर्षी)
  • – सार्वजनिक जिवनाचा पाया घातला.

 

बाळ गंगाधरशास्त्री जांभेकरबद्दलची मते :

– मराठी पत्रकारितेचे जनक

– आधुनिक महाराष्ट्राचे आधी

– अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक.

– एल्फीस्टन कॉलेजात पहिले भारतीय असिस्टंट प्रोफेसर (बीजगणित व गृहगणित शिकवत)

  • मुंबई विभागात शाळा तपासणी निरीक्षक, ट्रेनिंग कॉलेजचे संचालक इत्यादी पदावर कार्य.
  • मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक
  • जन्मदिवस पत्रकार दिन (६ जानेवारी)
  • मराठी भाषेतील पहिली शालेय पाठ्यपुस्तके रचली
  • आद्यइतिहासकार
  • पुन्नरजीवनवारी सुधारणावादाचा किंवा परंपरानिष्ठ परिवर्तनवादाचा पाया घातला.
  • ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह संपादन केले.
  • शिलालेख व ताम्रपट यांचे विद्वत्तापूर्ण लेखन करून शोधनिबंध रॉयल एशायटिक सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध.
  • राष्ट्रजागृतीचे अग्रदूत, सुधारणावादाचे आद्यप्रवर्तक व्यासंगी पंडीत, आद्य समाजसुधारक.
  • आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जिवनाची गंगोत्री.
  • स्त्री शिक्षण व विधवाविवाहाचे पुरस्कर्ते
  • ह. म. घोडके महाराष्ट्रनामा ग्रंथात – आधुनिक महाराष्ट्राचे आद्य प्रबोधनकार म्हटले पाहिजे.
  • दादाभाई नौरोजी – अद्वीय विद्वान, पश्चिम भारतातील विद्यामुकुटमणी
  • न्या. चंदावरकर- पश्चिम भारतातील प्रख्यात पंडीत आद्यऋषी.
  • प्रा. शेजवलकर – सरकारचा करशास्त्री

बाळशास्त्री जांभेकर

  • ग्रंथसंपदा :

१. शुन्यलब्धी – मराठी भाषेतील पहिले पुस्तक

प्राचीन भारतातील शिलालेख व ताम्रपट यावर लेख लिहलेले आहेत.

२. नियतकथा (१८३८)

३. छंदशास्त्र

४. इंग्लंडदेशाची बखर भाग -१, २ (१८३२) (इनसायक्लोपिडक हिस्ट्री ऑफ इंडिया)

५. बालण्याकरण (१८३६)

६. हिंदूस्थानचा इतिहास

७. भूगोलविद्या (१८३६)

८. सागरसंग्रह (१८३७)

९. इंग्रजी, मराठी धातुकोश

१०. ज्योतिशशास्त्र (१८३५)

११. भारतातील इंग्रजांचा इतिहास (१८४६)

  • यांचा जन्मदिवस (६ जानेवारी) पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.

साधारणपणे 1830 ते 1846 या काळात बाळशास्त्रींनी आपले योगदान देशाला दिले. या काळात समाज बहुसंख्येने निरक्षर, अंधश्रद्धाळू व अज्ञानी होता. म्हणूनच अवघ्या 34 वर्षांच्या आयुष्यात, विविध क्षेत्रात त्यांनी केलेले प्रचंड कार्य मूलभूत, मौल्यवान व अद्भूत ठरते. 6 जानेवारी रोजी दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.

हाच योगायोगाने बाळशास्त्रींचाही जन्मदिवस. त्यांच्या स्मृत्यर्थ हाच दिवस पत्रकार दिन म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो.महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी आपल्या पत्रकारितेचा वापर केला. त्याचबरोबर जातीभेद निर्मूलन आणि विधवा पुनर्विवाह यालाही त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळेच त्यांचा उल्लेख “आद्य समाजसुधारक” असा केला जातो.

परंतु कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंबुर्ले येथे 1812 च्या उत्तरार्धात जन्म झालेल्या बाळशास्त्री यांचे वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी 1846 मध्ये निधन झाले.

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम