इन्कम टॅक्स ऑफिसर ते मुख्यमंत्री..अरविंद केजरीवाल!
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
[irp]
- दिल्लीमध्ये सलग तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्ष (आप) पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यास सज्ज झाला आहे.
- विजयाच्या हॅट्रिक बरोबरच केजरीवाल यांच्या आतापर्यंतच्या प्रवासावर टाकलेली एक नजर…
- जन्म – केजरीवाल यांचा जन्म १६ ऑगस्ट १९६८ रोजी हरियाणामध्ये झाला.
- शाळा – केजरीवाल यांच्या बालपणीचा बरासचा काळ सोनपत, गाझियाबाद आणि हिस्सार परिसरामध्ये गेला. हिस्सारच्या कॅम्पस स्कूल आणि सोनपतच्या ख्रिश्चन मिशनरी स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले.
- उच्च शिक्षण – आयआयटी खरगपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवीचे शिक्षण घेतले.
- नोकरी – सन १९८९ मध्ये जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये केजरीवाल यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली.
- IRS साठी निवड – केजरीवाल यांची १९९५ मध्ये भारतीय महसुली खात्याच्या (आयआरएस) सेवेसाठी निवड झाली.
- परिवर्तन चळवळ – डिसेंबर १९९९ मध्ये मनिष सिसोदिया आणि अन्य साथीदारांबरोबर केजरीवाल यांनी दिल्लीत ‘परिवर्तन’ या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
- मॅगसेसे पुरस्कार – सन २००६ मध्ये भ्रष्टाचारविरोधी लढ्याचा भाग म्हणून जनतेला माहितीचा अधिकार मिळवून देण्यासाठी ‘परिवर्तन’ या चळवळीतर्फे केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘मॅगसेसे’ पुरस्काराने सन्मानित. त्याचवर्षी महसुली खात्याच्या सेवेचा राजीनामा देऊन भ्रष्टाचारविरोधी मोहिमेच्या कामात स्वत:ला झोकून दिले.
- भ्रष्टाचारविरोधी मोहिम – २०११ मध्ये अण्णा हजारे आणि किरण बेदी यांना भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत साथ देण्यासाठी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या संस्थेची स्थापना केली. जनलोकपाल आंदोलनात सहभाग…
- दिल्लीच्या राजकारणात प्रवेश – सन २०१२ मध्ये आम आदमी पक्षाची (आप) स्थापना करीत दिल्लीच्या राजकारणात प्रवेश.
- मुख्यमंत्रीपदावर विराजमान – २०१३ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव करीत, २८ डिसेंबर २०१३ रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान.
- ४९ दिवसांत पायऊतार – अपुऱ्या संख्याबळाअभावी जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यात आलेल्या अपयशाचे कारण देत अवघ्या ४९ दिवसांत दिल्लीच्या सत्तेवरून पायऊतार.
- मोदींविरोधात लढले – २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये केजरीवाल यांनी वाराणसीमधून भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये केजरीवाल पराभूत झाले होते.
- पुन्हा दिल्लीत सत्ता – केंद्रात मोदी सरकार सत्तेत असताना २०१५ साली आपने पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सत्ता काबीज केली. या निवडणुकीमध्ये केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपने ७० पैकी ६७ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला होता.
- तिसऱ्यांदा मुख्यमंत्री – २०२० च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यात यश
[irp]
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents